कधी कधी एखादा फोटो मनासारखा जमून जातो, आणि आपल्यालाच मस्त वाटतं. असाच मला आवडलेला एक आजी आणि नातीचा फोटो. इथे टाकलेला. या फोटोला मिळालेली बेश्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे पंकजने त्यावर पीपी करून दिलंय - या त्या फोटोच्या पंकजने एडिट केलेल्या व्हर्जन:
मला यातली दुसरी व्हर्जन सगळ्यात आवडलीय. मूळ कलर फोटोपेक्षाही.
6 comments:
मस्त मस्त. पण मला कलरही आवडला. दूरवरचा प्रकाश आणि जवळचा अंधार यांचा कॉन्ट्रास्ट मस्त आलाय.
एखाद्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मस्त दिसेल हा फोटो. :)
राज, मुखपृष्ठाची मस्त आयडिया. मग आता या मुखपृष्ठाला साजेसं पुस्तक लिहायला हवं ;)
:D
चला ! आमच्या गौरीला कारण मिळालं पुस्तक लिहायला ! :)
कॉन्ट्रास्ट वाढवल्याने दुसऱ्या फोटोत अधिक डेप्थ मिळालेय.
फोटोशॉप हा फार कठीण प्रकार नाहीये. पटकन शिकशील तू.
:)
अनघा, अग पुस्तक मीच लिहायला हवं असं कुठंय? ;)
मी थोडेफार प्रयोग पिकासामध्ये करून बघते अधून मधून - पण फोटोशॉप इंटरेस्टिंग वाटतंय. much more powerful. शिकायचंय.
गौरे, मला म्हणायचं काही वेगळंच होतं...आणि जे मी टाइप केलंय त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघतोय ! :( मला दिवसभर हे त्रास देत होतं...पण वेळ नाही मिळाला सुधरायला !
अगं, मला म्हणायचंय की आता आमची गौरी अशा छान छान फोटोंच्या निमित्ताने पुस्तक लिहील !
आणि मी रात्री बघ ना काय लिहून ठेवलंय ! झोपेत होते वाटतं ! :)
अनघा, तुझ्या कॉमेंटचा वेगळा अर्थ निघू शकतो हे मला काल तुझ्याशी बोलल्यावरच लक्षात आलं. :) बोलण्याच्या / लिहिण्याच्या ओघात होतं असं कधी कधी ... एवढं मनावर नको घेऊस.
Post a Comment