इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
Wednesday, November 9, 2011
Tuesday, October 25, 2011
Thursday, October 20, 2011
बालभारती: आठवणीतील कविता
गेल्या आठवड्यात मला एक सुंदर दिवाळी भेट मिळालीय. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बालभारतीमधल्या कवितांचं संकलन श्री. सुरेश शिरोडकर त्यांच्या या ब्लॉगवर करत असतात. तिथे ‘या बालांनो’ आहे, ‘श्रावणमासी’ आहे, ‘आनंदी आनंद गडे’ आहे, ‘गवतफुला’ आहे, ‘लाडकी बाहुली’ आहे ... जी कविता ऐकून आपण थेट शाळेच्या वर्गात जाऊन पोहोचतो, त्या सगळ्या बालभारतीमधल्या सुंदर सुंदर कविता तिथे आहेत.
श्री. शिरोडकरांनी यातल्या तब्बल १८१ कवितांचं संकलन इ-पुस्तक रूपात प्रसिद्ध केलंय. या इ-पुस्तकाची सुंदर भेट त्यांनी पाठवलीय! गेला आठवडाभर मी संधी मिळाली की बालभारतीमध्ये डोकावते आहे ... त्यातली एक कविता वाचायची, आणि कवितेच्या आठवणींमध्ये हरवून जायचं असा खेळ चाललाय. या भेटीसाठी श्री शिरोडकरांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
हे इ-पुस्तक जालावर इथे उपलब्ध आहे ... तेंव्हा वाट कसली बघताय? डाऊनलोड करा आणि तुमच्या लाडक्या कवितांचं पुस्तक मिळवा!

Subscribe to:
Posts (Atom)