ही पोस्ट वाचण्यापूर्वी हे वाचा.
आता तुम्हीच ठरवा, मला ही कॉफीत पेस्ट वाली पोस्ट लिहायची गरज आहे का? त्यामुळे हे टायपायचं मी टाळणार होते. अनघाचं म्हणणं असं, की हे एकाच विषयावरचे दोन वेगवेगळे निबंध आहेत. भोगा आता अनघाच्या कर्माची फळं ;)
*************************************
त्या दिवशी वीज गेली आणि एकटीच मेणबत्ती लावून घरात बसले होते. एक पतंग मेणबत्तीकडे झेपावत होता. त्याला बरंच समजावायचा प्रयत्न केला, बाबा रे, हा सूर्य नाही - साधी मेणबत्ती आहे. मेणबत्तीला आयुष्याच्या केंद्रस्थानी धरशील, तर तुझा ऍंगल चुकेल. उगाचच जळून जाशील, आणि मेणबत्तीही विझेल. त्याला काही पटलं नाही. शेवटी जे व्हायचं ते झालंच.
ऑफिसच्या वाटेवर त्या पतंगाच्याच वेडेपणाने जिवाचा आटापिटा करून एकमेकांना ओलांडत चाललेली वाहनं दिसतात. त्यांना पाहून वरून तो पण असाच म्हणत असेल ... बाबांनो, इतक्या जोरात चाललाय, पण तुमचा ऍंगल चुकतोय. उगाच जीव गमवाल आणि माझा प्लॅनही खराब कराल. याही पतंगांना वरून सांगणार्याचं म्हणणं पटत नाही. आपली ओढच खरी म्हणून ते आपल्याच वेगात धावत राहतात. ‘त्या’च्या दृष्टीने यांचा खेळही काही मिनिटात अटपत असणार. तोही शांतपणे म्हणत असेल ... अजून एकाचा ऍंगल चुकला!
*************************************
तळटीप: नंतर सुचलेला सुविचार: अनघाचं लिहिणं देखणं, म्हणून आम्ही काय पोस्टूच नये काय? :D :D

14 comments:
ऍंगल तसा चुकत कोणताच नाही ... एकाला/एकीला जे चूक वाटत ते दुस-या कोणाचा तरी ऍंगल असतो ...म्हणजे दर वेळी नवा ऍंगल तयार होतो अस असत बहुतेक!
सविता, खरंय. आपण कुठून बघतो याप्रमाणे अपल्याला बरोबर वाटाणारा ऍंगल ठरतो ... दुसर्याला आपल्यापेक्षा लांबचं दिसत असू शकेल हे मात्र विसरतो आपण :)
>> अनघाच्या कर्माची फळं
आणि तळटीप !!! लोळालोळी !! :))
पोस्ट आवडलंच पण तळटीप अत्यंत जोरदार :) ... पुलं च्या पुण्यातल्या आहेत या ब्लॉगलेखिकाबाई :).... मला एकदम ते असामितले ’राजहंसाचे चालणे’ ऐकू यायला लागले :)
हेरंब, :D
तन्वी, बरोब्बर ... हे राजहंसाच्या चालण्याच्याच चालीवरचं आहे :D
मस्त ग, हा एंगल आवडला! थोड्या थोड्यात खुशी आहे म्हणाव कि थोड्या थोड्या साठी हावरट पणा म्हणावा!
बाकी पतंगांची भाषा येते कि काय तुम्हाला!
अभिषेक, पतंगांची भाषा शिकायची सुरुवात माणसांची भाषा शिकण्यापासून करावी असं म्हणते आहे :D :D
मला हसायलाच येतंय !! गौरे !! :D :D
खो खो हसत सुटले मी वाचून ! :D
मला हे नाव आणि त्यामागचा विचार आवडला...चुकलेला एँगल.
त्या क्षणी त्या त्या माणसाचा एँगल चुकणे हेच देवाने त्या त्या माणसांसाठी लिहून ठेवले असावे. त्यामुळे 'सगळं कसं...मनात ठरवल्याप्रमाणेच घडतंय'...असं म्हणत असावा तो बहुतेक. :)
असली कर्मं अनघाने कायम करत रहावीत.
अनघा, कधी कधी आपण अगदी नीट हिसोब करून खड्ड्यात जात असतो असं वाटतं मला ... वरून बघणार्याला कसली गम्मत वाटात असेल ना हे सगळं बघताना :)
पंकज, अनघाने असली कर्मं अधून मधून करावीत. नेहेमी केली, तर माझा अनियमिततेचा पण मोडेल ना :D
मीही एक कर्म करतो आहे. कॅमेरासाठी. त्या कर्माची फळं भोगायालाही सगळे ब्लॉगवाचक तयार आहेत.
ह्म्म. कर्माची नोंद घेण्यात आलेली आहे.
बाकी कॅमेर्यात फोटू काढल्यानंतर पण प्रोसेसिंग करायला लागतं ना ... त्यावर आपण आधी बोलू या. कसं? ;)
तुझे दोन्ही फोटो बघितलेत. B&W खासच. टाकते ब्लॉगवर. PP मध्ये मी अजून तरी विशेष काही प्रयोग करून बघितलेले नाहीत. त्यासाठी काही टिप्स, लिंक इ. असेल तर दे ना.
Post a Comment