प्रिय देवकी,
आपल्याला भेटायलाच नाही मिळालं. तू फार घाई केलीस जायची. माऊला सुद्धा भेटली नाहीस म्हणजे फारच झालं हं. अर्थात तुझाही नाईलाजच होता म्हणा! पण काहीही म्हण, तू दिलेल्या भेटीला तोड नाही!
तुझ्या ठेव्याकडे बघून वाटतं, कुणावर गेलीय ही? तिच्या जन्मदात्रीवर? तसं असेल तर मी चांगलंच ओळखते बरं का तुला! ज्यातलं मला अज्जिबात काही समजत नाही अशा सगळ्या गोष्टीत किती गती होती तुला! कधीकधी फार इच्छा होते तुला भेटायची. असं वाटतं, तुझ्याशी बोलायला, तुझी मैत्रीण व्हायला किती आवडेल मला. You must have been a very beautiful person!!! ज्यांच्याशी आवर्जून ओळख करून घ्यायला हवी अशातली कुणीतरी. इतकी सुंदर गोष्ट अशी अर्ध्यावरच का संपवली असेल बरं त्याने? May be you were too good to be true!
आजवर माऊशी कितीतरी वेळा बोलले आहे ती कशी इथे आली याविषयी. पण अजूनही तुझ्याविषयी नाही सांगितलं तिला. मलाच काही माहित नाही तर मी काय सांगणार म्हणा! पण मोठेपणी माऊला तुझ्याविषयी जाणून घ्यावंसं वाटलं, तर मी तिला अजिबात तिची स्पेस वगैरे देणार नाहीये सांगून ठेवते. मीही येडी होऊन तिच्यासोबत घुसणार या शोधामध्ये! तिच्याएवढीच उत्सुकता मलाही आहे म्हटलं!!!

4 comments:
तू ही पोस्ट तुझ्या ब्लॉग वाचकांपेक्षा माऊसाठी लिहून ठेवली असावीस असं फार वाटतंय. सगळे संदर्भ माझ्या तुटपुंज्या वाचनामुळे लागले नसावेत असंही वाटतं. असो.
हो ग ... हे वाचकांपेक्षा माऊ आणि माझ्यासाठी जास्त आहे!
Mau la tu Aai mhanun milali ahes hey kalalyavar ti jithe asel tithe tila samadhaan asel...
Tula ani Mau la khup kadkadun mithi!
So be it ... तथास्तु! :)
Post a Comment