आपण काहीही न करता वय वाढतच
असतं. तसा ब्लॉग एका वर्षाने मोठा झालाय. आता “अरे वा, वाढदिवस!” असं कौतुकाने म्हणण्याऐवजी
त्याचे वय चोरायचे दिवस जवळ आले आहेत.
गेल्या वर्षभरात इथे ओरिसाची
भटकंती वगळता फारसं काही घडलेलं नाही. म्हणजे गेल्या वर्षभरात काही घडलंच नाही का
लिहिण्याजोगं? तसं बघितलं तर बरंच काही घडलं, पण ते सगळं अनुभवण्यात मी इतकी बुडून
गेले आहे, की त्याविषयी लिहिणं शक्य नाही. इथे काही लिहायला थोडी अस्वस्थता,
बेचैनी लागते, काहीतरी सांगायची आस लागते, ती नाहीये सद्ध्या. भरल्या पोटी लिहायला
सुचत नाही तसंच भरल्या मनानेही लिहिणं अवघडच जातं, नाही का? अजून काही दिवस हे असेच
जातील असं वाटतंय. मग पुन्हा नव्या उत्साहाने काहीतरी सांगावंसं वाटेल, एखादा
फोटो, एखादं पुस्तक लिहितं करेल. तोवर मी पुन्हा गायबते इथून.
6 comments:
“अरे वा, वाढदिवस!” :D :D :D
partyyyyyy!!!
:)
सौरभ, :D :D
पार्टीचा फोटो आहे बघ पोस्टमध्येच ... foot in mouth ;)
अनघा, पटण्यासारखी आहे ना सबब? :)
फोटोप्रगती साठी अभिनंदन गौरे ;)
धन्यू ग अपर्णा! :)
Post a Comment