Saturday, November 21, 2009

सुई, दोरा आणि मी

    आमची शाळा मुलाची आणि मुलींची एकत्र होती. प्रत्येक वर्गात साधारण २५ मुली, आणि ३० मुलं. तर शाळेत आठवीनंतर चित्रकलेऐवजी मुलांसाठी बागकाम आणि मुलींसाठी शिवण असे विषय होते. हा माझ्या मते भयंकर मोठा अन्याय होता. एक तर आवडती चित्रकला सोडून द्यायची, आणि शिवाय मुलं बागकाम करत असतांना मुलींनी शिवण शिकायचं? सगळ्या मुलांना बागकामात गती असते, आणि सगळ्या मुलींना(च) शिवण आलं पाहिजे हे लॉजिक तेंव्हा माझ्या काही पचनी पडलं नव्हतं. पण विद्यार्थांनी प्रश्न विचाराण्याची आणि त्यांच्या असल्या प्रश्नांना उत्तर देण्याची पद्धत शाळेत नव्हती आणि माझ्याखेरीज शाळेतल्या कुणाला - शिक्षकांना, मुलींना किंवा मुलांना यात काही वावगं वाटतही नव्हतं.
   
    हा अन्याय माझ्यावर नववीत होणार असला, तरी पाचवीपासूनच मला याचा भयंकर राग होता, आणि निषेध म्हणून मी चुकूनही शिवण शिकायचा कधी प्रयत्न केला नाही. अगदी आईचा भरतकामाचा सुंदर रेशमाच्या लडींनी भरलेला डबासुद्धा मला मोहवू शकला नाही. आईने कधी जबरदस्ती केली नाही, पण मला अगदी जुजबी का होईना पण शिवण शिकवायचा प्रयत्न नक्कीच केला. पण ज्याला शिकायचंच नाही त्याला कोण शिकवू शकणार? सुदैवाने आठवीनंतर मी ती शाळा सोडली, त्यामुळे ही नावड एवढ्यावरच राहिली.

    पुढे कॉलेजमध्ये कधीतरी जाणवलं - पोहणं, स्वयंपाक यांसारखंच शिवणं हे सुद्धा एक जीवनावश्यक कौशल्य आहे. मुलींनाच नव्हे, सगळ्यांनाच आलं पाहिजे असं. त्यानंतर मग साधं कुठे उसवलं तर चार टाके घालणंच काय, पण अगदी हौसेने ड्रेसवर कर्नाटकी कशिदा भरण्यापर्यंत माझी प्रगती झाली. (त्यासाठी किती वेळ लागला हा भाग वेगळा - कारण प्रत्येक टाका मनासारखा आला पाहिजे ना!) नेटक्या,एकसारख्या टाक्यांमधलं सौंदर्य खुणवायला लागलं. काश्मिरी टाका, कांथा, कर्नाटकी कशिदा अशा आपल्या भरतकामातल्या सांस्कृतिक वारश्याचं महत्त्व जाणवायला लागलं. उत्तम बसणारा, आपल्याला हवा तसा (शिंप्याला नव्हे) कपडा शिवण्यातला सर्जनाचा आनंद आपण इतके दिवस का दूर ठेवला हा प्रश्न पडला. आयुष्यात एकदा तरी हे सगळं आपल्या हाताने करून बघितलं पाहिजे याची खात्री पटली. एवढे दिवस या कलेपासून आपण का फटकून वागत होतो याचा मागोवा घेताना लक्षात आलं, की याचं मूळ त्या (मी कधीच अटेंड न केलेल्या) जबरदस्तीने लादलेल्या शिवणाच्या तासामध्ये आहे!

31 comments:

dn.usenet said...

> पोहणं, स्वयंपाक यांसारखंच शिवणं हे सुद्धा एक जीवनावश्यक कौशल्य आहे.
>-------

स्वयंपाक करता येणं हे जीवनावश्यक नाही. तो आज़ूबाज़ूच्या कोणाला तरी करता आला की बास झालं. आणि तो कौशल्यपूर्ण रित्या यायला हवा असंही काही नाही. शिवण सुद्‌धा तुम्हा स्वतःला येणं आवश्यक नाही. तरी निदान (दिगंबर जैन मुनी वगैरे स्पेशल इंटरेस्ट गट सोडून) ज़वळपास प्रत्येकाला शिंप्याची गरज़ पडते, इतपत तरी सत्य आहे.

पोहणं मात्र अजिबातच जीवनावश्यक कौशल्य नाही. किनारा ४०-५० मीटरच दूर असेल आणि पाण्यानी मला संपवायचा निश्चय केला नसेल, तर किनारा मी गाठू शकतो. निदान एके काळी गाठू शकला असता. अज़ूनही कदाचित ते ज़मेल.

माणसाला किती कमी ज़मीन लागते, हे सतत सांगितल्या ज़ातं. पण त्याकडे हुशार लोक बरोबर दुर्लक्ष करतात. तसंच माणसाला खरोखर किती कमी कौशल्यरुपी गरज़ा असतात, हे आपण मान्य करत नाही; आणि तरीही चतुर लोकांना त्याचा बरोबर अंदाज़ असतो.

Gouri said...

dn.usenet, "माणसाला खरोखर किती कमी कौशल्यरुपी गरज़ा असतात, हे आपण मान्य करत नाही" या तुमच्या मताशी मी असहमत आहे. कौशल्य ही ‘गरज’ नाही मर्यादित ठेवण्यासाठी. तुम्ही शिकलेल्या कौशल्यातून तुमचंच आयुष्य समृद्ध होतं, निर्मितीचा आनंद मिळतो, आणि तुमचं सबलीकरणही होतं.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

Anonymous said...

आमच्या शाळॆत कारपेंट्री आणि सुतकताई हे दोन विषय होते. खुप बोअर व्हायचे दोन्ही पिरियड्स.. एक वर्ष सुतकताई, आणि एक वर्ष कारपेंट्री घेतलं होतं.

dn.usenet said...

गौरीबाई: 'शिकलेल्या कौशल्यातून तुमचंच आयुष्य समृद्ध होतं' या तुमच्या विधानाशी मी असहमत नाही. पण स्वयंपाक, आणि विशेषतः पोहणं आणि शिवणकाम या गोष्टी 'जीवनावश्यक' नाहीत.

तसंच पाहिलं तर लोळागोळा होऊन १०-१५-२० वर्षं ज़गलेले लोक आयुष्यात एक पाऊलही न टाकता ज़गतातच. पण ते काही ज़गणं नाही; तेव्हा 'चालता येणं' ही जीवनावश्यक गोष्ट मानायला हरकत नाही. पण स्वयंपाक, शिवण आणि पोहणं यातली एकही गोष्ट न येता करोडो (चतुर) लोक समृद्‌ध आयुष्य ज़गलेले आहेत आणि पुढेही ज़गतील.

'मी गाण्यावाचून ज़गूच शकत नाही' वगैरे वाक्यांचा भावार्थच पहायचा असतो. पण काही लोक त्यांचे हे दावे शब्दशः तुम्हाला पटावेत असा आग्रह धरतात, तेव्हा त्यांच्यामागचा फोलपणा मला ज़ाणवत राहतो. तुम्ही शब्दांचा आणि भाषेचा एरवी छान वापर करता, म्हणून मी हा छल केला.

('वेचा' शब्द गद्य उतार्‍याला वापरतात की पद्य की दोन्ही, ही शंका अज़ून आहेच. मी विचारून बघतो, तुम्हीही ज़मल्यास बघा.)

- डीएन डॉट यूज़नेट्‌

आनंद पत्रे said...

अबब... एव्हडा राग. नववीला होनार होता नं मग, पाचवी पासुनंच राग का?
आम्हालाही संगीत किंवा चित्रकला या पैकी एक सलेक्ट करायचा असायचा...आम्ही नाइलाजाने संगीत सोडुन चित्रकला निवडली कारण ती जास्त आवडायची...
छान लिहिलेय...

Gouri said...

महेंद्र, असे विषय सगळ्या मुलांवर लादण्यामधून मुलांनी काही शिकण्यापेक्षा त्या विषयासंबंधी नावडच निर्माण होण्याची शक्यता जास्त ...

डीएन डॉट यूज़नेट्‌, या विषयावर तुमच्या - माझ्या बेसिक दृष्टीकोनात मोठा फरक दिसतो. माझ्या समृद्धीच्या व्याख्येत अनुभवांची समृद्धी फार महत्त्वाची आहे. स्वतःच्या हाताने कुठलीही गोष्ट करण्यातला आनंद मला फार मोठा वाटतो - त्यापेक्षा उत्तम प्रतीची वस्तू विकत घेणं शक्य असलं तरी.

आनंद,
मला आवडता चित्रकलेचा तास बंद होणार
आवडतं बागकाम निवडता येणार नाही
मारून मुटकून शिवण शिकावं लागणार
कुणालाच यात गैर काही दिसत नाही
असा ४ पदरी राग :)

Gouri said...

डीएन डॉट यूज़नेट्‌, ‘वेचा’ गद्य-पद्य दोन्ही संदर्भात वापरतात का नाही, ते कुणा तत्ज्ञाकडून समजलं, तर सांगते.

Anonymous said...

गौरी,
आपण एखादी कला शिकलो नाही तर त्यावाचून बाहेर जगात अनेक पर्याय आहेच. पण स्वतामधील सृजनशीलतेचा
विकास कलेच्या आवडी मूळे होतो हे नक्कीच. मग ती कला चित्रकला, शिवण, वाचन, भाषण, बागकाम, कुठल्याही
विषयाची असेल. बाहेरचे आयुष्भर खावूनही मजेत राहता येते पण स्वतः आपल्यासाठी किंवा आपल्या प्रियजनांसाठी बनवलेला स्वयंपाक हा समाधान देवून जातो. काठावर उभे राहून पोहण्याच्या आनंद आहे का नाही हे
ठरवण्यापेक्षा पाण्यात उतरून एकदा तरी पहा....

Gouri said...

अगदी खरंय अनुजा. नेहेमी सगळं स्वतः करणं जमतंच असं नाही, पण करण्यातला आनंद काही और असतो. आई आणि मी तर दिवाळीची चकलीची भाजणी गंमत म्हणून घरी छोट्या जात्यावर दळायचो :)

dn.usenet said...

> माझ्या समृद्धीच्या व्याख्येत अनुभवांची समृद्धी फार महत्त्वाची आहे.
>------

I have not said anything which denies the points you are now raising. For something to be 'a necessity of life', it has to be so across the board. To a religious person, religion may mean everything and s/he may announce it to be a necessity of life, but it does not make it (viz. religion) an essential, much less a necessity.

Millions of people have lived rewarding (and often useful to others) lives, which you seem to value (and which I have not undervalued anywhere in my comments to brings our views in opposition to each other - 'बेसिक दृष्टीकोनात मोठा फरक') without knowing anything about the things which you consider 'necessities'.

If you think knowledge of swimming adds to the quality of life, you may call someone who does not know it ignorant, poorer for the lack, or even a moron. That is your prerogative. You still cannot insist that the said knowledge is a necessity of life.

If you are talking about 'quality of life', the goalposts are moved, it's a different game now, and I broadly agree with your views in the new game. But swimming or cooking are not 'necessities' even in the new game.


- dn

Gouri said...

hmm. It is true that how I want to live completely dectates what i consider as basic skills for living. These may not be necessary for mere physical existance, and going beyond survival, others may live a fulfilling life without these.

what would you consider as necessities of life? what are the basic skills according to you?

dn.usenet said...

> These may not be necessary for mere physical existence
>-----

Gouri-bai: Now we are talking.
.

> what would you consider as necessities of life? what are the basic skills according to you?
>---------

One does not need ANY skill in life, given sufficient luck. I know a gentleman (b. 1932-ish) who had a brother (born 1942-ish, died in 1998). To the best of my knowledge, this younger brother never did anything in his life. Even his nephew (who is my close friend) does not know what, if anything, his uncle did in his life. I do not know whether he could read or write, but everybody knows neither is a necessary skill at all. He duly got married (perhaps when he was 15), had 4 children, and throughout his adult life, he left home after a hearty lunch around 10 AM and came back at 8 PM for dinner. He used to spend the day with his friends.

The family was resigned to his being of no use; his wife, a proud woman who was conscious of her husband's uselessness, washed and cooked and slogged like crazy, and the family business took care of his children's education. The idle man never drank and never smoked, and somehow his friends tolerated his idle presence for years. He rarely spoke at home. One day he came home at his usual time, surprised everybody by laughing a lot at things for 10-15 minutes, and 5 minutes later, he died of cardiac arrest. I must admit I am jealous of the man. That is how I would have liked to live, and that is how I would like to die (albeit not at the young age of 55-56).

Shri Matthew Parris, a brilliant columnist with London Times, has pointed out that people who can see might consider vision to be the most essential, except that the ease with which blind people lead their lives, compared to deaf or dumb people, shows it to be relatively inessential. Food is essential, of course, but the caveman could eat uncooked food and if it came to it, man might adjust again to eating uncooked food. Its (food's) presence is definitely a necessity. Clothing comes very close to being essential, but our friends from the Digambar sect and Nudists' Colonies might disagree. A roof above one's head is almost a necessity because most people would die if totally unprotected from the elements; still the caveman managed well enough without the roof. Living without food for 4 months is even theoretically impossible, but living without clothes and shelter over a long period just may be manageable by a few sturdy souls. We are not talking about propogation of human species here, only about what is necessary for ONE individual; so then... has anything been left out? Sleep is also absolutely essential but it is not a skill. No doubt this sounds very cynical, but the world is what it is. It does not care one bit how you or I would have liked it to be like.


- dn

Unknown said...

गौरी, मला स्वत:ला या सगळ्या गोष्टी मुळातच आवडतात...कदाचित लहानपणी आजीला शिवणकाम, विणकाम, उत्तम स्वयंपाक असे चौफेर सगळ्या आघाड्यांवर पाहिले असल्यामुळे असेल....पण माझ्या बहिणीला मात्र तो कायम अन्याय वाटत असे!!!!मी आजही चित्रकला, विणकाम, शिवणकाम सगळे टिकवून आहे....
तुझा लेख आवडला....आणि तुझे मतं की कौशल्य आयुष्य समृद्ध करतात..पटले.

Gouri said...

dn.usenet, I will definitely not enjoy living like that ... I guess I would die of boredom :)

तन्वी, अगं शाळेत जर सक्ती नसती ना शिवणकाम शिकण्याची, तर बहुतेक मलाही आवडलं असतं ते ... शिकलंच पाहिजे म्हणता का, मग नाहीच शिकणार असा अडेलतट्टूपणा होता तो :)

Naniwadekar said...

गौरीबाई: 'स्वयंपाक' हा शब्द वापरायचा तुम्हाला अधिकार आहे, मला नाही. यापुढे मी निदान स्वतःपुरतं स्वैपाकाला 'परंपाक' हा शब्द वापरायचं ठरवलं आहे.

- डी एन

Gouri said...

परंपाक :D

sugandha said...

आम्हालाही सातवीत होतं शिवणकाम आणि भरतकाम. मला तर ते अजिबात आवडत नव्हतं. मग मी माझ्या वर्गातल्या या कलेत हुशार असणाऱ्या मुलींच्या मदतीनं त्यांना अभ्यासात मदत करण्याच्या अटीवर ते काम पूर्ण करत असे.अर्थात 'बाईंच्या' अपरोक्ष. तुमची पोस्ट वाचून ते दिवस आठवले.

Anonymous said...

gourai

lihi ke ajun.ag me yeun jate tuzyakarta.mazykadehi disat nahis.
kamat busy ashilach.vel milala ki bhet.
bye & t.c.

Gouri said...

सुगंधा, ‘एकमेका साह्य करू’ का ;)

अनुजा, अगं बरेच वेळा असं होतं, की कामातून डोकं वर काढायला काही संधी मिळत नाही. त्यामुळे मधून मधून मी बेपत्ता असते ब्लॉग जगतातून. पण परत संधी मिळाली की मग सगळ्यांच्या जुन्या पोस्ट पण वाचून काढते.

~G said...

tula punha ekda 'tag'lay me.

dn.usenet said...

'वेचा' विषयी शब्दकोशात दिलेली माहिती संक्षेपात अशी : निवडक भाग, उतारा, काही श्लोक; सारसंग्रह, मुख्य भाग एकत्र करून ज़मवलेला ग्रंथ, उदा. वामन पंडिताचे किंवा मोरोपंती वेचे. या अर्थानुसार शब्दाच्या वापरावर गद्य-पद्य-भाषा कशाचंच बंधन नाही. मी 'वेचा' शब्दाची सांगड उगीचच कवितेशी घातलेली होती.

'आठवणीतल्या कविता - भाग ३' मधे 'नीतिशतकांतील वेचे' या शीर्षकाखाली वामनाची रचना दिली आहे. लेखक लोक गद्‌य उतार्‍यासाठीही 'नरसोपंत केळकरांच्या टिळकचरित्रातला वेचा' असा प्रयोग सर्रास करतात म्हणे. आणि 'डेव्हिड कॉपरफ़ील्ड जेव्हा मि. मिकॉबरला पहिल्यांदा भेटतो तो वेचा' अशा संदर्भातही हा शब्द वापरायला काहीच हरकत दिसत नाही. शब्द तर मस्तच आहे. वापरत रहायला पाहिजे.

- डी एन

Akhil said...

सगळ्या कौशल्यासाहित आपण जन्माला येतो,
सगळा मटेरियल पूर्णपणे आत असत जन्माला येतो तेव्हा
पण कुठले कौशल्य आपण कसे प्रगत करतो, त्याला
पैलू कसे पडतात त्यानुसार एखादी कला, कौशल्य पुढे विकसित होते,
त्यात आपला रस असणे अत्यावश्यक असते,
एखाद्या कामाचा आनंद घेत घेत काम केले तर त्याचे
समाधान जास्त असते.. पैसा हि किमान गरज आहे,
माणसाची खरी कमाल गरज हि समाधान आहे..
मानस नेमके उलट करायला जातात
नाही का?

Dk said...

स्वयंपाक करता येणं हे जीवनावश्यक नाही. तो आज़ूबाज़ूच्या कोणाला तरी करता आला की बास झालं.>> :D :D

Gauri durdaaivaane aplya shikshanpadhateet ajunhee shivn muleena aani mulanaa baagkaam ast! arthat gharaat hi aaya neemulana shivn shikvaaycha prytn kela nasawa!

22 comments nntr mi kahi lihin ucheet nahi tarehi lekh awdlya :D

Dk said...

जीवनावश्यक कौशल्य >> hyavar evdha kaathyacut zaalaay ki mala > padto ki jeevnavshy kaay aahe? shaaws ghene evhch khare tare jeevnaavashyk aahe ki kaay?

dn.usenet ne mhtlyapramane jagaaych thrvle tar parvlambitvach hoil mag te nahi ka? arthat hi jyache tyache vykhyaa aani prshn mhna...

Gouri said...

@ अखिल, ब्लॉगवर स्वागत.
सद्ध्या ऑफिसमधलं कान संपता संपत नाहीये, त्यामुळे फक्त कॉमेंट मॉडरेशन चाललं होतं, त्यावर उत्तर लिहिणं ही जमलं नव्हतं.
एकदम स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण विचारांची आठवण झाली तुमची प्रतिक्रिया वाचल्यावर - आपल्या अंगीभूत कौशल्यांचा विकास म्हणजे शिक्षण!

पैसा आणि समाधान यात कुठली मोठी गरज याची नेहेमी गफलत होते हे तुमचं म्हणणं अगदी खरंय.

@दीप,

दूर कशाला - माझ्या भावांनीही कधी गरजेपुरतं शिवण शिकायचा फारसा प्रयत्न केला नसेल.

आणि २२ प्रतिक्रिया असल्या तरी तुझी पहिलीच प्रतिक्रिया आहे ना ही आणि लेख आवडला म्हणून... कौतुक वाचायला नेहेमी छानच वाटतं :)

Gouri said...

दीप, आधुनिक वैद्यकीय ज्ञानामुळे, श्वास घेता येत नसेल तरी वैद्यकीय मदतीवर जगवता येतंच की रुग्णाला ... म्हणजे मग श्वाससुद्धा नाही घेतला तरी (technically) काही हरकत नाही :)

शेवटी असं म्हणायला लागेल की आपल्याला कसं जगायचंय त्यावर अवलंबून आहे आपल्यासाठी काय काय जीवनावश्यक आहे ते.

अपर्णा said...

इतका छान लेख वाचल्यावर खरं तर सर्व प्रतिक्रिया वाचायला नको होत्या पण त्यातला बर्याचशा वाचल्या गेल्या आणि मला काय लिहायचं होतं तेच विसरले....:)
असो...पण छान लिहिलंस..मला वाटायचं अशी पराकोटीची राग करू शकणारी मीच आहे पण चला इथेही सोबतीला आहे कुणी...

Gouri said...

अपर्णा, अगं राग तर आलाच,आणि शाळेतल्या सक्तीचा राग बिचाऱ्या शिवणकलेवर काढला गेला!

Anonymous said...

actually maza blog wordpress var active ahe....... ithe blogspot var open karun baghitala, pan bhavane feb madhe open kela hota blog to march nantar suptavasthet gela hota... to ata oct nov madhe chalu zala ahe........
keep coming back @ http://akhiljoshi.wordpress.com

Anagha said...

गौरी, अगं किती कायकाय छानछान लिहिलयस! मी बघितलंच नव्हतं! पण आता आज दुपारी बसून वाचेन! :)
जबरदस्ती झाली म्हणून शिवणकाम तुला आवडलं नाही ना!
जेंव्हा एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून करायला घेतो तेंव्हा ती नेहेमीच चांगली होते. पण तीच गोष्ट दुसऱ्या कोणी सांगून करायला घेतली कि झालं त्याचं कल्याण!
आता हे लेकीला मोठं करताना तर खूपच जाणवलं! ;)

Gouri said...

अनघा, तुझी ‘शिवणकला’ वाचून फार छान वाटलं, शाळेतल्या शिवणकलेचा ताप झालेलं अजून कुणीतरी आहे म्हणून :)