आज कपिलाषष्ठीचा योग असावा. आज नवर्याने आणि मी थेटरात जाऊन ताजा ताजा शिणुमा बघितला! सिनेमा सलग, ताजा असताना आणि थेटरात जाऊन बघणं हा अनुभव माझ्यासाठी सद्ध्या इतका दुर्मीळ झालाय, की अगदी रा१ बघायला सुद्धा मी तयार झाले असते म्हणा ... त्यामुळे मी इथे त्याचं कीबोर्ड झिजेपर्यंत कवतिक लिहिलं, तरी ते जरा मीठ शिंपडूनच वाचा.
या शिणुमाला टाईम्सने चार तारे दिलेत. त्यात राजने रॉकस्टारच्या गाण्यांबद्दल इथे लिहून ठेवलंय. त्यामुळे बहुधा आपण डोंगराएवढ्या अपेक्षा घेऊन बघायला जाणार, आणि अपेक्षाभंग होऊन परत येणार अश्या तयारीनेच गेले होते. पण अपेक्षाभंगाच्या अपेक्षेचा भंग झाला. सिनेमा मनापासून आवडला.
याहून जास्त तारे तोडत नाही. मला सिनेमाची चिकित्सा करता येत नाही. त्यातल्या एकेका पैलूविषयी काही मत देण्याएवढं तर अजिबात समजत नाही. म्हणजे अगदी सिनेमा बघताना त्यातली गाणी आवडली, तरी गाण्याचे शब्दसुद्धा नंतर आठवत नाहीत. फक्त ओव्हरऑल परिणाम जाणवतो. या अडाणीपणाला मी होलिस्टिक व्ह्यू असं गोंडस नाव दिलंय. तर माझ्या होलिस्टिक व्ह्यूनुसार रॉकस्टार चार तारेवाला आहे. जरूर बघा, आणि गाणी तर ऐकाच ऐका. आवडला नाही, तर मला जरूर सांगा, कदाचित माझा सिनेमाविषयीचा अडाणीपणा त्यातून थोडा कमी होईल.