आजकाल माझी टीम व्हर्च्युअल असते. म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या कोपर्यात बसलेले लोक स्वतःला एक टीम म्हणवून घेतात आणि एकत्र काम करतात. महिनेच्या महिने बरोबर काम करून कधी समक्ष भेटण्याचा योग येत नाही. याचा एक फार मोठा तोटा आज जाणवला - ऑफिसच्या मिटिंग रूममध्ये सगळ्यांनी एकत्र बसून मिटिंग मिटिंग खेळायची संधी क्वचितच मिळते, आणि यातून कलाक्षेत्राची मोठी हानी होते आहे.
नॉन व्हर्च्युअल मिटिंगच्या सुखद आठवणीत आज बुडून गेले होते.
एखादं काम आज हातावेगळं करायचंच म्हणून आपण आज सगळं बाजूला ठेवून बसावं, आणि मॅनेजरने पकडून मिटिंगला घेऊन जावं. मिटिंग रूममध्ये कुडकुडत (ऑफिसच्या मिटिंगरूममध्ये बसलेला माणूस गार पडलाच पाहिजे असा नियम असावा. एवढं कमी टेंपरेचर तिथे कशाला करून ठेवतात माहित नाही.) आपण बाहेरच्या कामाच्या उबदार आठवणीने तळमळत असावं. पाच एक मिनिटात आपल्याला अंदाज येतो, आपल्या पक्षाची चार टाळकी दिसावीत म्हणून आपल्याला इथे ओढून आणलंय - इथे आपलं काहीही काम नाहीये. यानंतर सुरू होते निव्वळ जागं राहण्याची धडपड. त्या धडपडीतून मग अश्या कलाकृती निर्माण होतात:
आता मला सांगा, डेस्कवरून केलेल्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये असं काही निर्माण करण्याची ताकद आहे का? आपल्या कामाचं इथे काही चाललेलं नाही म्हटल्यावर मी फोन हळूच डिस्कनेक्ट करून टाकीन, किमान पक्षी ‘म्यूट’ करून आपल्या कामाला लागेन. पण मग कलेचं काय?
17 comments:
हे असलं होणार असेल तर अशा मीटिंग रोज चार व्हाव्यात.
मस्त आहे ! पहिलं आणि तिसरं...म्हणजे एकदम भरतकाम सुरु करावंसं वाटलं ! आणि ते मला वाटलं म्हणजे बघ !! :p :)
आणि मलाही नुसतं कोणी नेऊन बसवलं ना मिटींगला की हे असंच होतं...डुलक्या काढते मी...आणि मग हाच उपाय सुरु करते ! :)
पंकज, :D :D
कॉर्पोरेट जगताने कलेला प्रोत्साहन द्यायला हवं, नाही का? ;)
अनघा, तुझी मिनिट्स ऑफ मिटिंग्ज पोस्ट कर बघू लवकर ! :D
Mast ahe !
Maja vatli vaachun :-)
सगळ्यात प्रथम म्हणजे...तू म्हणतेस तस कॉर्पोरेट जगातलं कलेचं कौतुक करतेय...हे हात मुझे दे दे गौरे....:) मस्त ग...
आता ही पोस्ट म्हणजे मला एकदम तुझ्या ब्लॉगवर नाही तर माहेरी आल्यासारखं वाटतय..(तेच ते कॉर्पोरेट जगातल्या.) अग गेले दिडेक वर्ष मी नुसतं virtual नाही तर एकटीच काम करते बसून...म्हणजे किती काय क्षणाला मुकतेय यार...(पाहिलं म्हणजे कॉफ्फी ब्रेक्स) मला ब्लॉग्सवर कमेंट टाकायला कस जमत ह्याच शिक्रेट ओपन केलस बग तू....
आई ग्ग.. मिटींगच्या वेळेत एवढी बेस्ट कलाकारी?? आम्ही फुलटाईम बसलो तरी पांढर्यावर जेमतेम काहीतरी काळं उमटेल.. लिटरली !!
सलील, वाचलं ना मिटिंग्जचं निष्पन्न! ;)
अपर्णा, अग जरा वेळेचा सदुपयोग आणि जागं राहण्याचा उत्तम मार्ग! कोड बिल्ड आणि टेस्ट होत असताना आम्हाला लेट नाईट हातावर हात धरून बसून रहायला लागायचं. तेंव्हा पण मग स्केचिंग, सुडोकू आणि जिगझोन तारून न्यायचे :)
बाकी व्हर्च्युअल काम करताना कधीकधी फार आयसोलेशन वाटतं. असा एकत्र टाईमपास, गप्पा, इन्फॉर्मल शेअरिंग अजिबात होत नाही ना!
हेरंब, अरे कागद, पेन, पेन्सिल हाताशी असलं म्हणजे असं चितारत रहायला मजा येते. (आमच्या कलाकारीची मजल इथपर्यंतच. मोठं चित्र वगैरे करण्याइतकं कौशल्य आणि पेशन्स नाही बुवा.)
वा! किती सुरेख चित्रं काढतेस तू! अशा मिटींगा रोज होवोत असे म्हणण्यापेक्षा अशी चित्रं काढत रहा असं म्हणेन. :)
ब्लॉगचं नवं रूपडं आवडलं.
बाय द वे, ब्लॉगचं टायटल आणि पार्श्वभूमी दोन्ही पांढRया आहेत त्यामुळं वाचायला त्रास होतोय. टायटलचा रंग गडद केला तर प्राब्लिम सॉल्व्ह. :)
राज, सवडीने चित्र काढायला बसलं, म्हाणजे दुसरं काहीतरी काम आठवतं, चित्र बाजूलाच राहतं. मिटिंग असली म्हणजे बरोबर मूड जमतो चित्र काढायला ... जितक्या जास्त वेळाची मिटिंग,तितकं जास्त डिटेलिंग :) अश्या मिटिंग्ज नाहीत त्यामुळे सद्ध्या हे मागे पडलंय.
ब्लॉगच्या रूपड्यात बदल बर्याच महिन्यांपासून करायचा होता, अखेरीस मुहुर्त लागला. :)
मला शक्यतो ब्लॉगचं टायटल काळ्या रंगात नको होतं - बाकी रंगसंगतीशी काळा जुळत नव्हता, आणि नीट वाचताही येत नव्हता. बराच खटाटोप करून शेवटी डिफॉल्ट पांढरा रंग मी तसाच ठेवला होता ... नंतर बदलू म्हणून. आता बदल केला आहे. अजून मनासारखं जमलं नाही, पण वाचायला सोपं जाईल पांढर्यापेक्षा.
I second Heramb!!
आनंद, ठराव पास झाल्याचं मिनिट्स मध्ये नोंदवण्यात येईल :D
सहीच कलाकारी केलीस की गौरी. मला पहिलं आणि तिसरं पाहून मेंदी किंवा भरतकाम ( अनघा+१) वाटलं बघ. मिटींग की जय हो! :)
श्रीताई, तिसरा मेंदीचा नमुना म्हणूनच बनवला होता. पहिल्याचा एण्ड रिझल्ट बघितल्यावर भरतकामासारखा वाटतोय हे अनघाने आणि तू म्हटल्यावर जाणवलं. जय मिटिंग!
Post a Comment