उन्हाळा संपला, शाळा सुरू झाली, पाऊस आला, पहिल्या पावसात भिजून झालं. मग मावशींच्या शेतात चिखलात खेळायला भात लावणीचं निमित्त काढून जायची वेळ झाली. :) या वेळी नेमकी लावणी कामाच्या दिवशी होती, शाळेला सुट्टी नव्हती. पण तरीही, शाळी सुटल्यावर जाऊ या असं ठरलं. त्या भटकंतीचे हे फोटो.
पुण्यात अधून मधून एखादी सर येत होती फक्त पावसाची. त्यामुळे तिकडे तरी पाऊस असेल का अशी जरा शंका वाटत होती. पण अर्ध्या वाटेतच मस्त धो धो पावसाने स्वागत केलं. मावशींचं गाव फार देखणं आहे. पाऊस, हिरवे डोंगर, त्यातले धबधबे, भाताची खचरं, आणि पलिकडे दिसणारं धरणाचं पाणी!
शेतात आम्ही पोहोचल्याबरोबर स्वागताला काळू हजर झाला.
एवढा वेळ चिखल – पाण्यात डुंबल्यावर सखी कुडकुडायला लागली. मावशींच्या डब्यात खेकड्याचं कालवण होतं, ते माऊ आणि सखी दोघींनी कुडूमकुडूम करत खाल्ल्यावर मग थंडी पार कुठल्या कुठे पळाली! दोघी इतक्या प्रेमाने खेकडा खात होत्या, की या पहिल्यांदा खाताहेत यावर कुणाचा विश्वास बसू नये!
यावेळेला आठवणीने भारंगीची पानं खुडून आणली. त्यामुळे भारंगीच्या भाजीचा डबल बोनस मिळाला पुण्याला आल्यावर! भारंगीचा फोटो मात्र काढायचा विसरले. हा भारंगीचा जुनाच फोटो- अजून फुलली नाही भारंगी. अजून पानं कोवळी, भाजी करण्याजोगी होती. नंतर जून झाल्यावर भाजी करता येत नाही.)
आंभोळीचं झाड बघितलं शेताजवळ.
आणि ही चिचर्डी:
करवंदाच्या काट्याला फाटे ;)
रानहळद / गौरीचे हात:

अशी लावणी चालली होती:)
शेतात जरा वेळ शांत उभं राहिलं, की खेकडे, मासे पायाला गुदगुल्या करत होते.
मासे केवढे मोठे असावेत? बांधावरून पडणार्या पाण्यात मासे धरण्यासाठी
जाळी लावली आहे, त्यात चांगले तळहातापेक्षा मोठे मासे अडकले होते! जाळीतले
मासे काढल्यावर त्यातले बारके मासे परत पाण्यात टाकायचा कार्यक्रम झाला.
थोडेफार काळूला खायला पण मिळाले. :)