मी गेली आठ वर्षं तरी या सोसायटीमध्येच राहते आहे, आणि वर्षभर रोज माऊला शाळेच्या बससाठी सोसायटीच्या गेटवर सोडते आहे. गेटजवळ एक ऑस्ट्रेलियन बाभळीचं झाड आहे. आजपर्यंत एकदाही डोकं वर करून या झाडाकडे नीट मनापासून बघितलं नव्हतं. (ऑस्ट्रेलियन बाभळीत काय बघाण्यासारखं असायचंय?) आज त्या झाडाची एक शेंग खाली बेंचवर पडलेली माऊने उचलली. तिच्या मित्राच्या आईने दाखवलं तेंव्हा पहिल्यांदा मी या शेंगेतल्या बिया बघितल्या, आणि थक्क झाले!
आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा कोपर्यामध्ये निसर्गाची इतकी अद्भुत कलाकारी बघायला मिळते, आणि आजवर हे न बघणारे आपण किती करंटे आहोत हे परत जाणवतं. मळकट तपकिरी शेंगा, छोट्या काळ्या बिया. पण त्या बियांना शेंगेशी जोडणारे तंतू इतके सुंदर! इतक्या वर्षात एकदाही हे दिसू नये माझ्या नजरेला?!
(फोटो खाली पडालेल्या शेंगेचे आहेत ... त्यात दिसणारी पानं दुसर्या झाडाची आहेत. )

No comments:
Post a Comment