इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
मी पणत्यांच्या प्रकाशाच्या प्रेमात आहे. विजेच्या माळांची भगभग कुठे, आणि पणत्यांचा मंद प्रकाश कुठे. हा प्रकाश आसमंताला एकदम रोमॅंटिक करून टाकतो. आज संध्याकाळी बाहेर पणत्या लावल्यावर कॅमेर्याच्या नाईट मोडवर केलेले हे उद्योग :)
15 comments:
दिवाळीच्या शुभेच्छा गौरी तुलाही...
फोटू प्रताप मस्त....:)
सुंदर दिसतंय ग ! रांगोळी पण छान. कासव नं ?
मला आहे का आमंत्रण दिवाळीचं ?? ;) :)
Lumos! :)
पहिला फोटू क्लास आहे. दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा.
अपर्णा, अभार ग!
अनघा, हो, कासव. रांगोळीतल्या त्या वाकड्यातिकड्या रेषा बघून तुला समजलं असेल तुला रांगोळी काढायला का बोलावलंय ते ... दिवाळीला कधी येते आहेस बोल. :)
राज, आभार! Lumos Maxima!:)
आवडेश !!
दिवाळीचा समा मस्त फोटो मध्ये ...
दिवाळीच्या खूप शुभेच्छा
:)
भक्ती
अनघा आली की मलाही आमंत्रण दे... चकल्या उडवायला येईन मी.
पंकज, हाभार्स! अनघा आलीच नाही चकल्या संपेपर्यंत, तर तुझ्याही हुकतील बरं :)
भक्ती, आभार ग!
ओके, त्याआधीच येतो मग. अनघा येईल तेव्हाही मी येईनच.
ये ना. कधी येतोस?
खूपच सुंदर आहेत फोटूज !!
नूतन वर्षाच्या शुभेच्छा !! ( थोड्या उशिराने आहेत ह )
राजीव, शुभेच्छा महत्त्वाच्या. थोड्या पुढे - मागे आल्या तरी चालतंय, नाही का?
Post a Comment