गेल्या दिवाळीत माझ्या बागवेडावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं... भाऊबीज म्हणून मला एक मस्त ऑर्कीड मिळालं - Yellow Phalaenopsis. मिळालं तेंव्हा ते असं दिसत होतं:
आता असं दिसतंय:
गेल्या चार महिन्यात त्यात झालेले बदल असे:
नोव्हेंबर - जैसे थे
डिसेंबर - जैसे थे
जानेवारी - एक एक फूल हळुहळू सुकून गळून पडलं.
फेब्रुवारी - त्याच दांड्यावर ४ नव्या कळ्या आल्या. एक एक कळी सावकाश उमलली.
मार्च - जैसे थे.
याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर्दी नाही. अनावश्यक कष्ट नाहीत. एवढ्या महिन्यात पानांमध्ये काहीही बदल नाही. कसलेल्या गवयाच्या रागविस्तारासारखं एक एक पाकाळी फुलवत निवांत एक एक फूल उमलतंय. एकदम ग्वाल्हेर घराणं ... आज खिले सो कल खिले, कल खिले सो परसों, जल्दी काहे की भाई, अभी तो खिलना है बरसों!
ऑर्कीडची निगा राखण्याविषयी मी पूर्ण अनभिज्ञ आहे. ते विकत घेताना त्याची काळजी घेण्याविषयी मिळालेल्या सूचना म्हणजे आठवड्यातून एकदा कपभर पाणी घाला, आणि सोबत दिलेल्या दोन लिक्वीड फर्टिलायझरच्या बाटल्यांपैकी एक घाला. किती? तर १० - १५ थेंब का बाटलीचं झाकण भरून याविषयी आणायला गेलेल्या मंडळींमध्ये मतभेद आहेत. खेरीज बाटल्यांवर नावं नाहीत, तेंव्हा जालावर धुंडाळण्याचा मार्ग खुंटलेला. (त्या संपल्यावर काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.) पुन्हा एकदा त्या नर्सरीत जाऊन चौकशी केली, तर तिथल्या सुकन्येला असल्या कुठल्या ऑर्कीडविषयी काही माहिती नाही. अजून तरी मी घालते आहे तेवढं पाणी आणि खत त्याला मानवतंय असं दिसतंय. अर्थात एवढा मंद मेटाबॉलिझम असणार्या झाडाला ते मानवत नसलं, तरी समजायला वेळ लागेल.
जालावरून मला इतकंच समजलंय की, हे ऑर्कीड तुलनेने निगा राखायला सोपं असतं. पण आपल्याकडच्या उन्हाळ्यात पाणी, खताचं प्रमाण किती बदलावं? खत बारा महिने कायम इतकंच घालायचं का? वर्षातून कधी याचा विश्रांतीचा काळ असतो का? कुंडी किती काळाने बदलायची? ऑर्कीडचं आयुष्य किती असतं? त्या दोन बाटल्यात नेमकं काय असेल? प्रश्न न संपणारे आहेत. पुण्यात कुणी ऑर्कीडतज्ञ तुम्हाला माहित असेल तर सांगा.

10 comments:
I can send you couple of numbers - of people who might be able to help you. Naturally don't want to publicly write about them. Could you send me email?(aativas@gmail.com) and I will reply.
सविता, आभार! मेल पाठवली आहे.
आता लवकर घ्या DSLR. अजून् छान फोटो येतील. अनिकेतने आख्खे गाईड लिहिलंय विकत घेण्यासाठी.
हे हे हे ते गाईड लाईक पण केलंय मी. फक्त नवर्याने आयडिया लाईक करणं बाकी आहे अजून.
>याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर्दी नाही. >अनावश्यक कष्ट नाहीत.
मस्त. इथे एक कोट आठवलं..
“Nature does not hurry, yet everything is accomplished.” Lao Tzu (Chinese taoist Philosopher, founder of Taoism.)
'याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर्दी नाही. अनावश्यक कष्ट नाहीत. :)'
मस्त! फूल आणि तुझं सहजसुंदर लिखाण! सुंदर! :)
राज, सही आहे लाओचा कोट. घाई गडबड आपण करतो - कारण आपल्याला एक तर खात्री नसते, किंवा जे होणार त्याच्यापेक्षा वेगळं ‘घडवण्याचा’ आटापिटा असतो.
अनघा, दिवसभर धाव धाव धावलं ना की मग त्या फुलाकडे बघायचं. आपण किती उगाचच धावतोय ते जाणवतं. :)
>>>'याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर्दी नाही. अनावश्यक कष्ट नाहीत. :)'
गौरी सुंदर दिसताहेत गं ही फुलं.... तू लिहीतेस किती मनापासून आणि...
बाकि पंकज + १ :)
तन्वी, फुलं सुंदर आहेत, आणि मला विशेष वाटतं म्हणजे एवढी नाजुक दिसणारी फुलं महिनेच्या महिने टिकतात!
पंकजला उत्तर लिहिलंय बघ डीएसएलआरविषयी ;)
घ्यायचाय अग कॅमेरा. नजीकच्या भविष्यकाळात.
Post a Comment