Monday, December 21, 2009

बेपत्ता

गेले दहा बारा दिवस मी गायब आहे. नेट, मोबाईल, रोजचा पेपर, टीव्ही या सगळ्यापासून दूर. आता शरीराने रोजच्या जगात परत यावं लागलं, तरी मन अजूनही तिथेच रेंगाळतं आहे. काय बघितलं, अनुभवलं आणि कसं वाटलं, हे सांगण्यासाठी शब्द पुरेसे नाहीयेत, कॅमेऱ्याची चौकट तोकडी पडते आहे. त्यातल्या त्यात, फोटोत बंदिस्त होऊ शकलेली ही एक छोटीशी झलक.

*************************************************************

दिवसाची सुरुवात इतकी मस्त असते का रे भाऊ? आपण तर कधी सक्काळी सूर्याजीला असा बघितलाच नव्हता


कधी शांत, धीरगंभीर



तर कधी अवखळ


काही वाटा संपूच नयेत...



पोटभर दंगा


देवाचिये दारी

 
 
वेगवेगळी फुले उमलली - कुणी रानात, तर कुणी बागेत. काही लहान, तर काही मोठी. कुठे सुगंधी तर कुठे गंधहीन. सगळी आपल्याच मस्तीत, आणि तेवढीच आनंदी! एकेकट्या फुलांचे किती फोटो टाकू ... हा एक कोलाजचा प्रयत्न.



27 comments:

Anonymous said...

अप्रतीम.. खुप सुंदर आहेत फोटॊ..

Gouri said...

महेन्द्र, फोटोतही न सामावणारं एवढं काही होतं ना ... नुसतं बघत रहावं!

Anonymous said...

:) कुठले फोटॊ आहेत हे??फोटो कोल्हापुरच्या जवळपासचेच असावे असे वाटते.

Gouri said...

शेतातला दंगा उत्तर कर्नाटकातला. सूर्योदय कूर्गमधला. पाण्याचे फोटो ऊटीजवळ पयकाराचे. रस्ता तिथून जवळच (मुदुमलईला जाणारा). गोपूर म्हैसूरजवळ नंजनगूडचं. आणि फुलं या सगळ्या प्रवासातली.

आनंद पत्रे said...

ह्याला म्हणतात 'मोकळे आकाश' :)
फोटो खूपच सुंदर आले आहेत....
दाटीवाटीच्या जगात परत स्वागत ;-)

Sunshine said...

खूपच छान आहेत फोटो . कधी कधी सिमेंटच्या जंगलापासून लांब असं मस्त वाटत नाही का ?

प्रसाद साळुंखे said...

सुंदर, छान आहेत सगळे फोटो,
आयुष्यातली नेहमीची प्रश्नचिन्ह विसरायला मदत करतो निसर्ग ...

Unknown said...

मस्त मोकळ्या आकाशात श्वास घेउन आलीस ना!!! मधे मधे असा ब्रेक हवाच गं!!! सुंदर आहेत फोटो!!!!

Yogesh said...

Awesome Photos!!! Ph.No. 1 & 2 Khup mast aahet!!!

~G said...

surekh. you seem to have roamed a lot more than just coorg. how was your stay? Do write about the whole trip sometime.

भानस said...

गौरी अप्रतिम आहेत गं फोटो. प्रसन्न आल्हाददायी सकाळ, फुले आणि मुले म्हणजे दुधात साखर. खरेच मधूनमधून हे असे क्षण हवेतच.

Gouri said...

@ आनंद, हा सगळा परिसरच इतका सुंदर आहे, की फ्रेममध्ये काय घ्यावं, काय घेऊ नये असा संभ्रम पडावा.
आज ऑफिसचं काम म्हणजे खरोखर शिक्षा वाटते आहे :(

@ blue mist, खरं म्हणजे तिथून परतावंसंच वाटत नव्हतं!

@ प्रसाद, खरं आहे. निसर्गासारखा स्ट्रेसबस्टर नसेल.

Gouri said...

तन्वी, अगं मी अगदी वाट बघत होते या सुट्टीची. ऑफिसचं काम म्हणजे त्याला काही अंतच नाही अशी परिस्थिती झाली होती. त्यातही सगळं ठरल्यानंतर अचानक येणारी विघ्नं, जायला मिळणार का नाही याची अनिश्चितता सगळे प्रकार झाले. त्यामुळे थेट तिथे जाऊन धडकेपर्यंत मलाच खात्री नव्हती नक्की जाता येणार ना याची! त्यामुळे अजूनच जास्त एन्जॉय केलं सुट्टीमध्ये.

Gouri said...

@ मनमौजी, ब्लॉगवर स्वागत. हा परिसरच इतका सुंदर आहे, की फोटो कसाही काढला तरी सुंदरच यावा :)

@ G, तुला म्हटलं तसं कूर्ग बघितल्यानंतर २ दिवस उरणार होते ना, मग अचानक ठरवलं आम्ही उटीला जायचं. आणि उटीहून म्हैसूरला before time पोहोचणार होतो, त्यामुळे वाटेत नंजनगूडला थांबायचं ठरलं. आमच्या जवळजवळ प्रत्येक ट्रीपमध्ये असा काहीतरी on the fly कार्यक्रम असतो ... आणि जनरली तो आधीपासून ठरवलेल्या कार्यक्रमाइतकाच मस्त होतो असा अनुभव आहे ... धरमशालाहून येताना तर बसमध्ये बसल्यावर ठरवलं होतं आम्ही दिल्लीऐवजी अमृतसरला जाऊ या म्हणून :)
btw, तुझा बनाना जॅम आणलाय.

Gouri said...

भानस, अगं मला अगदी गरज वाटत होती या सुट्टीची ... ‘निर्वाणाय तरुच्छाया तप्तस्य हि विशेषत:’ असं एका संस्कृत सुभाषितात होतं ना ... उन्हातून आल्यावर सावली जास्त छान वाटते - तसं झालं माझं.

(फुलांचा कोलाज छोट्या आकारात चांगला नाही दिसत - फार गर्दी वाटते आहे हे मी आत्ता पाहिलं - फुल साईझमध्ये नीट दिसतोय तो फोटो.)

HAREKRISHNAJI said...

फोटो देखणे कि वर्णन सांगणे कठीण, हा सारा परिसर नितांतसुंदर आहे.

म्हैसुर ते कुर्ग, वाटॆमधले दुबारे हत्तींचा कॅप तर अप्रतीम, तिबेटीयन मॉनेस्ट्रीज. म्हैसुर ते उटी , अभयारण्यातुन जाणारा रस्ता, मसीनागुडी ( पुण्याचा कृष्णमेघ कुंटे येथे काही महिने संशोधनासाठी राहिला होता ) , सारा सारा परिसर मोहिनी घालतो.

Gouri said...

हरेकृष्णजी, म्हैसूर ते कूर्ग, दुब्बारे, बैलकुप्पेची तिबेटन वसाहत, म्हैसूरहून उटीला जाताना अभयारण्यातून जाणारा रस्ता ... सगळं बघायला मिळालं. मसीनगुडीहून पुढे जाताना ‘रानवेड्याची शोधयात्रा’ आठवली. नवरा कूर्गमध्ये शिकायला होता, त्यामुळे निसर्गसौंदर्याबरोबरच त्याच्या कॉलेजच्या आठवणीही होत्या सहल सुंदर बनवणाऱ्या.

सुरेश पेठे said...

व्वा !खरंच फोटो पाहून जणू तिथे असल्यांचा भास आनंददायी आहे. अधून मधून निसर्गात रमण्य़ाची संवय हवीच,पुन्हा नव्या जोमाने आव्हाने पेलवायला!

Gouri said...

पेठे काका, ब्लॉगवर स्वागत. तन्वीच्या ब्लॉगमधून तुमच्या चित्रांची ओळख झाली होती. तुम्हाला फोटो आवडले आणि आवर्जून प्रतिक्रिया दिलीत म्हणून छान वाटलं. आणि followers मध्ये तुमचं नाव बघून मुठभर मांस चढलं :)

असा सुंदर निसर्ग बघितला की खरंच हुरूप येतो काही नवं करायला.

Anonymous said...

गौरी, अशा कारणाकरिता आमच्या मध्ये नव्हतीस हे किती छान झाल!. अस मला खात्रीने वाटतंय. किती सुंदर फोटो काढलेस ग.परिसर पण अप्रतिम आहेच.पारदर्शी फोटो आहेत,तुझ्या पोस्ट सारखे . उगाच नाही सगळे तुझी वाट पाहतात. 'जी' ची पोस्ट पण भन्नाट आहेच.आवर्जून सांगायला आलीस म्हणून फोटो पाहून शांत मनाने उद्या सकाळची वाट उत्साहाने पाहते. आणि हो फोटोना पण छान समर्पक उल्लेखाने केलेले नामकरण ही गोंडस आहे. अशी गायब झालीस तरी चालेल फक्त एक नोट ठेवून जात जा. आल्यावर त्याच ठिकाणी नवीन आंनद
आम्हाला असाच मिळू दे.

HAREKRISHNAJI said...

चार फोटोंनी समाधान होणे नाही. प्लीज अजुन फोटो टाकाना.

Gouri said...

@ अनुजा, अगं किती कौतुक करशील :)

@ हरेकृष्णजी, फोटो भरपूर आहेत. टाकते.

सिद्धार्थ said...

फोटो खूप छान आहेत. फोटो बघून इतके प्रस्सन वाटलं तर प्रत्यक्ष पहाण्यात किती आनंद मिळाला असेल. मी देखील १२-१३ डिसेंबरला कुर्गला होतो. मला फक्त अब्बे (?) फॉल्सचा स्पॉट आवडला. दुर्दैवाने आम्हांला कुड्कुडणारी थंडी अनुभवता नाही आली.

Aakash said...

devachiya daari: sunder ranga. apratim :)

Gouri said...

@ सिद्धार्थ, कूर्गमध्ये फारशी थंडी नव्हती ... उटीला मात्र चांगलंच गार होतं.

@ आकाश, ब्लॉगवर स्वागत. उतरत्या उन्हात फोटो मिळाल्यामुळे आकाशाचा गडद निळा आणि गोपुराचा सोनेरी पिवळा अशी रंगसंगती मिळाली.

Pankaj - भटकंती Unlimited said...

उटीच्या थंडीबद्दलचा माझा अनुभव सांगतो... कुणाला सांगू नको :-)

मी मार्चमध्ये गेलो होतो. एकटाच जीव. मला वाटले थंडी नसेल. उटीला पोचलो. आणि कुडकुडलो. सकाळी-सकाळी बाथरुमच्या फरशीवर पाय ठेववत नव्हता. कुणी नव्हते पाहायला. म्हणून मग हॉटेलच्या दोनपैकी एक टॉवेल अंथरुन आन्हिकं उरकली ;-)

Gouri said...

पंकज, :D :D

उटीला जायचां आमचं ऐनवेळी ठरलं. त्यामुळे हॉटेल ठीकठीकच मिळालं होतं. रात्री गार वाटत होतं म्हणून नवऱ्याला म्हटलं, खोलीची खिडकी बहुतेक थोडी उघडी राहिली आहे ... कुठून तरी गार हवा आत येते आहे. त्याने परत एकदा खिडकी बघितली आणि सगळं नीट बंद आहे म्हणून मला दामटवून झोपवलं. तसंच कुडकुडत आम्ही कसेबसे झोपलो ... सकाळी उठल्यावर मी परत बघितलं, तर खिडकी खरंच नीट बंद होती - फक्त शेजारी पडद्यामागे गॅलरीचं दार सताड उघडं होतं :D