दोन चार दिवसांपूर्वी "अक्षरधारा" मधून माऊसाठी गोष्टीची ढीगभर पुस्तकं आणलीत ... त्यातलंच हे एक. म्हणजे मला माहित आहे, माऊ अजून लहान आहे हे पुस्तक वाचायला, पण फारच छान वाटलं म्हणून घेतलंच मी ते पुस्तक.
आज ते वाचलं, आणि इतकं आवडलं, की पुस्तकावर माऊचं नाव
घातलंय म्हणून ... नाही तर ते चक्क ढापायचा विचार होता माझा. ("माऊची आई" म्हणून नाव बदलावं का त्या पुस्तकावरचं?) माऊची बरीचशी पुस्तकं
मला आवडतात. म्हणजे काहीतली चित्र आवडतात, काहीतल्या गोष्टी आवडतात. काहीतलं सगळंच
आवडतं!!! हे असंच वाईट्ट आवडलंय. पुस्तकातली चित्र एकदम गोड्ड आहेत. आणि गोष्टी वाचतांना मला
थेट बिम्मची आणि लंपनची आठवण झाली ... जोयानाचं विश्व इतकं सुंदर उभं केलं आहे ना
इथे ... “आजी काय बोलते हे मला कळत नाही. मिनी मांजर काय बोलते ते आजीला कळत नाही.
रंग काय बोलतात ते मांजरीला कळत नाही. झाड काय बोलतं ते आभाळाला कळत असेल का?” असं
मावशीला विचारणारी ही जोयाना!
आता अडचण एकच आहे. कवितामावशीला विचारायचंय, जोयानाच्या गोष्टी अजून सांगतेस का म्हणून. म्हणजे हे एक पुस्तक माऊच्या आईसाठी ठेवलं तरी बाकीच्या जोयानाच्या गोष्टी माऊला वाचायला मिळतील!!!
***
जोयानाचे रंग
लेखिका कविता महाजन
राजहंस प्रकाशन
किंमत ५० रुपये
4 comments:
मला ते प्रश्न वाचून हायडी आठवली !!!! :) :)
अनघा, अग मला हायडी माहितच नव्हती! तुझी कॉमेंट बघून मी ही हायडी कोण ते जरा शोधलं ... आणि इतके दिवस ही कशी माहित नव्हती मला असा प्रश्न पडलाय आता!
जोयाना माझे व लेकीचे आवडते पुस्तक ! प्रसन्न पुस्तक आहे नै !!!
मुलांसाठी असं लिहिता यायला हवं !
खरंच हायडी आठवते. मी परवा हायडी पण आणलं. :)
माया, हो ... एकदम आवडलं ... घरातल्या मुलासाठी किंवा तुमच्या मनातल्या मुलासाठी सुद्धा अशी पुस्तकं हवीतच ना! :)
हायडी मला अजून आणयचंय ... यादी वाढतच जाते किती पुस्तकं आणली तरी!
Post a Comment