बघता बघता दिवाळी
आलीसुद्धा. काही म्हणता काही तयारी केली नाही दिवाळीची. आज मग एकदम खडबडून जाग
आली. काही नाही तर किमान कंदील तरी करावा!
साहित्य अर्थातच घरात
सापडलं ते. कुठल्यातरी प्रोजेक्टसाठी केंव्हाचा लाल रंगाचा कार्डशीट पेपर पडलेला
होता घरात. आईला आवराआवरी करतांना बटर पेपर सापडला, आणि एक काळं मार्कर सापडलं.
एवढ्या सगळ्या साधनसंपत्तीच्या सहाय्याने, माऊ उठायच्या आत जे काही बनवता येईल ते
बनवायचं असं उद्दिष्ट ठेवून डिझाईन (?) केलं. ;)
हे एंड प्रॉडक्ट –
अजून गो लाईव्ह बाकी आहे :
तुम्हाला सगळ्यांना
दिवाळीच्या शुभेच्छा! अशी आयत्या वेळची नाहीतर नीट नियोजन करून केलेली – दिवाळी
मस्त जाऊ देत तुमची!!!
20 comments:
माझा अजून बनवायचाय. हे मात्र भारी झालं.
पंकज, कसा बनवणार आहेस तू? यंदा काय तो निवांत बनवून घे ... पुढच्या वर्षीपासून तुलाही घाईघाईत, लपवून छपवून बनवावा लागणार आहे! :)
छान झालाय :-)
सविता, सोप्पाय एकदम! आणि पटकन होणारा! :)
दिवाळीच्या शुभेच्छा!
एकदम भारी झालाय आकाशकंदील! आमच्यासारख्या दोन डावे हात (डावखुरे नसलेले) असलेल्यांना चिनी बनावटीवर हौस भागवावी लागते!
मंजिरी, धन्यवाद! असलं काहीतरी सोप्पं करायला आवडतं मला ... फार वेळखाऊ गोष्टी परवडत आणि झेपत) नाहीत!
मस्त..
मी ही या वेळी घरी केला...
लिहावेसे वाटले तोवर हे वाचले ..
छान दिसतोय
awesome. But , pl do share the method too so that next year we also try at home.
भक्ती, तुझ्या कंदीलाचे फोटो टाक ना ग!
कीर्ती, अगदी सोपा आहे हा. याचा एक प्रोटोटाईप बनवला होता छोटा, तो आहे. त्याचा फोटो टाकते म्हणजे कसा केलाय ते समजेल. :)
कंदील अतिशय सुरेख झालाय गं गौरी!
" दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा! " :)
श्रीताई, तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा! चार दिवस नेटाला ऍक्सेस नव्हता त्यामुळे उशीराने!
यंदा इथेही सर्वत्र उशीर गं बाई.
तुझा कंदिल झकास आहे. Good girl :)
शुभेच्छा
अपर्णा, इन्स्टंट कंदील! :) असं काहीतरी केलं म्हणजे मग दिवाळीचा फील येतो ना!
wahhhh... bhariiii :)
Kiti circles waparli kalel ka gol complete vyayla? Me pan Karun Chrismas la friend la gift Karin mhante.
Hi Gouri mala marathit type karta yet nahi pan me tujhe sagle lekhan wachte
Kandil banavtana kiti circles waparli sangshil ka? Ani India madhe Mumbait me tujhi Idea waparun maitrinila Kandil gift kela tar tujhya design baddal tula chalel na?
Kiti circles waparli kalel ka gol complete vyayla? Me pan Karun Chrismas la friend la gift Karin mhante.
purnima, welcome!
Kirti, purnima, 20 circles vaparali ahet. detailed post takate ahe mi tyavishayi, pan saddhya mala limited access aahe, devanagari type karata yet nahiye. 22 / 23 dec la takate ajoon details.
पूर्णिमा, कीर्ती, टाकली बरं अखेरीस कंदिलावरची पोस्ट! :)
सौरभ, मस्तंय ना? :)
Post a Comment