काल संध्याकाळी माऊ खाली बागेत झोपाळ्यावर खेळत होती. मी शेजारीच उभी होते. झोपाळ्यावरून तिने उडी मारली, आणि माझ्या शेजारी काहीतरी छोटं तुटक्या रबरबॅंडसारखं दिसत होतं त्याला हात लावला. क्षणात ती जोरात किंचाळून बाजूला पळाली ... तो छोटा साप होता! इतका वेळ शांत असणारा साप तिने हात लावल्यावर वळवळायला लागला होता. आकार जेमतेम पाच – सहा इंच, रंग चमकदार काळा. मोबाईलचा दिवा लावल्यावर तो परत शांत झाला, आधीसारखाच स्तब्ध पडून राहिला. हा सापच आहे ना अशी शंका वाटत होती आता – डोकं, डोळे ओळखू येत नव्हते, जीभ बाहेत नव्हती. खवले सुद्धा जाणवत नव्हते. मग पोरांना तिथून हलवलं, वॉचमनना बोलावलं, बर्याच वेळाने वॉचमन आले. परत परत सांगूनही त्यांनी तो बाटलीत भरला नाही – कागदावर घेतला आणि बाहेर कुठेतरी टाकून दिला (असं आम्हाला सांगितलं. मारला नसेल अशी आशा आहे.)
माऊ आणि साप यांची दुसरी भेट. यापूर्वी महाबळेश्वरला हॉटेलच्या खोलीबाहेर ती एकटीच गेली आणि तिथे साप होता म्हणून सांगत आली होती. (तिथल्या वॉचमननी मारला तो साप ... मारू नका, बाहेर घालवा त्याला असं सांगण्यापलिकडे काही करता आलं नव्हतं मला:( ) या वेळी तर तिने चक्क हात लावलाय सापाला. रात्रभर बेचैन होते मी. म्हणजे सापाकडून तिला कधी काही इजा झालेली नाही, पण तिला साप जरा जास्तच भेटताहेत असं वाटतंय. आपल्याकडचे बहुसंख्य साप – म्हणजे अगदी ९०% साप बिनविषारी असतात हे माहित आहे मला. पण मला साप ओळखता येत नाहीत. आणि अशा ठिकाणी अर्धवट ज्ञान काहीही कामाचं नसतं.
सकाळी गुगलबाबाला विचारलं हा कुठला साप म्हणून. तर त्यानी सांगितलं की हा पूर्ण निरुपद्रवी असा Brahminy Blind Snake / Common worm snake आहे. (याचं मराठी नाव वाळा.) आणि हे पिल्लू नाही, पूर्ण वाढ झालेला साप आहे हा. (काल वॉचमन येण्याची वाट बघत असताना “हे नागाचं पिल्लू असेल का” पर्यंत अकलेचे तारे तोडून झाले होते आमचे!) भारतात सर्वत्र मिळातो हा – विशेषतः पावसाळ्यात. त्याचं मुख्य अन्न म्हणजे वाळवीची आणि मुंग्यांची अंडी. हा जवळपास अंधळा असतो, आणि याचं तोंड इतकं छोटं असतं की त्याला कुठल्याही मोठ्या प्राण्याला चावताच येत नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे या सापामध्ये फक्त माद्या असतात आणि पुनरुत्पादनासाठी त्यांना दुसर्या सापाची गरज नसते. माद्या फलित अंडी घालतात, त्यातून पिल्लं बाहेर पडतात. म्हणजे एक साप असला तर तिथे अजून येणारच. याला नागाचं पिल्लू समजणारे शहाणे फक्त आम्हीच नाही - असे भरपूर साप नागाची पिल्लं समजून मारले जातात, पण सुदैवाने त्यांची संख्या भरपूर आहे, आणि कुंड्यांमधल्या मातीत हे खूप वेळा असतात. कुंड्या, रोपं, बागेची माती या माध्यमातून मूळचे आशिया आणि आफ्रिका खंडामधले हे साप आता जगभर पसरले आहेत. (त्यांना Flowerpot snake असं नाव मिळालंय यामुळे!)

माऊची आणि सापाची पुन्हा कधी अचानक भेट होईल माहित नाही. तेंव्हा परत एकदा हा साप विषारी आहे का माहित नाही, त्यामुळे वॉचमननी तो मारला तरी काही बोलता येत नाही अशी वेळ येऊ नये असं वाटतंय. पुण्यात, पश्चिम पुण्यात तुमच्या माहितीतले कुणी सर्पमित्र असतील तर सांगता का?
2 comments:
कलर्सवरच्या नागार्जुनच काही रहस्य दिसतंय इथे... ;)
बघ ना! :D
Post a Comment