पुन्हा एकदा ‘समिधा’. खूप वर्षांनी हा संग्रह वाचायला घेतलाय, आणि किती तरी कविता नव्यानेच भेटताहेत. त्यातल्या काही इथे तुमच्याबरोबर शेअर करायचा मानस आहे.
चांदणी
शुक्राची तेजःपुंज चांदणी पाहून तो वेडा झाला.
त्याने शुक्रावर जावयाचे ठरवले.
आपले अर्धे आयुष्य खर्च करून त्याने एक प्रचंड शिडी तयार केली.
आणि एके दिवशी तो शुक्रावर चढून गेला.
संतुष्ट दृष्टीने त्याने तेथून आकाशाकडे पाहिले.
शुक्राइतकीच तेजःपुंज अशी एक नवी चांदणी आकाशात तळपत होती.
उर्वरित अर्धे आयुष्य खर्च करून त्याने पुन्हा एकदा एक प्रचंड शिडी सिद्ध केली. आणि तो पृथ्वीवर आला!
6 comments:
अगं, असं वाटतं की मी बापडी कुसुमाग्रजांना काय दाद देणार !! नाही का ?
म्हणून मी आपली सारखे तुझे आभार मानते ! :)
अग, वाचल्यावर कुणाशी तरी शेअर केल्याशिवाय चैन पडत नाहीये म्हणून मी इथे टाकते आहे :)
हे एकदम पटलं हं ! :)
:)
अनघा +१... :)
श्रीताई, अनघाला म्हटलं तेच - खूप दिवसांनी समिधा पुन्हा वाचली, आणि या सगळ्या कविता पुन्हा नव्यानेच भेटल्या. त्या शेअर केल्याखेरीज राहवत नाहीये.
Post a Comment