बिरबलाच्या गोष्टीत एक माणूस असतो. तो एकीकडे अंधारात हरवलेली चीजवस्तू दुसरीकडे उजेड आहे म्हणून तिथे शोधत असतो. खरं तर स्वतःचा शोध घेण्यासाठी भटकणं काहीसं तसंच. पण नवी माणसं भेटल्यावर, नव्या जागा बघितल्यावर कदाचित एखादा नवा पैलू सापडेल. ज्यांच्याकडे बघून काही मार्ग सापडेल अशी ग्रेट माणसं दिसतील या विचाराने सुट्टीत भटकंती करायचं ठरवलं होतं. त्यातलाच एक मुक्काम म्हणजे सर्च शोधग्राम, गडचिरोली.
डॉक्टर अभय आणि राणी बंग यांचं इथल्या आदिवासींच्या आरोग्यासाठी चालणारं काम आणि त्याच वेळी त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॅन्सेटसारख्या नियतकालिकातून प्रसिद्ध होणारे शोधनिबंध याविषयी वाचलं होतं, आणि खरोखर "Think globally act locally" चा हा नमुना बघण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. अखेरीस तो योग जुळून आला. खरं तर असं काम बघायला हौशे-नवशे-गवशे भरपूर येत असणार. तिथल्या लोकांनी यांना किती एन्टरटेन करायचं? त्यामुळे सर्चशी संपर्क साधताना मनात थोडी धाकधूक होती. पण इथे इतकं मनापासून स्वागत झालं, की सगळ्या शंका दूर झाल्या. पहिल्याच दिवशी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर राणीताई- अभयभाऊंनी चौकशी केली. आणि अभयभाऊंनी जेंव्हा ‘इथे तुझ्यासारखे अस्वस्थ आत्मे भरपूर आहेत!’ म्हणून सांगितलं, तेंव्हा आपण अगदी योग्य ठिकाणी आलोय याची खात्री झाली. ‘गौरी आपल्याला भेटायला आलीय तिची नीट काळजी घ्या ग’ म्हणून राणीताईंनी सगळ्यांना सांगितलं, आणि मग मी एकटीच इथे आले आहे हे विसरूनच गेले. रात्री माझ्यासारखीच अजून एक पाहुणी तिथे येऊन पोहोचली, आणि मग तर आमची वर्षानुवर्षांची गट्टी असावी अश्या गप्पा सुरू झाल्या.
दिवसभर तिथल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये भटकून त्यांच्या कामाची माहिती करून घ्यायची, संध्याकाळी सगळे प्रार्थनेसाठी एकत्र जमतात तेंव्हा दिवसभरातल्या कामांचा आढावा, मनमोकळ्या गप्पा, आणि मग रात्री शेकोटीशेजारी बसून मस्त जेवण. आपण कधी इथले होऊन जातो ते कळतच नाही. स्वतःला शोधणार्या, आपल्या आजुबाजूच्या लोकांसाठी काही करू इच्छिणार्या तरुणांचा एक vibrant गट इथे भेटतो. कुणी चार आठवडे, कुणी काही महिने, कुणी दोन वर्षं असं काम करायला, वेगवेगळ्या क्षेत्रातले उच्चशिक्षित तरूण इथे त्यांचं स्वप्न घेऊन येतात. कम्युनिटी लाईफ म्हणजे रूक्षच असलं पाहिजे असं नाही - कार्यकर्त्यांमध्ये दिसणारे सहज खेळीमेळीचे संबंध, सर्चच्या परिसरामध्ये वारंवार जाणवणारी सौंदर्यदृष्टी आणि योजकता फार सुखावून जाते. संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात सर्चच्या आवारातलं छोटं तळं आणि तळ्याकाठची अभ्यासिका बघितल्यावर तर मला थोरोच्या वॉल्डनचीच आठवण झाली. सुसज्ज ग्रंथालय, statistical analysis विभाग, आदिवासी कला संग्रहालय, मॉं दन्तेश्वरी दवाखाना सर्व वास्तूंची बांधणी आदिवासींच्या घरांशी जवळीक सांगणारी.
सर्चच्या पुढाकाराने जवळपासच्या आदिवासी गावांमध्ये खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धा बघायला राणीताईंबरोबर ‘वाघभूमी’ गावाला जायची संधी मिळाली. एक गाव स्पर्धा भरवतं, त्यासाठी जवळपासच्या गावांमधून स्पर्धक संघ येतात. स्पर्धा भरवणारं गाव सगळ्या पाहुण्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था, मैदान तयार करणं अशी सगळी कामं वाटून घेतं. गावातल्या प्रत्येकाच्याच हे घरचं कार्य - सगळेच झटून कामाला लागतात. स्पर्धेच्या वेळी येणार्या पाहुण्यांच्या जेवणासाठी दोन दोन महिने आधी खास भाज्यांचे वाफे तयार केले जातात. स्पर्धेला लागणार्या खर्चासाठी गावातले तरूण ठेक्याने काम घेऊन पैसे साठवतात. प्रत्येक घरी एका गावाचे खेळाडू अशी सगळ्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था. मोहाची दारू हा इथल्या आदिवासी जीवनाचा अविभाज्य भाग, पण स्पर्धेच्या काळात गावात कोणी दारू गाळत नाही, बाहेरगावाहूनही आणत नाही. आपल्या गावाला पाहुण्यांनी नावं ठेवायला नकोत, स्पर्धा यशस्वी झाल्या पाहिजेत म्हणून सगळे धडपडतात. व्हॉलीबॉल कबड्डी आणि नेमबाजी अश्या स्पर्धा - त्यात मुलांचे आणि मुलींचे सामने. स्पर्धा चुरशीच्या झाल्या तरी कुठे निकालावरून भांडणं नाहीत, जिंकलेल्या संघाचं खिलाडू वृत्तीने कौतुक. राणीताई म्हणाल्या, अश्या स्पर्धा फक्त आदिवासी भागातच होऊ शकतात. पंचांशी भांडणं नाहीत, प्रतिस्पर्ध्यांविषयी वाईट बोलणं नाही, आयोजनाच्या कामामध्ये भांडणं नाहीत. वीस - तीस उंबरठा असणारी छोटीशी वस्ती बाहेरून कुठलंच अर्थसहाय्य न घेता इतके नेटके सामने घेऊन दाखवते! अख्खं गाव सोडा - पण गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये अश्या प्रत्येकाचा सहभाग असणार्या स्पर्धा आयोजित करून कुठल्याही भांडणाशिवाय तडीस नेता येतील?
राणीताईंना बघताना जाणवते, ती त्यांची सहज मिसळून जाण्याची वृत्ती. त्यांनी प्रेमाने ‘बेटा’ म्हणून हाक मारली म्हणजे जाणवतं, ही खरंच सगळ्यांची आई आहे ... इथले तरूण कर्यकर्ते त्यांना ‘अम्मा’ म्हणून हाक मारतात, आणि अभयभाऊंना ‘नायना’(तेलुगुमध्ये वडिलांना नायना म्हणतात) म्हणून.
अभय भांऊशी गप्पा मारायची इच्छा होती. त्यांच्या व्यस्त दिनक्रमामध्ये आपल्यासाठी वेळ काढायला सांगायचा संकोच वाटत होता, पण त्यांना विचारलं - आणि त्यांनी सहज ‘परवा आपण फिरायला बरोबर जाऊ या’म्हटलं. डोक्यातला सगळा गोंधळ त्यांच्यापुढे ओतला, आणि त्यांनी इतक्या प्रेमाने मला समजणार्या भाषेत तो गुंता कसा सोडवायचा ते दाखवलं!
अमेरिकेत राहूनही इथल्या कामांशी नाळ जोडून असणार्या चंदाताई आठलेंची सर्चमध्ये भेट झाली, पुढचा मुक्काम - हेमलकसा त्यांच्याबरोबरच गाठला. हेमलकसाविषयी पुढच्या पोस्टमध्ये.
**********************************************************************
सर्चच्या statistical analysis विभागाच्या महेशभाऊंना सध्या VB .Net मध्ये काही मदत हवी आहे. त्यासाठी सर्चला जाण्याची आवश्यकता नाही - स्काईपवरून मर्गदर्शन केलेलंही पुरेसं आहे. तुम्ही काही मदत करू शकत असाल तर नक्की सांगा.

Search - Gadchiroli |
24 comments:
हे सर्च मस्त आहे बरं का... बरेच दिवस मी असलेच काहीतरी सर्च करत होतो. डिटेल्स पाठव ना प्लीज. कसे जायचे, कुणाशी संपर्क करायचा वगैरे. मेल आयडी आहेच तुझ्याकडे.
पंकज, मेल पाठवली आहे.
गौरे अगं कसली अप्रतिम भटकंती केलीस गं.... अगं आम्ही नुसतेच जायचे जायचे म्हणतोय, तू जाऊन आलीस, क्या बात!! तुझे खरं तर मनापासून अभिनंदन गं...
पंकज म्हणतोय ते अगदी बरोबर.असलेच काहितरी सर्च करणारे किती जण भेटतील बघ तूला...
पुढच्या पोस्टची वाट पहातेय!!!
तन्वी, अगं या सगळ्यांना भेटूनच इतकं ग्रेट वाटतं ना ... डोक्यातली सगळी जळमटं साफ होतात एकदम. शिवाय आपल्यासारखे कन्फ्यूज्ड आत्मेही भेटतात तिथे ... मग आपण एकटेच नाही म्हनून दिलासा मिळतो :)
"नवी माणसं भेटल्यावर, नव्या जागा बघितल्यावर कदाचित एखादा नवा पैलू सापडेल. ज्यांच्याकडे बघून काही मार्ग सापडेल अशी ग्रेट माणसं दिसतील"
माझ्याही मनात असच काहीसं आहे वैताग आलाय ह्या गुंत्याचा आयुष्यासाठी नवी दिशा शोधायची आहे
अनिकेत
अनिकेत, तू म्हणतो आहेत ते अगदी पटतंय. अरे रूटीनमध्ये वैतागाचा कडेलोट झाल्यावर मस्तपैकी सुट्टी घेऊन हा शोध चालला होता माझा.
वेलकम बॅक. गुंता सोडवण्यास याहून योग्य मार्गदर्शन मिळणार नाही. पुढील भागांविषयी उत्सुकता आहे.
सुंदर!...अभिमान...आणि अजून काही...
वेळेचा, आयुष्याचा सदुपयोग.
सिक लिव्ह टाकायचा विचार होताच...बघू, गडचिरोलीत आयुष्याला दिशा देणारं काही मिळू शकलं तर. :)
राज, खरंय. मला काय म्हणायचंय हे त्यांना काही न बोलतच समजलं ... फार मोलाचा सल्ला मिळाला इथे.
अनघा, अग आपल्या आवती भोवती इतकी माणसं अभिमान वाटण्याजोगं काही करत असतात, त्याचा आपल्याला पत्ताही नसतो. बातम्या होतात त्या कुणी किती भ्रष्टाचार केला याच्या. पेपर वाचून वाटतं त्यापेक्षा चित्र खूपच आशादायक आहे असं वाटतं या सगळ्यांना भेटलं की.
गौरी आम्ही फ़क्त खंतावत राहतो तू मस्त जाऊन आलीस आणि डोक्यातल्या भुंग्याचा थोडा भुगा करुन आलीस हे मस्त केलंस बघ...हे पोस्टलंस हे झ्याक केलं...आत्ताच आई-बाबा हेमलकसाला जाऊन आले त्याबद्दल बोलणी सुरुच होती आता तू हे गडचिरोली पण लिस्ट्वर टाकलंस बघ....
Good job इतकंच लिहू शकते तुझ्यासाठी...सुट्टीचा याहून सुंदर उपयोग कुठला असू शकतो ??
अपर्णा, अग अश्या काही जागा बघायलाच घेतली होती सुट्टी. हेमलकसाला तुझ्या आई-बाबांना डॉक्टर प्रकाश आमटे - मंदाताई भेटल्या का? तिथे जाऒनही माझी भेट नाही झाली बघ.
Hi Gouri,
Nice to read your article! May be you would also like to go through nirman website - a youth movement initiated by Nayna - http://nirman.mkcl.org/ (if you haven't visited already). You can read good articles in the downloads section.
I am obviously interested in reading about more Hemalkasa and any more.
धनंजय, निर्माणचा उल्लेख पोस्टमध्ये अनवधानाने राहून गेलाय. त्यांच्या साईटचा दुवा इथे दिल्याबद्दल धन्यवाद!
मस्तच एकदम...एकदा जाऊन पहायलाच हवं!
बाबा, खरंच बघण्यासारखं आहे हे काम.
गौरी !!!!!
ग्रेट.. खरंच सुट्टी सार्थकी लावलीस तू !! कुठे सुट्टी म्हटलं की विकेंड डेस्टीनेशनचं प्लानिंग करणारे आम्ही आणि कुठे तू !! खरंच ग्रेट आहेस !!
हेरंब, अरे या वेळी जरा वेगळा अजेंडा होता. हाताशी वेळ होता, आणि पुन्हा अशी सुट्टी सहजी मिळणार नाहीये याची जाणीव होती ... त्यामुळे चार महिने प्लॅनिंग चाललं होतं सुट्टीतल्या भटकंतीचं :)
हो आई बाबा त्यांना भेटले आणि ती दोघ खूप साधी गप्पा मारल्या ...
माझी भाचर पण त्य्नांच्याशी बोलली...
तुझ पुन्हा अभिनंदन हेरंब +100
अपर्णा, या वेळी त्यांची भेट झाली नाही माझी ... आता पुन्हा जायला पाहिजे :)
नुसती सुट्टीच नाही तर एका अर्थी तुमचे आयुष्यदेखील सार्थकी लागलं. प्रत्येक सुट्टीत ट्रेकिंग, समुद्र किनारी किंवा थंड हवेच्या ठिकाणीच जायला हवे असे नाही हे तुमची पोस्ट वाचून उमगले.
सिद्धार्थ, ही सुट्टी नेहेमीपेक्षा वेगळी घालवायची असा बेत होता. मनात होतं तसं सगळं प्रत्यक्षात जुळुनही आलं, त्यामुळे फार छान वाटलं.
Hey I would like to try help. Please email me the details @ marathepa@gmail.com
प्रियदर्शन, मेल पाठवली आहे.
Post a Comment