गेले दहा बारा दिवस मी गायब आहे. नेट, मोबाईल, रोजचा पेपर, टीव्ही या सगळ्यापासून दूर. आता शरीराने रोजच्या जगात परत यावं लागलं, तरी मन अजूनही तिथेच रेंगाळतं आहे. काय बघितलं, अनुभवलं आणि कसं वाटलं, हे सांगण्यासाठी शब्द पुरेसे नाहीयेत, कॅमेऱ्याची चौकट तोकडी पडते आहे. त्यातल्या त्यात, फोटोत बंदिस्त होऊ शकलेली ही एक छोटीशी झलक.
*************************************************************
दिवसाची सुरुवात इतकी मस्त असते का रे भाऊ? आपण तर कधी सक्काळी सूर्याजीला असा बघितलाच नव्हता
कधी शांत, धीरगंभीर
तर कधी अवखळ
काही वाटा संपूच नयेत...
पोटभर दंगा
देवाचिये दारी
वेगवेगळी फुले उमलली - कुणी रानात, तर कुणी बागेत. काही लहान, तर काही मोठी. कुठे सुगंधी तर कुठे गंधहीन. सगळी आपल्याच मस्तीत, आणि तेवढीच आनंदी! एकेकट्या फुलांचे किती फोटो टाकू ... हा एक कोलाजचा प्रयत्न.







