माऊला कुत्री – मांजरं – एकूणातच सगळे प्राणीमात्र खूप आवडतात. म्हणजे टेकडीवर आम्ही मधून मधून फिरायला जातो तर तिथले जवळपास सगळे भुभू आणि त्यांचे ताई / दादा / काका / मावशी लोक तिला ओळखायला लागलेत! तर यंदा तिच्या वाढदिवसाला भुभूंना बोलावलंच पाहिजे असं ठरलं. मग कुणाकुणाला बोलवायचं, कसं करू या याची खलबतं सुरू झाली, प्लॅन ठरला, कार्डबोर्ड आणले, ते कापले, आज्जीने मस्त रंगवले आणि असे एक एक भुभू तयार झाले...
मोठ्ठा भुभू आणि छोटुस्सा भुभू! |
हा झोपलाय |
यांना आपल्या त्या ह्या पुस्तकातून बोलावलंय ... |
यांना पण! |
आणि हा बुटकू |
एवढे सगळे भुभू आल्यावर ते एका जागी कसे बसतील? त्यांच्या खेळण्यामध्ये सगळीकडे पायांचे ठसे उठणारच की! ते कसे करायचे? सोप्पंय! पाय बनवू या, म्हणजे त्याचा ठसा करता येईल!
हा पाय |
आणि हा ठसा! |
आले बघा सगळे ... तय्यार!!!
हुश्श! पुढच्या वाढदिवसाला कुणाकुणाला बोलवायचं बरं? :)