खूप दिवसत मी इथे बागेविषयी काही लिहिलेलं नाही. कारण बागेत मी काही केलेलंच नाही पाणी घालण्याखेरीज. पण रोज सूर्य उगवतो, झाडांना प्रकाश देतो. पाऊस पडतो, आणि ती थरारतात. काही ना काही नवीननवीन बागेत घडतच असतं. आपलं लक्ष नसेल, तर तो आपला करंटेपणा. तर जाता जाता ही गंमत बघायला मिळाली मला बागेत –
मागच्या पावसाळ्यात मी पांढर्या गोकर्णाच्या बिया लावल्या
होत्या, आणि त्याचा मस्त वेल आला होता. त्याच्या बिया पडून या वर्षी आपोआप बाग
गोकर्णाने भरून गेली होती. त्यातले तीन चार ठेवून मी बाकीचे काढून टाकले. या तीन –
चार वेलांनी गंमत केली.
पहिल्याला अशी फुलं आली:
दुसर्याची अशी:
तर तिसर्याची अशी!
निळ्या गोकर्णाचा एकही वेल माझ्याकडे नव्हता. मग ही किमया
कशी बरं झाली असेल? मागच्या पिढीमध्ये सुप्त राहिलेली गुणसूत्रं आता जागी
झाल्यामुळे? का परागीभवन करणार्या किड्यांनी-माश्यांनी कुठूनतरी निळी गोकर्णाची
फुलं शोधून काढली होती? पांढर्या गोकर्णावर निळी शाई कशी बरं सांडली असावी?
या पावसाळ्यात उशीरानेच जांभळ्या गोकर्णाच्या बिया सापडल्या
त्या टाकल्यात मी एका कुंडीत. त्याला कुठल्या रंगाची फुलं येतील बरं? :)
4 comments:
Mast mast mast. Kaay gammat.
The flowers look like the kids in white uniform shirt who have newly started writing with ink pen. The leaking pens in the pockets show up.
कीर्ती, मला पण शाई सांडलेल्या युनिफॉर्मचीच आठवण झाली ते फूल बघून! :)
भारीच ! शाई सांडलेला युनिफॉर्म !!! :D :D :D
अनघा, दिसतंय की नाही खरंच शाई सांडल्यासारखं! :)
Post a Comment