‘समिधा’ मधूनच, पुन्हा एकदा.
**************************************************
सूत्रबंधन
निवडुंगाच्या फडातून मला कण्हण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी जवळ जाऊन पाहिले.
विदीर्ण झालेला एक मोठा थोरला पतंग काट्यांच्या शरपंजरी पडला होता.
मी चौकशी करताच आपली कहाणी तो मला सांगू लागला,
"आकाशात मी खूप उंच गेलो होतो." तो म्हणाला, "कागद असून सुद्धा पक्ष्यांसारखा मी आभाळावर संचार करीत होतो. जमिनीवरून स्वप्नांसारखे भासणारे मेघ आता आपल्या जवळ आले आहेत असे मला वाटाले. आनंदाने आणि अभिमानाने मी धुंद झालो. आणखी खूप वर जायचे, चांदण्यांच्या जगात प्रवेश करायचा असे मी ठरविले.
"तेवढ्यात माझी आणि एका पक्ष्याची आभाळात भेट झाली. त्याच्या फडफडणार्या क्षुद्र पंखांची आणि रंगहीन सौंदर्याची मी कुचेष्टा केली आणि त्याला सांगितले: तू आकाशात संचार करणारा आहेस पण मी आकाशाला जिंकणारा आहे.
"ती अवहेलना मला सहन झाली नाही. या सूत्रबंधनामुळे मी आकाशावर विजय मिळवतो असे या पक्ष्यांना वाटते काय? माझे स्वतंत्र सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी मी आवेशाने ते बंधन तोडले. थोडा वेळ मी आणखी उंचावर गेलो --
आणि नंतर वार्यावर हेलकावे खात या निवडुंगात येऊन पडलो!"
आणि नंतर वार्यावर हेलकावे खात या निवडुंगात येऊन पडलो!"