कासविषयी सुहासने इथे लिहिलंय.
बाकीच्यांचं लिहून व्हायची मी वाट बघते आहे ... म्हणजे त्यांचेही दुवे इथे देता येतील. :)
हे सगळं वाचून अजून काही कासच्या फुलांविषयी वाचायचा धीर असेल तर तुमच्यासाठी ही पुढची गोष्ट.
घाटाच्या माथ्यावरचं एक छोटंसं गाव. घाटात लावलेलं रेल्वेचं इंजिन इथे काढतात म्हणून रेल्वेच्या नकाशात महत्त्वाचं. बाकी जगासाठी अनेक खेड्यातलंच एक खेडं. गावात बाहेरचे लोक म्हणजे रेल्वेवाले. त्यांची मोठी कॉलनी, त्यांचाच दवाखाना. एवढ्या संथ गावात राहून कंटाळणारी ही माणसं. आपल्यातच गट करून राहणारी, त्या गटातल्या पार्ट्या, हेवेदावे, राजकारण हेच त्यांचं मन रिझवण्याचं साधन.
या सगाळ्या वातावरणात अजिबातच फिट न होणारं एक तरूण जोडपं. वाचन, संगीत, गावाच्या जवळपासची भटकंती ही त्यांची करमणूक. गावाजवळची गोल टेकडी तर विशेषच प्रेमाची. अगदी रोज फिरायला जाण्याची जागा. फिरायला जाताना शेजारच्या आंबेमोहोराच्या शेतांमधून घमघमाट यायचा. आणि टेकडीवरची रानफुलं तर वेड लावायची.
नोकरीमध्ये बदली झाली, गाव सुटलं. पुढचं दाणापाणी मोठ्या शहरात लिहिलेलं होतं. पण ती टेकडी, तिथे फिरायला जाणं, आणि ती रानफुलं कायमची मनात घर करून राहिली.
ते गाव कधी न बघितलेल्या त्यांच्या लेकीने या रानफुलांची एवढी वर्णनं ऐकली, की न भेटताच ती ओळखीचीच वाटायला लागली तिला.
कासच्या पठारावरच्या रानफुलांमधली ही सगाळ्यात कॉमन रानफुलं असावीत. सोनकीची. (senecio grahami)
पण त्यांच्याविषयी इतकं ऐकलंय, की ती फार स्पेशल आहेत माझ्यासाठी.
15 comments:
मस्त गं... अजुन बाकी फुलांची माहिती येऊ देत..!!
धन्स तू आलीस, खूप छान वाटलं भेटून :) :)
खल्लास गौरे..मार डाला..
कासबद्दल आतापर्यंत वाचलेली दि बेस्ट पोस्ट....
अवांतर आम्ही ज्याला सोनसळी म्हणायचो ती हीच का ग...
:) सुंदर ! खूप आवडलं. अगदी कमी शब्दांत ते गाव, ते तरुण जोडपं आणि त्यांची लेक...डोळ्यासमोर आलं... :)
मला असं का वाटतंय की त्या जोडप्याच्या लाडक्या लेकीचं नावही सोनकीच असावं !? :) :)
हा नात्याचा एक वेगळाच पूल ..... खास तुमचा :-)
>>>>घाटाच्या माथ्यावरचं एक छोटंसं गाव. घाटात लावलेलं रेल्वेचं इंजिन इथे काढतात म्हणून रेल्वेच्या नकाशात महत्त्वाचं. बाकी जगासाठी अनेक खेड्यातलंच एक खेडं. गावात बाहेरचे लोक म्हणजे रेल्वेवाले. त्यांची मोठी कॉलनी, त्यांचाच दवाखाना. एवढ्या संथ गावात राहून कंटाळणारी ही माणसं. आपल्यातच गट करून राहणारी ......
गौरे अगं हे वर्णन आमच्या इगतपुरीला असलं तंतोतंत लागू पडतय की तुझ्या या पोस्टच्या शंभर वेळा प्रेमात पडॆन मी :)
बाकि सोनकीचं फूल माझंही लाडकं... आपल्या लहानपणीच्या गावांचे उल्लेख तसे बरेच कॉमन आहेत आणि त्यातला ’रेल्वे’ हा अत्यंत अविभाज्य घटक आहे याची पुन्हा आठवण आली ही पोस्ट वाचताना :)
सुहास, सगळ्यांना भेटून मस्त वाटलं. पुढच्या ब्लॉगर - भटकंतीला यायचा नक्की प्रयत्न करणार.
अपर्णा, अगं ही पोस्ट कास बद्दल कमी आणि नोस्टाल्जियाविषयी जास्त झालीय :)
सोनसळी नाव फक्त पुस्तकात वाचलं होतं ग ... म्हणजे कुठलं फूल ते माहित नाही - आणि गुगलूनही उपयोग झाला नाही. :(
अनघा :) खरंच ‘सोनकी’ नाव सुचवायला पाहिजे आता कुणालातरी.
सविता, खरंय. समोर दिसणारंही सुंदर, आणि त्याला इतक्या रम्य आठवणींची जोड ... त्यामुळे या फुलांशी वेगळंच नातं आहे माझं.
तन्वी, अग तुझ्या इगतपुरीचंच वर्णन आहे ... :)
अपर्णा, सोनसळी हा सोनकीचा एक उपप्रकार आहे.
खासच लिहल आहेस ग ...आवडलं... :)
देवेंद्र, :)
पुढली भटकंती लवकर प्लान करायला पाहिजे. अशीच हलकी फुलकी.
पंकज, नक्की जाऊ या.
Post a Comment