Tuesday, February 14, 2012

कुसुदामा बॉल

कुसुदामा हा एक ओरिगामीसारखाच जपानी  प्रकार आहे. ओरिगामीत कागदाच्या फक्त घड्या घालतात, कुसुदामा म्हणजे ओरिगामीचे आकार चिकटवून तयार केलेला बॉल.  या ब्लॉगवर पहिल्यांदा याचे फोटो बघितले, आणि मी या कल्पनेच्या प्रेमात पडले. तिथेच ट्युटोरियलची लिंकही मिळाली. हा मी केलेला प्रयोग:

कुसुदामासाठी फुलं

आणि हे एंड प्रॉडक्ट:

कुसुदामा बॉल

 हे अजून आकर्षक रंगात करता आलं असतं. कागद असतील तसे पूर्ण वापरण्याचा परिणाम म्हणजे मूळ ट्युटोरियलपेक्षा हे जरा गरीब दिसतंय.  त्यात मी फेविकॉलएवजी गमस्टिक वापरून चिकटवल्यामुळे बिचारा कुसुदामा रात्री सुटा झाला, आणि सकाळपर्यंत सगळ्या फुलांचं निर्माल्य झालं. त्यामुळे मी त्याचं नाव सुदामा ठेवलंय.  :)

खेरीज बायप्रॉडक्ट म्हणजे असा अर्धवट निघालेला बॉल पुन्हा चिकटवायला दुप्पट चिकाटी लागते, गमस्टिक वापरातून पुढे भरपूर गम ला तोंड द्यावं लागतं हे ज्ञान यातून प्राप्त झालं.  :D

16 comments:

Raj said...

वा! सुदामा फारच मस्त आहे.
इथे फेविकॉलची ऍडही मस्त होईल. गम (स्टीक) को दूर भगाए, फेविकॉल. :)

Gouri said...

राज, फेविकॉल अपनाओ, गम भगाओ! :D :D

हेरंब said...

मला वाटलं वाईट सुदाम्याची गोष्ट सांगते आहेस की काय ;)

Anonymous said...

गौरे फार सुरेख जमलय गं... खूप खूप मस्त :)

Madhuri Kulkarni said...

मस्तय कुसुमादा! वेगळ वाटतंय.

Gouri said...

हेरंब, वाईट जपानी सुदामा :D

Gouri said...

तन्वे, सोप्पंय. फक्त चिकाटी पाहिजे. आणि भरतकाम शिवणकामाची तुला आवड आहे म्हणजे तुझ्याकडे चिकाटी असणारच, बाय डिफॉल्ट. :)

Gouri said...

माधुरी, :)

Anagha said...

सुंदरेय गं ! :)

Gouri said...

अनघा, त्या पाकळ्या कसल्या गोड वाटातात ना ... आणि गंमत म्हणजे मला सगळे कागद फोल्ड करून होईपर्यंत पत्ता नव्हता कुठले रंग बाहेर दिसणार, कुठले झाकले जाणार म्हणून :)

aativas said...

पण 'कुसुमादा' म्हणजे काय?

Gouri said...

सविता, ‘कुसुदामा’ असा असतो. ‘कुसुमादा’ नाही माहित बुवा :)

aativas said...

शब्दच चुकला वाटत टन्कताना .. पण तेच - 'कुसुदामा'म्हणजे काय? त्याचा अर्थ काय?

भानस said...

फारच मस्त दिसते आहे गं एंड प्रॉडक्ट. करून पाहायला हवे. :)

Gouri said...

सविता, मी उगाचच फिरकी घेतली. सॉरी. कागदाचे एका आकाराचे तुकडे चिकटवून / शिवून तयार केलेल्या कलाकृतीला जपानी भाषेत कुसुदामा म्हणतात. हा एक पारंपारिक जपानी प्रकार आहे. हा ओरिगामीचाच प्रकार आहे, का याचा ओरिगामीत समावेश करायचा नाही याविषयी जाणकारांमध्ये मतभेद आहेत. कुसुदामाविषयी अधिक माहिती इथे आहे: http://en.wikipedia.org/wiki/Kusudama

Gouri said...

श्रीताई, बघच ग करून ... मजा येते करायला.