Friday, November 6, 2009

आजची गंमत


आता किमान चार पोस्टतरी बागेतला फोटो टाकायचा नाही असं मी ठरवलं होतं. पण असं काही बघितलं, की फोटो काढावाच लागतो, आणि तो मनासारखा आल्यावर पोस्टल्याशिवाय चैन पडत नाही :)



मोठ्या आकाराच्या फोटोसाठी वरच्या फोटोवर टिचकी मारा.

कळीशेजारच्या कवडीसारख्या आकारावरचा तो थेंब बघितलात? तो पाण्याचा थेंब नाही. झाडावरच्या प्रत्येक काळीला अशी एक एक कवडी आहे, आणि प्रत्येक कवडीवर पाण्यासारखा दिसणारा (मधाचा?) एक एक थेंब आहे! किती सुबक कलाकृती निर्माण केलीय त्याने - आज हा थेंब दिसला नसता तर एवढी मोठ्ठी गंमत मला कधी कळलीच नसती! अशी किती गुपितं एकेका कळीमध्ये लपलेली असतील?


देवाची करणी अन कळीवर कवडी!

24 comments:

भानस said...

गौरी अग काय विलक्षण किमया आहे ही. बरे झाले गं पोस्टलेस...नाहीतर हे आम्हांला कसे पाहायला मिळाले असते. तो थेंब चाखून पाहा ना...म्हणजे कळेल तरी....

Gouri said...

हो गं मला पण वाटत होतं आज त्या थेंबाची चव घेऊन बघावी म्हणून. आता कुणा जाणकाराला विचारते. नाहीच समजलं, तर हळूच चव घेऊन बघणार. :)

आळश्यांचा राजा said...

मग? कशाचा थेंब आहे तो?

Gouri said...

आ.रा., आज खूप दिवसांनी ब्लॉग जगतात आलास?

थेंब पाण्याचा नाही एवढं निश्चित.

उद्या आमचे झाडांचे डॉक्टर भेटणार आहेत. मग कळेल. (त्यांनाही माहित नसेल तर मी चव घेऊन बघेन ना)

Raj said...

wa! pharach sundar. photu dilyabaddala aabhar.

Gouri said...

राज, आज हा शोध लागल्यावर मला एकदम चंद्रावर पाणी सापडल्याइतका आनंद झाला होता. त्यामुळे फोटो काढणं क्रमप्राप्तच होतं :)

Anonymous said...

मस्त आहे एकदम...आणि असली चार पोस्टनंतर बागेचा फोटो वगैरे काहीच अट नको...हे असे तूझे डिस्कवरी चॅनल फार भारी आहे...
कसल्या कळ्या आहेत त्या?

Gouri said...

सहजच,

अगं चार पोस्टनंतरच बागेचा फोटो म्हटलं की आधीची चार पोस्टं लिहिली जातील असा विचार होता माझा :)

मी अनंत वेळा या झाडाचं नाव विचारलं आहे, आणि तितक्याच वेळा यशस्वीरित्या विसरूनही गेले आहे. (माझ्याकडे ही २ झाडं टेरेसच्या दाराशेजारी दोन्ही बाजूला आहेत, त्यामुळे त्यांची घरची नावं जय (लाल) - त्याचा हा फोटो आहे - आणि विजय (पिवळा) अशी आहेत :P) आज नेटवर पुन्हा शोधलं आणि बरंच ज्ञान मिळालं:

बाकी लोक माझ्या जय-विजयना पॉन्सेशिया (Poinsettia) नावाने ओळखतात. जर्मन मध्ये याला ‘Weihnachtsstern’ म्हणजे ख्रिसमसचा तारा असं सुंदर नाव आहे, (ख्रिसमसचा या झाडाशी संबंध लावतात.) ही झाडं विषारी असतात असा एक गैरसमज प्रचलित होता.

अपर्णा said...

मस्त फ़ोटो आहे आणि झाडांना नाव द्यायची तुझी कल्पना अभिनव आहे....असे फ़ोटो असतील तर खरं तर लगेच पोस्टले पाहिजेत काय??

Gouri said...

अपर्णा, अगं आजच काढलाय हा फोटो. काढल्यावर तो पोस्टल्याशिवाय रहावलंच नाही मला!

Anonymous said...

Made me smile :)

Gouri said...

Mahendra,

I see it and I hear it but how can I explain
The wonder of the moment to be alive and feel the sun
That follows every rain

allinfo said...

निव्वळ अप्रतिम फोटो!!!

Gouri said...

laxmi, pratikriyebaddal dhanyavaad.
blog var svaagat!

HAREKRISHNAJI said...

surekh

sugandha said...

तुम्ही खूप सुरेख लिहिता आणि फोटो तर त्याहून सुंदर.

Gouri said...

@Harekrishnaji, dhanyavaad.

@ sugandha, blog var svagat. photo, post aavadali mhanoon chhaan vaatale :)

Anonymous said...

मस्तच फोटो, एकदम फ्रेश.

Gouri said...

धन्यवाद अनुजा!

Pankaj - भटकंती Unlimited said...

चला, आज ह सगळा ब्लॉग पालथा घालता घालता उद्याच्या डेस्कटॉप वॉलपेपरची सोय लागली. धन्यवाद.

Gouri said...

पंकज, अजून आहेत फोटो ... पुढची पोस्ट त्यावरच टाकणार आहे

Pankaj - भटकंती Unlimited said...

अरे वा. म्हणजे रोजची चिंता मिटली. खूप दिवसांनी मी दुसऱ्या कुणी काढलेला फोटो डेस्कटॉप वॉलपेपर म्हणून लावलाय बरं... मेल आयडी दिलास तर स्क्रीनशॉट मेल करतो.

Leena Chauhan said...

मस्त फोटो आहे. जर मोठा करुन पाहिला तर त्या थेम्बामधे तुझे प्रतिबिम्ब सुद्धा दिसत आहे. अप्रतिम....

Gouri said...

लीना, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल आभार! थेंबामधलं प्रतिबिंब मी सुद्धा नीट बघितलं नव्हतं!