ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे ॥
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे ॥
उजेडी राहिले, उजेड होऊन
‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे?
म्हणजे magnolia champaca
म्हणजे michelia champaca
म्हणजे supramental psychological perfection
म्हणजे जगातलं सगळ्यात महागडं परफ्यूम ज्याच्यापासून बनवतात ते joy perfume tree,
म्हणजे
रोज मी या झाडाच्या नव्याने प्रेमात पडते आहे. त्यामुळे ‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे अजून काही वेगळं असतं असं सांगायचा तुम्ही प्रयत्नच करू नका. त्याला फक्त माझ्या छोट्याश्या गच्चीचा राजा मानायला मी तयार नाही.
गेले कित्येक महिने मला बागेकडे बघायला वेळ नाही. रोज सूर्य उगवतो, त्यांना प्रकाश देतो. रोज पाऊस पडतो, त्यांची तहान भागवतो. (आणि रोज मी जाऊन करंटेपणाने फक्त फुलं काढते ... वेळ नसल्याच्या सबबीवर :( ). आणि तरीही माझं हे छोटंसं सोन्याचं झाड भरभरून फुलतंय. बाहेरच्या पाकळ्या सोनेरी, आतल्या भगव्याकडे झुकणार्या. आणि फुलात न मावणारा गंध. बस्स, जन्नत!
12 comments:
सुंदर गं !!! अजून टाक ना फोटो पण !! म्हणजे कळेल ना नक्की कसं दिसतं ते ! :)
अनघा, अग आपला सोनचाफा आहे हा ... त्याची सगळी अनोळखी नावं टाकली आहेत मी :D
ओळखत नाहीये का फोटो?
अजिबात कळलं नाही हं मला ! :) :)
अनघा, सोनचाफ्याची पावसात नुकतेच न्हालेली आठ दहा ताजी फुलं काढल्यावर त्यांचा फोटो काढला की तो असा दिसतो ;)
आणि मीच भेटले ना तुला फिरकी घ्यायला ?! :D
कैवल्य म्हणजे सोनचाफा होय! गुगली चांगला होता. ;)
अनघा, राज, :)
गौरे मस्त आहे फोटो आणि त्यापेक्षा तू समजावून दिलस नावाचं हे बरीक चांगलं केलं नाहीतर अपुन की तो बोंब लगी थी...
>>नाहीतर अपुन की तो बोंब लगी थी...>>
बरेच दिवसांनी हा वाक्प्रचार ऐकला. :ड्
अपर्णा, हे माझं (अर्थात माझ्या सोयीचं) इंटरप्रिटेशन आहे ‘अंगणात झाड कैवल्याचे’चं :D
बाकी, ती सगळी नावं वाचून एकदम भारदस्त वाटतं ना? ;)
Post, photo, ani phula, he tinahi uttam. :)
Peeves, आभार!
Post a Comment