धो धो पाऊस.
समुद्र.
किनार्यावर चक्क फुटभर खोलीची गोड्या पाण्याची तळी झालेली.
सोबत जिवाची सखी, लाडकी मावशी, आवडता काका आणि आई.
पाण्यात, वाळूत मनसोक्त खेळून झालं सगळ्यांचं.
आकाशाकडे तोंड करून पावसाचं पाणी प्यायलं, एकमेकांवर वाळू, पाणी उडवलं, पाण्यात गार्या गार्या भिंगोर्या केलं, अगदी झोपून सुद्धा झालं.
उन्हाळाभर वळिवामध्ये भिजायला तरसलो होतो ती गळाभेट अखेरीस झाली. चिंब.
अशाच धो धो पावसात बस भरून घरचे सगळे कास तलावाला गेलो होतो वीसएक वर्षांपूर्वी. दुसरं कुणीच नव्हतं तिथे. आम्ही, पाऊस, आणि तलावात उचंबळणार्या लाटा. अजूनही पाऊस म्हटल्यावर मला हे चित्र आठवतंच आठवतं.
गोव्याची मज्जा आठवेल का माऊला मोठ्ठी झाल्यावर?
***
गोव्याला जायचं होतं ते खरं तर फक्त काकाला, ऑफिसच्या कामासाठी. पण तो जाणार असेल तर आम्ही सगळे पण येणार म्हणून मावशीने सांगितलं, आणि बिनदिक्कत त्याच्या सेमिनारच्या पंचतारांकित रिझॉर्टला एकाच्या ऐवजी तीन फुल दोन क्वार्टर जाऊन धडकलो. घरचेच तर आहेत ना सगळे! हे ‘घरचं असणं’ नक्की समजेल तिला ... हे घरपण तिच्यामुळेच आहे!
***
माऊ येण्यापूर्वी मला वाटायचं, एकुलतं एक मूल नको, बिचारं किती एकटं पडतं. हा प्रश्न माऊने कधीच निकालात काढलाय. सखीच्या घरात ती अशी जाऊन घुसली आहे, की आता त्यांचं सख्य जुळ्यांच्याही पलिकडे जायला लागलंय!
***
(या भटकंतीमधला जो सगळ्यात अविस्मरणीय भाग होता तो समुद्रावरचा. त्याचे अर्थातच फोटो नाहीत! :) )