Monday, October 3, 2011

Pin Up Girl

बागेत एका नवीन कॉलनीचा मला शोध लागलाय.
स्कॉलरच्या पानावर काय कचरा पाडलाय, म्हणून मी तो हाताने काढणार होते ...

तर हे चक्क माशीचं घर आहे. एखादी टाचणी टोचावी, तसं तिने आपलं घर पानाला पिन अप केलंय.

ही माशी फुलांवर नेहेमी असते. तिच्या जेवणात किंवा विश्रांतीत मी फुलं तोडून व्यत्यय आणण्यावर अजूनतरी कधी तिने आक्षेप घेतलेला नाही. अगदी आज तिच्यापासून चार इंचावर कॅमेरा धरून मी तिच्या घरात डोकावून बघत असतानाही नाही. बागेतल्या झाडांना तिचा काही त्रास नाहीये. बागेतून घरात ती कधी शिरलेली नाही. कधी चावेल की काय या भीतीने तिला तिच्या घरातून उगाचच हुसकून लावू नये असं वाटतंय.

मी बघितलेल्या गांधिलमाश्या याहून मोठ्या, जास्त लाल, आणि जास्त आक्रमक होत्या. ही गांधीलमाशीच आहे का?

11 comments:

Anagha said...

गेले दोन तीन दिवस एक काहीतरी विचित्रच दिसणारं आमच्या घरात उडतंय...एक मारलं तर दुसरं आलं....लाल....अतिशय लांब व बारीक काटकुळे पाय. जशी काही अमिताभ बच्चन मधमाशी. तिच्यावर बेगॉन मारून तिला मारून टाकण्यापलीकडे मी काही करू शकले नाही...कारण एक तर ती भयावह दिसत होती...दुसरं म्हणजे ती घरात उडत उडत कुठेही फिरत होती आणि तिसरं म्हणजे ह्या तिच्या वागण्यामुळे माझ्या लेकीने घरात खूप आरडाओरडा केला...मग मी तिला मारून खुनाचे पातक डोक्यावर घेतले ! :)
हे तुझ्या बागेत काय आहे कोण जाणे ! :)

Anagha said...

मला पोस्टचं नाव खूप आवडलं !! :D

Gouri said...

अनघा, तिला म्हणायचं ना मग ... "मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है?" :D:D:D

Gouri said...

अगं, तिचं घर बघितल्यावर मला सॉफ्ट बोर्डवर लावलेली पिनच आठवली :)

Raj said...

टायटल वाचून दचकलो. :)
कदाचित नेहेमीच्या गांधील माशीची वेगळी जात असावी.

Gouri said...

राज, :D

हेरंब said...

Pin Up Girl :))

LOL

Gouri said...

हेरंब, तुला काय वाटलं कुणाछा फोटो टाकलाय मी इकडे? :D :D

अपर्णा said...

Heramb LOL...:D

Gouri said...

अपर्णा, :D

Gouri said...

तज्ञांकडून समजलं की या माशीचं नाव paper wasp आहे. ही गांधीलमाशी नाही.