गेल्या आठवड्यात ऑफिसमध्ये एक ट्रेनिंग होतं. सकाळी घाईतच घरून निघायला लागत होतं, त्यामुळे झाडांशी निवांत गप्पा होत नव्हत्या. शनिवारी ३-४ दिवसांच्या खंडानंतर जरा बारकाईने बघितलं, तर सोनचाफ्याच्या झाडावर हे सापडलं ...
घाईत, अगेन्स्ट लाईट, वार्यावर हलणार्या पानाचे फोटो काढलेत. त्यामुळे फार स्पष्ट नाहीत. :(
सध्या मी याला ‘बागुलबुवाची कात’ असं नाव दिलंय. :)
चार दिवसांपूर्वी या पानावर हे दिसलं नव्हतं. नक्की.
गोगलगाईने शंख उतरवून ठेवल्यावर अजून एक आवरण उतरवून ठेवावं, तसं काहीसं दिसतंय हे. पण मग शंख आणि गोगलगाय कुठे गायब झाली?
चार दिवसात एवढी जाडजूड होणारी खादाड आळी असावी असं म्हटलं, तर तश्या खादाडीच्या खुणा जवळपासच्या पानांवर नाहीत.
कुठल्या पक्ष्याने आणून टाकलं म्हणावं, तर पानाला खालच्या बाजूने, कोळ्याच्या जाळ्यासारख्या नाजूक धाग्याने हे चिकटलं होतं.
गुगलूनही फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे बरेच कीटक, आळ्या कात टाकतात हे समजलं, पण अशी एकसंध नाही.
फोटो काढल्यानंतर पानावरून हे कवच काडीने काढून टाकलं. ते इतकं नाजुक होतं, की काडीच्या स्पर्शानेही तुटत होतं - पण नाजुक धाग्याची पानावरची पकड एवढी घट्ट, की आवरण तुटलं, तरी धागे कायम!
माझं लक्ष नसताना कोण कारभार करत असावं बरं बागेत? :) :)
22 comments:
अगेन्स्ट लाईट, वार्यावर हलणार्या पानाचे फोटो काढलेत. :-)
काय ते आता समजून घे.
पंकज, :D:D
खरं म्हणजे रोहनने नुकताच एसएलआर घेतलाय. हे यश तुला आधी सेलेब्रेट करायला हवं. ;)
इतक्या नाजूक आणि देखण्या प्रकाराचा "बागुलबुवा" कशाला करायचा!
एवढे सूक्ष्म निरीक्षण करायला मन जेवढे संवेदनाक्षम असावे लागते तेवढाच कॅमेराही. दोन्हीही धार्जिणे झाल्याचे हे एक अनोखे प्रकरण आहे.
शाब्बास! अशाच आणखीही सुंदर कारनाम्यांकरता हार्दिक शुभेच्छा!
गोळे काका, आभार!
याला बागुलबुवा म्हणायचं कारण लिहिलंच नाही मी पोस्टमध्ये ... शाळेत असताना एक बागुलबुवाचं गोंडस चित्र बघितलं होतं ... त्याची आठवण झाली हे कवच बघून. म्हनून बागुलबुवाची कात. :)
नमस्कार गौरी,
ही पोस्ट छान आहे.
माझा ब्लॉग वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. सर्व पोस्ट वाचण्याएवढा वेळ आपण दिलात.
तुमचा ब्लॉग वाचून फार पूर्वीच मी काढलेले काही फोटो तुम्हाला पाठवायचा विचार होता. ही माझी अगदी अलीकडे विकसित झालेली आवड आहे. योगायोगाने आपणच माझ्या ब्लॉगला प्रतिक्रिया दिलीत. परवानगी असल्यास काही काही फोटो पाठवू इच्छितो.
माझ्या पुण्याच्या घराभोवती मिरची, कोथिंबीर यासाठी एक जागा केली होती. पण ती रोपे जगली नाहीत...वाईट वाटलं. पंधरा वर्षांपूर्वी लावलेला अशोक मात्र डौलानं उभा आहे.
- केदार
केदार, ब्लॉगवर स्वागत!
अनुवाद हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे अनुवादाविषयीचा ब्लॉग दिसल्यावर तो वाचणं ओघाने आलंच. बागेचे फोटो बघायला नक्कीच आवडतील. तुम्ही mokale.aakash@gmail.com इथे फोटो पाठवू शकता.
आकाश मोकळ झाल... आणि सुरवंटराव पतंग बनून उडून गेले! :)
हम्म, बागुलबुवाचा छडा कमेंट वाचून लागला...
अभिषेक, सुरवंटाचा पतंग होताना बघायला मिळायला हवं. हे फार सुंदर दृष्य असतं म्हणे. आता असा दुसरा कोष कुठे दिसतोय का म्हणून जोरदार शोधमोहिम हाती घ्यायला हवीय बागेत.
अरे वा! सुरवंटराव ग्रॅजुएट झाले म्हणायचे. :)
डिस्कव्हरीवाले अशी गोष्टी दिसल्या की दिवसेंदिवस ठाण मांडून बसतात.
राज, एकदा हा ग्रॅज्युएशनचा सोहोळा बघायचाय. कधी संधी मिळेल का माहित नाही.
गौरी, ब्लॉगची नक्षी बदलली आहे. आता सर्व प्रतिक्रिया दिसतात.
कृपया, पहा.
संगीतामध्ये काय ऐकता..जास्त ?
'डिस्कव्हरीवाले अशी गोष्टी दिसल्या की दिवसेंदिवस ठाण मांडून बसतात'.
खरोखर ना...? :)
कसलं नाजूक दिसतंय हे !
काय काय घडत असतं गं बाई तुझ्या ह्या बागेत !
आल्याचं फूल आठवलं एकदम ! :)
केदार, आभार, आणि सॉरी. गेले तीन दिवस इकडे फिरकताच आलं नाही, त्यामुळे उशिरा प्रतिक्रिया लिहिते आहे. तुमचा ब्लॉग बघितला. आता वाचायला सोपं जातंय. संगीतातलं मला काहीही कळत नाही, पण ऐकायला आवडतं. शास्त्रीय, कधी जुनी गाणी, कधी नवी गाणी. सध्या ‘कुन फायाकुन’ची पारायणं चालू आहेत :)
अनघा, पहिल्यांदा हे बघितलं, आणि ते काधायला सरसावले. जवळून बघितलं, आणि त्याचा नाजुकपणा जाणवला. मग काडी टाकली, कॅमेरा आणला, आणि हा उद्योग केला :) एक-दोन दिवस आधी दिसलं असतं, तर डिस्कव्हर करायची संधी होती ;)
गझल आवडतात का..? तुम्ही गाता का स्वत:?
केदार, मला गाणं अजिबात येत नाही :)
गझल अजूनतरी कधी विशेष आवडीने ऐकल्या नाहीत.
'उमराव जान' पाहिला आहे का, हा प्रश्न निरर्थक आहे. पाहिला असेल. त्यातील सर्व रचना गझला आहेत.दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए..
...रेखाही आवडत असेलच.
केदार, आवडणार्या गझला तेवढ्याच. बाकी गुलाम अली, जगरजित सिंग, मेहंदी हसन, फरिदा खानूस वगैरे अस्सल गझल वाले समजतही नाहीत आणि विशेष आवडलेही नाहीत.
काय भीषण शुद्धलेखनाच्या चुका केल्यात मी वरच्या कॉमेंटीत! एका वाक्यात जगजित सिंग आणि फरिदा खानुम दोघांचा खून पाडलाय हे आत्ता वाचलं.
भ्भारी... :D
सौरभ, असलं काही बागेत सापडलं की एकदम सही वाटतं! :)
Post a Comment