माऊला मी स्वतः दुकानात जाऊन आजवर एकही चॉकलेट विकत आणलेलं नाही. पण तिला चॉकलेट देणार्यांची अजिबात कमतरता नाही. पण ही सगळी चॉकलेटं आम्ही हातात आल्याआल्या फस्त करत नाही. दिवसाला जास्तीत जास्त एक, आणि काही नियमांची पूर्तता केल्यावरच, असे चॉकलेटचे उभयपक्षी मान्य असे कायदे आहेत. :) आजवर घरात माऊला द्यायला चॉकलेट नाही असं कधीच झालेलं नाही. चॉकलेट खायचं म्हणजे तिच्या सखीला दिल्याशिवाय माऊला ते गोड लागत नाही. अगदी बाहेर कुठे दुकानात सुट्टे नाहीत म्हणून दुकानदार काकानी गोळी दिली तरी माऊ “अजून एक दे – माझ्या मैत्रिणीसाठी!” म्हणून हक्काने दुसरी गोळी मिळवते.
असंच कुणीतरी दिलेलं एक किटकॅट. हे माऊने पहिल्यांदाच खाल्लं, आणि तिला ते फारच आवडलं. पण पंचाईत अशी झाली, की त्यात नेमके ३ तुकडे होते. एक माऊचा, एक सखीचा. तिसर्याचं काय? तिला म्हटलं, तू एकटी असशील तेंव्हा खा ते. पण नाही पटलं तितकंसं. (दोघी एकमेकींशिवाय असण्याची कल्पनाच मुळात आम्हाला आवडत नाही. अगदी गावाला जायचं म्हटलं तरी निघतांना जीव कासावीस होतो!) मग म्हटलं, आजच्या दिवस दोघी वेगवेगळं चॉकलेट खा. हे तर अजिबातच नाही पटलं. शेवटी त्या किटकॅटच्या तुकड्याचे दोन तुकडे, आणि अजून एक एक छोटं चॉकलेट अशी समसमान विभागणी झाली.
कितीही जवळची मैत्रीण असली, तरी तिच्यासाठी आवडत्या चॉकलेटच्या शेवटच्या तुकड्यातला निम्मा स्वतःहून शेअर करणं माऊच्या वयाची असताना मला नसतं जमलं बहुतेक! म्हणजे मी पण दिला असता तुकडा, पण नाईलाजाने, मैत्रिणीला वाईट वाटेल म्हणून / आईला आपण किती अप्पलपोटे आहोत असं वाटेल म्हणून. आणि मैत्रीण समोर नसतांना तर नाहीच. माऊ मैत्रिणीसमोर जेवढ्या हिरीरीने तिची बाजू घेते, तेवढीच ती नसतानाही. आणि आपल्याला जास्त खायला मिळण्यापेक्षा सगळ्यांना वाटून खाण्यात तिला जास्त आनंद वाटतोय. माझं तोंड चॉकलेट न खाताच गोड झालंय. देवा, माझं पिल्लू असंच वेडं राहू देत! आमेन!

5 comments:
Post che title khup avdale. May such pure innocence always be with her :)
गौरी, ती एक माझी आवडती प्रार्थना आहे :)
कुसुमकली सा मेरा मानस विकसित कर माॅ विकसित कर ...
Ho ka, please share kar if possible... Wachayla awdel.
गौरी, अरविंद आश्रमाच्या शाळेतल्या मुलांकडून ऐकलेली ही सुंदर प्रार्थना:
कुसुमकली सा मेरा मानस विकसित कर मॉं विकसित कर
सरल सुभग शिशू हू मै तेरा वन्दित कर मॉं वन्दित कर॥
कर दे मेरा विमल विकास सुंदरता कोमलता ल्हास
गेह गेह मे जिससे फैला दू मै अपना मधुर सुवास
एक बार इस कलिका को भी नन्दित कर मॉं नन्दित कर॥
अपने करुणामय रंग मे उर मुखरित कर मॉं मुखरित कर
अपने पदनख के सौरभ से सुरभित कर मॉं सुरभित कर ॥
Apratim, thanks for sharing!
Post a Comment