साब्रिये टिंबरकेन नावाची एक जर्मन मुलगी आहे. तिने कॉलेजमध्ये तिबेट आणि चीनच्या संस्कृतींचा, भाषांचा अभ्यास करायचं ठरवलं. हा अभ्यास करायला मोठ्ठी अडचण होती. कारण साब्रिये नेत्रहीन आहे, आणि तिबेटी भाषेसाठी आजवर कुणी ब्रेल लीपी तयारच केली नव्हती. अशा वेळी तुम्ही काय कराल? जगात तिबेट सोडून बाकी एवढया संस्कृती पडलेल्या आहेत. दुसरी कुठली तरी संस्कृती निवडयची ना मग अभ्यासासाठी. साब्रियेचं मित्रमंडळ, शिक्षकवर्ग यांनीसुद्धा तिला हाच सल्ला दिला. पण साब्रिये ने वेगळंच काही करायचं ठरवलं. तिने स्वतःच तिबेटी भाषा ब्रेलमध्ये लिहिण्याची पद्धत विकसित केली, आणि तिबेटचा अभ्यास केला.
जी भाषा ब्रेलमध्ये कशी लिहावी याचा आजवर कोणी विचारही केला नव्हता, ती भाषा बोलणाऱ्या अंध लोकांची परिस्थिती काय असेल? त्यांना निश्चितच शिक्षण घेता येत नसणार. काय करत असतील तिबेटमधली अंध मुलं? साब्रियेला प्रश्न पडला. तिने स्वतःच तिबेटला जाऊन हे बघायचं ठरवलं. डोळे नसणारी मुलगी हे सगळं कसं बघणार? तिला तिथे कोण घेऊन जाणार? पण साब्रियेला कुणाबरोबर जायचंच नव्हतं. आजवर आपल्या भोवताली असणारं सुरक्षित, ओळखीचं जग तिला सोनेरी पिंजऱ्यासारखं वाटत होतं. तिथून बाहेर पडून, स्वतःच्या हिंमतीवर नवं जग अनुभवण्याची तिला अनिवार इच्छा होती.
साब्रिये एकटी तिबेटला गेली. तिथल्या अंध मुलांची, मोठ्यांची परिस्थिती तिने स्वतः अनुभवली. सगळे सरकारी अडथळे पार करत, जिथे कुठे शाळेच्या वयाच्या अंधळ्या मुलामुलींची माहिती मिळेल, त्या तिबेटच्या दुर्गम खेड्यापाड्यात ती स्वतः गेली. या मुलांच्या घरच्यांशी बोलली. त्या मुलांना ल्हासाला घेऊन आली, आणि तिने या मुलांसाठी शाळा सुरू केली. पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरच या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, कुणाच्या दयेवर जगण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची उमेद जागी करणं, त्यांना स्वप्नं देणं हे या शाळेने केलेलं काम. शाळेचं उद्दिष्ट आहे एक दिवस या मुलांना शाळेबाहेरच्या जगात स्वतंत्रपणे जगण्याइतकं सक्षम बनवणं.
ज्या सहजतेने साब्रियेने तिबेटला जाण्याचा निर्णय घेतला, तिला साजेशा सोप्या सरळ भाषेत तिने तिचे हे अनुभव शब्दबद्ध केले आहेत, 'Mein Weg führt nach Tibet ' या पुस्तकात. जमेल तसं ते मराठीमध्ये मांडण्याची इच्छा आहे.
10 comments:
Wow! Pustak translate karaycha vichar ahe tuza? Sahi!
At my speed it will take months to complete I guess ... but yes. I want this book in Marathi.
why not give your articles to some magazine too
I am still at the first draft, in chapter1, page 5 or something like that.The book has about 250 pages. It is a looong way to go. And considering the amount of time I can spend on this, it will be tough to keep the commitment to a magazine. But yes. If the translation turns out good, I would like to publish it.
Hey sahii :) Zaaly ka lihun?
Thodese vishyaantar: jara ti spell test kaadhsheel ka? mi jara kacha aahe ingrjeet :D :D
पहिली २ प्रकरणं पूर्ण केली, आणि मग प्रकाशक, कॉपीराईट याची चौकशी सुरू केली. या पुस्तकाच्या मराठी हक्कांसाठी एका प्रकाशनाची बोलणी चालू आहेत. त्यामुळे वाट बघणं भाग आहे - भाषांतर मला करायला मिळेल का नाही माहित नाही :(
एक मात्र चांगलं आहे - हे पुस्तक मराठीत प्रकाशित नक्की होणार.
धन्यवाद! मी जरूर वाट पाहीन!
लेखनासाठी शुभेच्छा !!!
आनंद, अजूनही कॉपीराईटविषयी स्पष्टता नाही - त्यामुळे वाट बघणं चालू आहे.
भारावून टाकेल अश्या ताकदीची कथा ... पूस्तक नक्कीच प्रेरणादाई ठरणार ... काही कळल्यास नक्की कळवा ... !
अजूनही वाट बघणं संपलेलं नाही :(
Post a Comment