Thursday, December 26, 2013

मोठी तिची सावली ...

एक होती बाहुली.
तिच्या बाबांची लाडकी.
बाबा शहाणे होते.
आपल्या बाहुलीने शहाणं व्हावं असं त्यांना वाटायचं.
त्यांनी बाहुलीला शिकवायला सुरुवात केली.
आपल्या बाहुलीच्या हातून असं पाप होत असलेलं कुणा घरातल्याला बघवलं नाही.
त्यानी काचेची पूड करून बाहुलीला भरवली.
संपली लहान बाहुलीची गोष्ट!

***

सद्ध्या मनीमाऊला दिवसातून एकदा तरी "लहान माझी बाहुली" ऐकायचं असतं. ते म्हणतांना रोज मला ही दीड शतकापूर्वीची बाहुली आठवतेच आठवते! डॉक्टर विश्राम रामजी घोले यांच्या लहान मुलीची ही चटका लावणारी गोष्ट. अशा किती बाहुल्या कुणाला न कळता हरवून गेल्या असतील!

***
हे वाचल्यावर आईने मला डॉ. अरुणा ढेरे यांचं डॉ विश्राम रामजी घोलेंवरचं पुस्तक काढून दिलं परत वाचायचं असेल तर म्हणून. बाहुलीची गोष्ट पुन्हा एकदा तपासली त्या पुस्तकात. तिला काचा कुटून कुणी भरवल्या त्याचा उल्लेख नाही पुस्तकात - नातेवाईकांपैकी कुणीतरी हे केलं असं म्हटलंय. तशी दुरुस्ती केलीय वर.

6 comments:

Priyaranjan Anand Marathe said...

Is the story real? Please tell me that it isn't.

Gouri said...

प्रियरंजन, बाहुलीची इतकी भयंकर गोष्ट रचायची माझी हिंमत नाही. दुर्दैवाने ही सत्यकथा आहे! :(

गौरी said...

चटका लावणारी बाहुलीची गोष्ट :(

Gouri said...

गौरी, हो ग! :(

Anagha said...

भयानक आहे ही गोष्ट. कधीच न विसरता येण्यासारखी.

Gouri said...

अनघा, ही गोष्ट मी वाचली असेल किमान चार - पाच वर्षांपूर्वी. अजूनही "लहान माझी बाहुली" म्हणतांना आठवतेच आठवते!