महाशिवरात्रीची व्याधाची गोष्ट आपल्याला माहित असते.
शिकारीसाठी झाडावर बसलेला असताना समोरचं नीट दिसावं म्हणून तो समोरची पान तोडत होता. योगायोगाने ते झाड बेलाचं होतं. योगायोगाने झाडाखाली महादेवाची पिंड होती. आणि योगायोगानेच तोडलेली पानं पिंडीवर पडत होती. त्यामुळे शंकर व्याधाला प्रसन्न झाला इ.इ.
योगायोगाने परवा गहू निवडले, आणि त्यातला कचरा केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी चिमण्या खातील म्हणून बाहेर कुंडीत टाकला. योगायोगाने चिमण्यांनी तो खल्ला नाही,आणि योगायोगानेच नेमके घट बसण्याच्या दिवशी त्या गव्हाला मस्त कोंब आलेत.
पण देवी म्हणजे काही भोळा सांब नव्हे. माझं पाखंडीपण तिला चांगलंच माहित आहे. ती मला प्रसन्न होईल अशी उगाचच आशा लावून बसू नये. :)
*****************************************
रच्याकने, आमच्या कासवाने आज चक्क शंभरी गाठलीय. ही माझी शंभरावी पोस्ट. त्यातल्या १० -१२ पोस्टा आवडत्या कवितांच्या आहेत ते सोडा ... ‘मी लिहिलेली शंभरावी पोस्ट’ कुठे म्हटलंय ;)

19 comments:
गौरीताई ,
सर्व प्रथम शंभरी गाठल्या बद्दल मना पासून अभिनंदन,आणि आता मूळ मुद्याकडे वळू.
अगं,फोटो खूप सुंदर आलाय,त्या मुळे देवीला तुझ्यावर प्रसन्न होण्या शिवाय पर्यायच राहिला नाहीये,आणि गाडी बिफोर टाईम फलाटाला लागल्यावर प्रवासी जसे बुचकळ्यात पडतात तसेच फक्त काहीसे तुझे झाले आहे,त्या मुळे बिचकून जाऊ नकोस.बिनधास्त गाडीत बस आणि हवी ती विंडो सीट पटकाव.. आम्ही लेट लतीफ ...शेता साठी माती आणण्या पासून सुरुवात होती त्या मुळे दसऱ्यापर्यंत येतोच आहोत आमचे शेत घेऊन....
अभिनंदन ग...आता पुन्हा गायब होणार आहात की आम्ही रोज यायचं ते बी सांगा की वैच...:)
ते कोंब कसले मस्त दिसताहेत ग...तुझा हात हिरवा आहे का तपासून घे...:)
(असं माझी आई म्हणते कारण काही हातानी काही लावल तर येत नाही आणि काहींनी काय पण लावलं तर येत...)
mynac, आभार!
गाडी बिफोर टाईम कसली ... निघालीय हेच माहित नसताना थेट येऊन पोहोचलीय इथे! :)
अपर्णा, आभार! रोज या की हिथं ... फकस्त नवीन काय भेटायचं नाही बगा रोज ;) अधून मधून लिहायचं, मधुनच गायब व्हायचं असंच चालणार ग!
ते कोंब मला पण इतके आवडलेत ना ... काढून टाकायला नको वाटतंय. पण अहेत तिथे वाढू देता नाही यायचे.
हिरवा हात असला तर मजाच येईल ग ... मग मी पॉंडेचरीसारखी क~क्टस आणि कमळं शेजारी नांदणारी बाग करीन :)
भरली ’अनियमिततेची’ शंभरी :) ... मन:पुर्वक अभिनंदन वो बाय़!!!
ते कोंब अप्रतिम सुंदर दिसताहेत.... तुझ्या हाताला ’हिरवा अंगठा’ आहे गं नक्कीच!! :)
>> पण देवी म्हणजे काही भोळा सांब नव्हे. माझं पाखंडीपण तिला चांगलंच माहित आहे. ती मला प्रसन्न होईल अशी उगाचच आशा लावून बसू नये. :)
हे प्रकट-स्वगत होतं का? ;)
आणि.... चूक.. ही तुझीच शंभरावी पोस्ट आहे. कारण ब्लॉगवर सगळं तूच *लिहितेस* (वाचा टंकतेस)... तत्कारणात्, शंभराव्या पोस्टबद्दल हार्दिक शुभेच्छा :))
अभिनंदन !!! खूप खूप ! :)
आणि फोटो अतिशय सुंदर आला आहे.... अगदी पावसाचे थेंब अंगावर घ्यावेत असं आसुसून वाटायला लावणारा ! :)
सेंचुरीबद्दल हार्दिक अभिनंदन. :)
कोंब मस्तच आहेत.
तन्वी, अग तुला बझवर प्रतिक्रिया लिहिली, इथे लिहिली - पण आज घरी नेटचं इतकं नाटक चाललं आहे, की एकही प्रसिद्ध झाली नाही. आता तिसर्यांदा लिहिते आहे!
आभार्स!
आणि अनियमिततेची शंभरी .. अगदी अगदी!
हिरवा अंगठा ही कल्पना एकदम आवडलीय बरंका ... अपर्णाला म्हटलंय वर तशी बाग बनवली पाहिजे मग :)
हेरंब, अरे हो ते प्रकट स्वगतच आहे. आणि ही शंभरावी पोस्ट समजणं मला एकदम मान्य आहे ;)
अनघा, धन्यु! त्या कोंबांच्या डोक्यावरचं पाणी कसलं सही दिसतंय ना!
हाभार्स, राज!
सरप्राईज व्हिजिटर्स आहेत ना ते :)
वाह वाह.... अभिनंदन !!
फोटो जबरी आलाय, पुलेशु !!
घटस्थापना = स्था(णू) पट (येरे) घना :-)
सुहास, धन्यवाद!
गौरी ताई ,शतकाबद्दल अभिनंदन ...पुलेशु ...
ते कोंब मस्तच दिसताहेत ,देवी तुझ्यावर फुल्टू प्रसन्न आहे अस वाटतेय ... :)
देवेंद्र, आभार रे!
hi gauri, you have written it nicely!
can you pls give your email address?
thanks
- vaibhavi bhide
Asst. Editor
Menaka Prakashan
Pune
वैभवी, आभार, आणि ब्लॉगवर स्वागत!
माझा इ-मेल आयडी gouri.bargi@gmail.com असा आहे.
Post a Comment