गेला आठवडाभर वेळ मिळाला की कासचं पुस्तक, फोटो आणि गुगल असं चाललंय. आपण तिथे २० - २५ प्रकारची रानफुलं बघितलीत, आणि त्यातल्या बहुतेकांची नावंही सापडलीत. एव्हाना कासचे एकसो एक सुंदर फोटो सगळ्यांनी टाकलेत ... पण तरीही मला मोह आवरत नाहीये थोडे फोटो शेअर करण्याचा ...
Neanotis Lancifolia - तारागुच्छ |
smithia hirsota - कवला / मिकी माऊस |
vigna vexillata - हळुंदा / रानपावटा / हत्तीची सोंड. (अनघाने क्लिप टाकली आहे ते हेच फूल.) |
पंद |
Utricularia Purpurascens - सितेची आसवं |
clerodendron serratum - भारंगी |
(बहुतेक) Utricularia lateriflora |
गावेल |
pleocaulus richie - टोपली कारवी |
Murdannia crocea subsp. ochracea - अबोलिमा |
Impatience / balsom - तेरडा |
Murdannia graminea |
cyanotis tuberosa - नभाळी |
याचं नाव नाही सापडलं. |
झाडाच्या फांदीवरचं शेवाळं :) |
22 comments:
वाह वाह... धन्स !!
सुहास, आभार रे!
माझ्या लिंकवरली फुलांची नावं मला तू मेल करूनही समजली नव्हती. आज समजली.
पंकज, नावं जाऊ देत ... पण तुझे फोटो (नेहेमीप्रमाणेच) उच्च आलेत.
कशी गं ती बाय माझी !! अभ्यासू !
ह्याचीच वाट बघत होते मी ! मस्त ! फोटो मस्त...नाहीतर मला त्या अभ्यासपुस्तिकेतील फोटो अजिबात आवडले नव्हते !!
झकास !:)
अनघा + रजनी !
अनघा, :D:D
पंकज, आपल्या सगळ्यांचे कासचे / रानफुलांचे फोटो एकत्र करून आता एक पीडीएफ पुस्तिका बनवू या :)
माझ्याकडे कासचे फोटोच नाहीत. गर्दीमुळे मी कधी तिकडे फिरकलोच नाही.
रायरेश्वराला जाऊया का एकदा? पाचगणीपेक्षा मोठे पठार आहे तिथे. आणि या दिवसांत फुलंच फुलं.
पंकज, रायरेश्वराला जायला आवडेल ... किती वेळ लागतो? कधीपर्यंत सिझन असतो?
सीजन अजून एखाद-दोन आठवडे असेल फक्त. जवळच आहे. भोरपासून फक्त आठ किमी. तासाभराचा ट्रेक आणि नंतर pure bliss.
मी या वीकेंडचा प्लान करायच्या विचारात आहे.
thanks Gauri...
पंकज, सध्या ट्रेक आवाक्याच्या बाहेर आहे :(
अभिषेक, आभार :)
गौरी मला सगळी मराठी नाव खूप आवडलीत...मस्त फोटो...
(आणि ही कमेंट देताना मला उगाच तीन चार मोठी मंडळी बोलताहेत त्यात तोंड घातल्यासारख का वाटतय काय माहित ..)
अपर्णा, मस्तच आहेत ना मराठी नावं? डॉ. संदीप श्रोत्रींच्या ‘पुष्प पठार कास’मध्ये मिळाली.
कोण मोठी मंडळी बोलताहेत ते मला ऐकू का येत नसावं बरं? (विचारात पडलेली बाहुली) :)
I LOVE THIS POST!!! I feel like I know a lot about you after seeing these pictures!
India is a land of many festivals, known global for its traditions, rituals, fairs and festivals. A few snaps dont belong to India, there's much more to India than this...!!!.
visit here for India
unlucky, ब्लॉगवर स्वागत!
Tula pratyek fulache naav kase mahit???
:-O
Too much. Seriously as anagha said, Abhyasu ahes ekdum!!
~G, डॉ. संदीप श्रोत्रींचं पुस्तक मिळालंय. ते सोबत घेऊन गेले होते कासला. पुस्तक + गुगलबाबा अश्या पद्धतीने सगळी नावं मिळाली. एवढाच अभ्यासूपणा केलाय. :)
सर्व फोटो आवडले,
कवला- मिकी माऊस मस्तच
सुनिल, प्रतिक्रियेसाठी आभार!
Post a Comment