Wednesday, December 10, 2014

जिवंतपणाचं लक्षण ...


दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात.

आता छाटणी करायची वेळ झाली, मला आठवतं.

कात्री चालवल्यावर गच्ची एकदम मोकळी मोकळी दिसायला लागते. छाटलेली झाडं एकदम बिचारी वाटायला लागतात. (तरी बरं, झाडांना फांदी कापलेली समजते पण वेदना होत नाही हे शिकले आहे इतक्यातच!) जास्तच कापणी केलीय का आपण? नवी पालवी येईल ना याला पुन्हा? अश्या शंका यायला लागतात.

या शंकांमध्ये मी बुडून गेलेली असते तेंव्हा कधीतरी वठल्यासारख्या दिसणार्‍या म्हातार्‍या फांद्यांवरती हळूच कुठेकुठे हिरवा-गुलाबी शहारा उमटायला लागतो. 


त्याची अशी आश्वासक पालवी झाली की मग माझ्या जिवात जीव येतो!


दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात...

***
(अनघा मारणारे मला. तिच्या एकदम सिरियस, अर्थपूर्ण पोस्टीचं नाव इतक्या फुटकळ पोस्टीला वापरलंय म्हणून ... पळा!!! :) )

5 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

:-)

aativas said...

मी सध्या (पहिल्यांदाच) बागकाम करतेय आणि अनेक प्रश्न आणि शंका मनात येतात त्यांची जोपासना करताना - जोपासना करतोय आपण की मारतोय त्यांना हा एक प्रश्न येतोच मनात ...

Gouri said...

पंकज, आठवली ना तुला ती पोस्ट? :)

Gouri said...

सविता, मज्जा येते ना बागकाम करतांना? आपलं चुकत माकत करणं, सतराशेसाठ शंका, वाट बघणं ... आणि झाडं आपली त्यांच्या मनात असेल त्याप्रमाणे मस्त जगतात!

Gouri said...

गंमत आहे ... मी word verification off केलं तरीसुद्धा इथे चित्रविचित्र शब्द टायपायला लावतोय मला ब्लॉगर. पुन्हा सेटिंग्ज पाहून एकदा खात्री करून आलेय. Word verification off आहे. आणि हा आपला मला परत "Please prove you are not a robot" म्हणून सांगतोय. काय करायचं आता याला?