माऊला प्रथमच
भेटायला येणार्या एका आजीने तिला दाबल्यावर वाजणार्या प्राण्यांचा एक सेट आणला
होता दीड एक वर्षापूर्वी. तसा चांगला होता तो ... पण जांभळ्या रंगाचा उंट किंवा
गुलाबी हत्ती म्हणजे यक्क ... असले कसले रंग वापरतात हे लोक खेळण्यांना? काळा
हत्ती आणि पिवळसर मळकट राखाडी उंट बनवणं इतकं अवघड आहे का? त्या उंटाचे पाय तर
हिप्पोसारखे वाटताहेत!
त्यातलं एक एक खेळणं
वापरायला काढतांना सगळ्यात शेवटी, बाकीची वाजेनाशी झाल्यावर नाईलाजाने दोन
महिन्यांपूर्वी जांभळा उंट खेळायला बाहेर पडला. आणि पाहिल्याक्षणी माऊला एकदम
आवडला. रस्त्यात बघितलेला उंट आणि हा प्राणी एकच आहे याविषयी जरासुद्धा कन्फ्युजन नाही. सद्ध्या “ओंटो” मंमं, शीशी, आबू सगळीकडे सोबत असतो.
दीड वर्षाने का
होईना पण जांभळा उंट किती मत्त असतो ते समजलं एकदाचं आईला! तिच्या डोक्यातला असला सगळा
कचरा दूर करायला बरेच कष्ट पडणार माऊला. तशी थोडी थोडी सुधारते आहे ती ... परवाच आईने
माऊला जिराफावर बसलेलं हिरवं माकड आणलंय. :)
10 comments:
गौरी ,कित्ती गोड ग बाळ ते. गुलाबी कि जांभळा उण्ट .ऊण्ट ते ऊण्ट .
एव्ह्डा सरळ सोपा विचार बाल मन च करु जाणे.
आई पण हुशार हो बाळाचि , लौकर शिकत आहे.
कीर्ती, एन्जॉय करणं किती अवघड करून ठेवलंय ना आपण! आहे ते स्वीकारायचं सोडून किती फाटे फोडतो!
गौरीताई या काऊ चिउच्या गोष्टी किती मत्त आहेत ग. सगळे काही नव्याने शिकायला लावणाऱ्या :)
:D :D :D
गौरी, माऊसोबत असतांना असं इतकं काही शिकायला मिळतं ना! :)
सौरभ, it just shows how far removed I am from the reality! :D
:D :D :D
अनघा, हे सगळं शिकून सद्ध्या वरच्या वर्गाचा अभ्यास चालला असेल ना ग तुझा? :)
मत्त :)
कित्ती मत्त उंट आहे की नाई जास्वंदी मावशी! :)
Post a Comment