खडू / ख.डू.: सा. नाम. व्युत्पत्ती - खयालो मे डूबे. वाक्यात उपयोग - त्याचा / तिचा खडू झालाय.
कॉलेजात असताना असा मधून मधून कुणाचा तरी खडू व्हायचा. सद्ध्या माझा खडू झालाय. त्यामुळे ब्लॉग हायबरनेशन मध्ये. पण आहे, ब्लॉग जिवंत आहे. एवढा खडू संपला की येतेच परत.
तोवर हा एक जुनाच फोटो ...
त.टी. - फोटोचा आणि पोस्टचा संबंध - काहीही नाही. खूप दिवसांनी इथे काहीतरी आलंय म्हणून वाचायला कुणी आलं, तर त्यांची अगदीच निराशा होऊ नये म्हणून फोटो टाकलाय.
22 comments:
निराशा! खडू काय प्रकार असतो ते तरी कळल! येथोनी आनंदू रे आनंदू :)
अभिषेक, बरंच लिहायचंय, पण सद्ध्या लिहिताच येत नाहीये :(
कैच्याकै !
पंकज, पोस्ट (?) अती कैच्याकै. फोटो मात्र माझा आवडता आहे. संध्याकाळचा सूर्यप्रकाश त्या गुलाबाच्या फुलावर मागून / बाजूने पडत होता. पाकळ्यांची एक एक शीर स्पष्ट दिसावी असा. आणि फुलाचा पांढरा रंग अक्षरशः चमकत होता. (एवढी मोठ्ठी गोष्ट त्या एवढ्याश्या फुलाला कितपत सांगता येतेय माहित नाही, पण प्रयत्न केलाय.)
:) पण कसले खयाल आहेत हे तुझे ? डुबून गेलीयस ती एव्हढी ? ते कधी सांगशील ? :)
अनघा, जरा त्या खयालातून धड बाहेर डोकावू दे. मग सविस्तर सांगते :)
सध्या सर्वांनांच खडु झालाय ;)
माझं कसलं नशीब आहे ना... माझा फोडु झालाय.
फोडु’चा अर्थ तुम्हीच सांगा आता.
म्हणून बहुतेक खडू एवढ लिहितो नंतर .. खयालोंमे डूबनेके .. म्हणजे बाहेर आनेके बाद :-)
आम्हाला न शाळेत मास्तर खडू फेकून मारायचे ....आमचा ख डू झाला कि...वर ओरडायचे पण काय रे... कुठेय लक्ष ?
मग आमचा ख डू चा चुरा होऊन तो बिचारा पाय्काहाली येऊन जमिनीवर विखरून जायचा !! तू मात्र सांभाळ ह तुझ्या `ख डू' ला .... !!
(ख) डूबा डूबा रहता हु... असे बोलायला हवे म्हणजे आता... पण खडू का? ख'मे'डू का नको ??? :)
वेलकम टू खडू क्लब :)
योमू+१
फोटो मला आवडला. काय शिजतेय गं! कळू तरी दे... तोवर फोटू टाकत राहा. :)
योगेश, :)
पंकज, फोटोग्राफी मे डूबा म्हणत असशील, तर ‘सद्ध्या झालाय’ म्हणणं बरोबर नाही ... नेहेमीच फोडू असतोस ना? :)
सविता, बरोब्बर :)
राजीव, आम्हाला पण शाळेत खडू आनि डस्टरचा प्रसाद मिळायचा खडू झाला म्हणजे!
रोहन, तो मध्यमपदलोपी समास आहे :D :D
हेरंब, मला वाटलं होतं माझाच खडू झालाय. पण इथे रंगीत खडूंचा अख्खा बॉक्सच दिसतोय ! :)
श्री ताई, बिरबलाची खिचडी आहे. शिजायला जरा वेळ लागतोय :)
राजीवकाका +१!
मध्यमपदलोपी समास... कैच्याकै... :D
.......पण अनेक वर्षांनी ऐकला हा शब्द.. :)
Post a Comment