सध्या दिवसच असे आहेत, की यांच्याकडे बघाल तर प्रेमातच पडाल. त्यांचे मोहक रंग आणि ताजेपणा भुरळ पाडल्याखेरीज राहणार नाहीत तुम्हाला. काय घेणार आणि काय सोडणार ... सगळंच हवं. मग आपल्याला काय पाहिजे आहे, काय करायचंय याचा विवेक राहतो बाजूला.
बघा आता तुम्हीच ...
10 comments:
तूला खरं सांगते जरा दोन दिवस आधि टाकली असतीस नं पोस्ट तर सॉलीड निषेधले असते मी... पण परवा इथल्या मॉलातून लाल कोराच्या मेथीच्या सुंदर जूड्या २, पालकाची जुड्या ३, कोथिंबीर (सुंदर), दोडकी, मक्याची ताजी कणसं, फ्लॉवर पानासहित :) , शेवग्याच्या ताज्या (हे फार फार महत्त्वाचे) शेंगा , लालबुंद टोमॅटो, ई.ई. मनसोक्त खरेदी केलीये आणि ४-५ दिवसान्नी आई येतीये , तिला ’ बाकि काही आणू नकोस फक्त सोबत भाजी आण ’ असे सांगितलेय :).... त्यामूळे सध्या मी ’श्रीमंत’ आहे गं अगदी!!! :)
काहिही म्हण पण लव्ह ऍट फर्स्ट काय नं लास्ट काय, ते हेच :)... हिरवं सोनं, लय भारी!!
आवडली गौरे पोस्ट... १०० पैकी १०० मार्क तूला!!
तन्वी, अग ही पोस्ट खास तुझ्यासाठी. आज आई आणि मी भाजी आणायला मंडईत गेलो, आणि भाजी बघूनच मी आईला म्हटलं, आज मी भाजीचे फोटो पाठवणार तन्वीला :)
:p मी आज सिटीलाईट मार्केट मधून चंदेरी पापलेट, गुलाबी कोलंबी आणि काळ्याभोर तिसऱ्या आणल्या ! मला पण अगदी हाच अनुभव आला...म्हणजे अगदी लव्ह अॅट फर्स्ट साईट ! :p :D :D
नुकतीच गावदेवी मार्केटच्या प्रेमात अखंड बुडून आलेय मोजक्या मोजक्या भाज्यांकडे. :(
गौरे, अगदी लव्ह ऎट फर्स्ट आणि अखंड हेच खरं!
तन्वीशी सहमत... हिरवं सोनं, लय भारी!!
अनघा, हिवाळ्यात ही खरी मजा असते ना ग? फक्त मला मासळीतलं काही कळत नाही, त्यामुळे बघता क्षणी प्रेमात पडेन का नाही काय माहित :)
श्रीताई, खरंय. हिरवं सोनं.
आणि आपल्या भाजीबाजारातल्या खरेदीची गंमतच वेगळी. पल्याडला फार्मर्स मार्केट असलं तर गोष्ट वेगळी, नाही तर "ताई पेरू फार सुंदर आलेत आज, घ्याच तुम्ही. पुढच्या रविवारपर्यंत संपून जातील" म्हणून आग्रह कोण करणार?
गौरी मला शाकाहारी (पण) आवडतं पण तरी या पोस्टवर कमेंट काय द्यावी हे कळत नव्हतं....पण आता इतकं मात्र म्हणेन की यावरून प्रेरणा घेऊन अनघाबाईंनी त्यांची पोस्ट नाही टाकली हे बरं केलं नाहीतर उगाच जीव (जास्त) वरखाली व्हायचा...अनघे, वाचतेस नं...:D
अपर्णा, अग तुझ्या फार्मव्हिलेच्या भाज्या असतील ना ... याहूनही ताज्या ताज्या!
आता कुठे ग..आलं हिवाळा तब्येत सांभाळा..आणि हो अग यावर्षी फार्मविलेला कल्टी कारण पिल्लू आलं होतं न...पाहू म्होरल्या टायमाला काय जमत का...
हम्म अपर्णा, बरोबर आहे. या वर्षी तुला संधी नसेल मिळाली. आता उन्हाळ्यात खायला मिळातील तुला स्वतः लावलेल्या ताजा भाज्या. :)
Post a Comment