Monday, May 23, 2011

किडे

    सॉफ्टवेअर कोर्सचे दिवस. ‘ओरॅकल’ संपत आलेलं, पुढच्या आठवड्यात ‘एंटरप्राईज जावा’ सुरू होणार असावं. ‘ओरॅकल’ संपता संपता आम्हाला शिकवणार्‍या समीरने पाच प्रॉब्लेम्स दिले. "आजवर माझ्या विद्यार्थ्यांपैकी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्यांनाच या क्वेरी बिनचूक लिहिता आल्या आहेत. तुमच्यापैकी कुणी त्या लिहून दाखवल्या, तर मी त्याला ‘ओबेरॉय’ला घेऊन जाईन". त्याने सांगितलं.

    "चलो आज इसकी नियत देखते है. बघू हा खरंच घेऊन जातो का ओबेरॉयला." मृणालच्या डोक्यात किडा वळावळला, आणि ग्रूपमध्ये कट शिजायला लागला.

    "अली, गौरी - तुमचे दोघांचेही वाढदिवस आहेत पुढच्या महिन्याभरात. तुम्ही स्वतःच्या पैश्यांनी पार्टी देणार ग्रूपला, का हे प्रॉब्लेम सोडवून समीरकडून सगळ्यांसाठी पार्टी उकळणार?"

    "अरे,पण त्याने फक्त एकाला न्यायचं कबूल केलंय."

    "ते मी मॅनेज करतो. तुम्ही कामाला लागा."

    अली, शाहिद, कौशल, गौरी ही मंडळी लॅबला पळाली.

    आता समीरबरोबर मांडवली. समीर आमच्या इन्स्टिट्यूटच्या जवळच राहतो. पाच - सहा मंडळींचं शिष्टमंडळ घेऊन मृणाल थेट त्याच्या घरीच.

    "हाय समीर, जरा एक शंका होती, म्हणून म्हटलं डायरेक्ट इकडेच भेटावं. I hope you don't mind."

    "Arre, no problem. बोला. काय शंका आहे तुमची?"

    "समीर, आजचे ते प्रॉब्लेम्स - what happens if more than one person solves these problems?"

    "I will take the first person solving the problems for party."

    "What if two persons solve it at the same time?"

    "Then I will have to take both along".

    "OK. That means if more than one person solves it at the same time, you will take all of them to Oberoy, right?"

    समीर बिचारा यावर काय बोलणार? "right" तो म्हणाला. नाहीतरी ते प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत. मग वचने किं दरिद्रता?

    इकडे लॅबमध्ये झगडणार्‍या मंडळींना खाणं पिणं पुरवण्याची जबाबदारी काहींनी उचलली. ग्रूपमधले दोन्ही फुंकणारे दीपक सगळ्यांचं टेन्शन हलकं करायला म्हणून एक एक विडी पेटवायला सटकले. बाकीचे आतल्या मंडळींना नैतिक पाठिंबा म्हणून लॅबच्या बाहेरच चकाट्या पिटत बसले.

    दुपारी तीन - साडे तीनच्या सुमाराला पहिला प्रॉब्लेम सुटला, आणि एकच कल्ला झाला. उरलेले चार प्रॉब्लेमही त्याच पद्धतीने पाच मिनिटात सुटले, आणि सगळं टोळकं समीरच्या घराकडे निघालं. वाटेत आमचा अधून मधून उगवणारा ‘गेस्ट स्टुडंट’ भरतपण भेटला, ग्रूपचा सदस्य या नात्याने सगळ्यांबरोबर तोही निघाला.

    बिल्डिंगच्या दारातच बीयरचे क्रेट घेऊन येणार्‍या समीरने आम्हाला बघितलं. ही पोरं पण ना, नको तेंव्हा खिंडीत पकडतात. समीरने नक्कीच मनातल्या मनात लाखोली वाहिली असेल. तरीही बिचार्‍याने सगळ्यांना घरात घेतलं.

    "Hey Sameer, remember you said if more than one person solves the problems at the same time, you will take all of them to Oberoy..."

    "बरं मग?"

    "ऍक्च्युअली, आमच्यापैकी प्रत्येकानी हे प्रॉब्लेम्स एकाच वेळेला सोडवलेत."

    "ओह, ग्रेट!"

    "मग, ओबेरॉय? क्वेरीज दाखवू तुला?"

    "अरे नही. आय ट्रस्ट यू गाईज, यार. हम लोग जायेगे ओबेरॉय. धिस वीकेंड."

    कदाचित आधीच बीयर घेऊन प्रवेश करणार्‍या गुरूवर्यांना एवढ्या शिष्यांनी बघितल्यामुळे इज्जतचा फालुदा झाला होता, त्यात परत क्वेरीज चेक करून गोत्यात यायची समीरची इच्छा नसावी :). त्याने आपला शब्द फिरवला नाही.  पण आमचं बॅडलक खराब, त्यामुळे नेमका रविवारी त्याच्या मुलीचा खेळताना खांदा निखळला. ‘ओबेरॉय’ची पार्टी शेवटी त्याच्या घरीच झाली.

    कोर्स संपला, दहा दिशांनी आलेले सगळे आपापल्या दिशांनी निघून गेले. हळुहळू फोन, मेल्स थंडावल्या. अजूनही ग्रूपमधलं कुणी भेटलं म्हणजे ‘ओबेरॉय’च्या किश्श्याची आठवण हटकून निघते.

10 comments:

रोहन... said...

अगं हे तत्सम ओरॅकल (एसक्यूएल-पीएलएसक्यूएल) मी पण केलंय... पण त्याची परीक्षा वगैरे दिलीच नाही.. :) आता मला असा कोणी ओबेरॉयला घेऊन जाईन असे म्हणाला असता तर केला असता ट्राय... :) हेहे.. पण ओबेरॉयला कधीतरी जाऊन येच हा... :) ह्या कोर्सची आठवण काढत.. :)

Anand Kale said...

मला वाटलं त्यालाही ता-यांच बेट दिसलं की काय ;)

Gouri said...

रोहन, मोटिव्हेशन पाहिजे नाही का परीक्षा द्यायला ;)

Gouri said...

आनंद हे हे तार्‍यांचं बेट :D ...
मुलीने वाचवलं त्याला, नाही का?

Suhas Diwakar Zele said...

सही आहे..ताऱ्यांचे बेट आठवला :)
अश्या कल्पना आम्हीसुद्धा वापरतो ट्रेनिंगमध्ये आणि कधीतरी पुर्ण देखील करतो ... :) :)

Gouri said...

सुहास, तार्‍यांचं बेट बघायचाय अजून. आनंदच्या, तुझ्या कॉमेंटने आठवण करून दिली.

Raj said...

'नियत देखते है' हा वाक्प्रचार बरेच दिवसांनी ऐकला. मस्त किस्सा. :)

Anagha said...

ते तुझे कम्प्यूटर प्रोग्रॅम्स काही कळत नाहीत मला...पण आमचे सर आम्हांला सांगायचे...की जर चांगलं आणि नियमित स्केचिंग केलं तर मी छानशी स्केचबुक भेट देईन ! आणि मी मिळवली होती एक स्केचबुक त्यांच्याकडून ! त्याची आठवण झाली ! :)

Gouri said...

राज, :)

Gouri said...

अनघा, असं काही मिळणार असलं ना, विशेषतः शिक्षकांकडून, की मग एकदम उत्साह येतो. त्या वस्तूच्या किंमतीपेक्षा ती बक्षीस म्हणून मिळणं महत्त्वाचं असतं ना!