Thursday, August 30, 2012

दूधसागर फॉल्सची भटकंती

दूधसागर फॉल्स म्हणजे गोवा - कर्नाटक सीमा. पश्चिम घाटातला सगळ्यात मोठा धबधबा. बारा महिने, खरोखर दुधासारखं पाणी असतं या धबधब्याला. इथे पोहोचण्यासाठी एकच मार्ग - वास्को - लोंढा मार्गावरून येणार्‍या रेल्वेगाड्या. ऑफिशिअल प्रवासी थांबा नसला, तरी प्रत्येक गाडी इथे थांबतेच. गोव्याहून येणारी गाडी घाट चढल्यावर दम खायला दूधसागरला थांबते, आणि लोंढ्याहून जाणारी घाट उतरण्यापूर्वी इथलं सौंदर्य न्याहाळायला. यंदा मला ऐन पावसाळ्यात दूधसागर बघायची संधी मिळाली. त्या भटकंतीचे हे फोटो:


वळणावळणाची वाट


स्कूल चले हम!


शेतकरीदादा नांगरत होते

शेतीच्या कामाची लगबग

भातखाचरात लावणी चालली होती


यांनी स्वागत केलं
गाडी थांबते तिथून साधारण एक – दीड किलोमीटरवर धबधबा आहे.




अंधारातून प्रकाशाकडे !


खालच्या फोटोत दूर डोंगरात आडवी रेघ दिसते ना पांढरी, ती गाडी आहे!



आणि हा धबधबा! रेल्वेच्या पुलावरून फोटो काढलेत. गाडीतून जातांनाही इतक्या जवळून बघता येतो, त्याचे तुषार अंगावर घ्यायला मिळतात.

दूधसागर

दूधसागर

दूधसागर

या पाण्यात खेळायला पुन्हा दिवाळीच्या सुमाराला यायला हवं. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याला प्रचंड वेग असतो आणि दगड निसरडे होतात, त्यामुळे पाण्यात जाता येत नाही :(


ही दूधसागर स्पेशल ऑर्किड्स - मला पूर्ण प्रवासात ही फक्त इथेच बघायला मिळाली. रेल्वेच्या बोगद्यांच्या जवळच्या उघड्या कातळावर यांचा मस्त गालीचा होता. मातीत कुठेच दिसली नाहीत ही. एक तर चक्क वडाच्या पारंबीवर  आलेलं सापडलं!
दूधसागरचं ऑर्किड

या भटकंतीचे अजून फोटो इथे आणि इथे आहेत:


19 comments:

Suhas Diwakar Zele said...

वॉव.. निव्वळ अप्रतिम :) :)

Gouri said...

सुहास, धन्यु :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

हे बाकी एकदम ब्येस आहे. आणि मला जळजळही नाही झाल, कारण आधीच झालं आहे हे. ;-)

Abhishek said...

च्या (वाचा: चहा) मारी ... अगदीच दूध!

इंद्रधनु said...

वाह... मस्तच....

Gouri said...

पंकज, चला एक भटकंती पोस्ट विदाऊट जळजळ फ्रॉम यू :) मस्तय ना दूधसागर? भिजायला परत जायचा विचार आहे माझा जमलं तर.

Gouri said...

अभिषेक, एकदम ताजे, निर्भेळ सकस शुद्ध वगैरे वगैरे दूध! :D

Gouri said...

इंद्रधनू, सुंदर आहे ना दूधसागर!

Anonymous said...

अप्रतिम फोटॊ :)

बाकि रेल्वेरूळ, बोगदा आणि अतोनात हिरवळ, धबधबे पाहून मला कुठले गाव आठवले ते तूला सांगणे न लगे :)

Gouri said...

तन्वी, दूधसागर सुद्धा इगतपुरीसारखंच घाटाच्या तोंडाशी असणारं स्टॆशन आहे बरं का :)

Anagha said...

सुंदर फोटो ! काय मस्त धबधबा आहे !!!! :)

Gouri said...

अनघा, नवर्‍याबरोबर असं काही बघितलं, म्हणजे मी त्याला "आपलं कर्नाटक खरंच सुंदर आहे" म्हणून सर्टिफिकेट देऊन टाकते :D :D

Anagha said...

:D :D

Maithili said...

Nice photos... :-)

Gouri said...

मैथिली, धन्यू :)

हेरंब said...

खरंच सुंदर फोटो आलेत !

Gouri said...

हेरंब, फार सुंदर जागा आहे ही!

mukul said...

shriram.......
sundar photo
jio yar .....

Gouri said...

मुकुल, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! :)