गोरं गोरं खोड, सोनेरी पिवळ्या फुलांचे झुंबरासारखे घोस, आणि त्याला उठाव देणार्या तपकिरी लांबच लांब शेंगा ... कसलं देखणं झाड आहे हे!
इतकं नाजुक वाटाणारं हे झाड, पण हे फुलतं वैशाखवणव्यात. बहाव्याची ऐट बघायची ती उन्हाळ्यातल्या टळटळीत दुपारी. दुपारच्या उन्हात या फुलांना काय झळाळी येते!
12 comments:
:) मी पण लावलाय बहावा...पेणच्या माझ्या बागेत ! खूप आवडतं मला हे झाड !!!
मला कधी लावायला मिळणार बहाव्याचं झाड!
बहावा.. म्हणजे अहाहा!! सुंदरच.. :)
आला उन्हाळा,आरोग्य सांभाळा..असे आपण वाचतो. त्याऐवजी आला उन्हाळा, पहा बहावा..असे काहीसे आपण सुरु करायला हवे. गुलमोहर आणि बहावा ही देवाने ठरवून उन्हाळ्यातच फुलायला लावलेली झाडं. प्रियकर प्रेयसीच्या भेटी गुलमोहराच्या साक्षीने झाल्याचे वाचले आहे. बहाव्याच्या साक्षीने झाल्याचे वाचलेले नाही. मात्र, एखादा प्रियकर प्रेयसीला बहाव्याच्या फुलांचा गुच्छ देऊ शकतो. तिचा गोरा चेहरा त्या पिवळ्या रंगांच्या सोबतीने आणखी खुलेल..!
गौरी, माझ्या घराच्या जवळही बहावा आहे. त्याला निव्वळ बघण्याचा आनंद या मोसमात मी घेतो.
बहावा..सोनमोहोर.. गुलमोहोर...उन्हाळ्यात फुलणाऱ्या ह्या फुलांनी वेड लागत.... :)
आणि बहाव्याला एक विशिष्ट वास येतो मंद मंद....मेंदीसारखा :)
@ रोहन, :)
केदार, खरंय. बहाव्याचा रंग रणरणत्या उन्हात जसा खुलतो, तसा एरवी खुलत नाही. आणि बहावा बघायला मिळणं ही एक उन्हाळा सुसह्य करणारी गोष्ट असते!
सुप्रिया, बहाव्याच्या शेंगेचा वास बघितलाय, फुलांचा नाही. आता फुलांचा वास घेऊन बघायला पाहिजे!
दिल्लीत तर आता एकदम बहावा फुलतो आहे ..:-) नेहमीचे रस्ते ओळखू येत नाहीत मग!
सविता, दिल्लीतली - म्हणजे साऊथ दिल्लीतली झाडं बघून डोळे निवतात अगदी. दिले आणि सप्तपर्णी हे तर माझ्या डोक्यात पक्कं बसलंय! :)
मस्त फ़ोटो ..
मागे एकदा माझा एक मित्र म्हणाला होता की जी पश्चिमेकडून भारतात आलेली झाडं आहेत ती पश्चिमेच्या स्प्रिंगमध्ये म्हणजे आपल्या उन्हाळ्यात फ़ुलतात..म्हणजे ते त्यांचे सिझन्स इथेही फ़ॉलो करतात..तुला कदाचित महित असेलच ते...
बहावा आपला की त्यांचा मलाही माहित नाहीये..पण एक खरं ही सगळी फ़ुललेली झाडे आणि आमरस आपला उन्हाळा किती सुसह्य करतात नाही??
अपर्णा, बहावा अस्सल देशी आहे ग! त्यामुळे अजून जास्त कौतुकाचा. :)
पश्चिमेकडून आलेली झाडं भारतात अजूनही त्यांच्या मूळदेशातल्या वसंतातच फुलतात ही नवी माहिती. बाहेरून आलेली झाडं इथल्या हवामानाशी कसं जुळवून घेतात याची मला उत्सुकता आहे. इथला उन्हाळा, पावसाचा मर्यादित काळ, आणि हिवाळ्यातल्या झोपेचा आभाव ... कसं समजत असेल त्यांना?
Post a Comment