Tuesday, December 22, 2009

G चा टॅग

एव्हाना G ने आशा सोडून दिली असेल मी या टॅगवर काही लिहिण्याची. पण उशिरा का होईना, उत्तर टाकते आहे मी. (याची माझ्या मागच्या पुस्तकांविषयीच्या टॅगवर कार्यवाही न करणाऱ्यांनी दखल घावी)
एका शब्दात लिहायची आहेत ही उत्तरं, पण G ने मला टॅगलंय, आणि तिनेही थोडंफार स्वातंत्र्य घेतलंय उत्तरं लिहितांना, तर मी थोडं फाSSर स्वातंत्र्य घेतलेलं चालेल तिला असं गृहित धरतेय.


(सूचना ... कंसातले शब्द मोजू नयेत ... ती सर्व प्रकट स्वगतं आहेत)

****************************************************************
1.Where is your cell phone?
टेबलवर

2.Your hair?
घरभर
(प्रचंड गळताहेत सद्ध्या)

3.Your mother?
बेश्ट फ्रेन्ड

4.Your father?
बिच्चारे

5.Your favorite food?
(बरंच काही ... पहिले आठवली ती) गरम गरम भाकरी आणि खानदेशी भरीत.

6.Your dream last night?
रात्रीचं स्वप्न कधी आठवतच नाही मेलं :(
(म्हणून मग मी दिवसा परत स्वप्न बघते :D)

7.Your favorite drink?
ताक (ताजंच, आणि सायीचंच)

8.Your dream/goal?
हम्म ... इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सद्ध्या तरी मला शेती करायची आहे.

9.What room are you in?
होम ऑफिस :(

10.Your hobby?
एका शब्दात??? वाचन, भटकंती, जमलंच तर फोटो, कधीतरी चित्र काढणं, मस्त संगीत ऐकणं, कोडी (आणि दोऱ्याचा गुंतासुद्धा) सोडवणे, कधीमधी लिहिणे ... ही कायम बदलणारी, मारुतीच्या शेपटासारखी वाढत चाललेली यादी आहे.

11.Your fear?
काही न करताच मरून गेले तर !

12.Where do you want to be in 6 years?
ठरायचंय अजून

13.Where were you last night?
आईकडे
14.Something that you aren’t?
diplomatic

15.Muffins?
ब्लुबेरी
(आंजीने घरी बनवलेले, आणि आवर्जून सगळ्यांसाठी ऑफिसमध्ये आणलेले)
16.Wish list item?
शेती

17.Where did you grow up?
भुसावळ, पुणे

18.Last thing you did?
टेरेसवरची कबुतरं हाकलली
19.What are you wearing?
आईचा ड्रेस

20.Your TV?
(नेहेमीप्रमाणेच) बंद

21.Your pets?
नाहीत :(
(सद्ध्या फक्त नवरा पाळते आहे)

22.Friends?
हायेत ना.
(नशीब लागतं असे मित्रमैत्रिणी मिळायला.)

23.Your life?
full of surprises

24.Your mood?
सुट्टी संपल्याच्या दुःखात

25.Missing someone?
हो ...
(missing + jealous ... नवरोबा माहेरपण + जास्तीची सुट्टी एन्जॉय करतोय आणि मी परत कामावर :( )

26.Vehicle?
वॅगन आर

27.Something you’re not wearing?
दागिने (नसती कटकट)

28.Your favorite store?
    १. व्हिनस (नवे कागद ,पेनं, वह्या, रंग यांची अनोखी दुनिया ... हळूच एक वही उघडून कोऱ्या पानांचा वास घेऊन बघावा. कुणाच्या हातात जाईल ही? हिच्यावर कोण काय लिहिल बरं?)

    २. किंवा मंडई (हसू नका. पण ताज्या भाज्या इतक्या सुंदर लावलेल्या बघणं हे सुद्धा एक सुख असतं. इतका ‘लेटेश्ट’ माल तुम्ही दुसऱ्या कुठल्या दुकानात बघितला आहे कधी? आणि इथे कितीही खरेदी केली, तरी कुणी तुम्हाला विनाकारण खर्चाबद्दल काही म्हणू शकत नाही. आईकडे मी भाज्या घेऊन आल्यावर त्या टेबलभर पसरून नव्या साड्यांकडे बघावं तसं त्यांच्याकडे डोळे भरून बघत बसायचे. :))

Your favorite color?
(सद्ध्या) हिरवा

29.When was the last time you laughed?
काल

30.Last time you cried?
मागच्या आठवड्यात

31.Your best friend?
आई
(सांगितलं की राव मघाशीच)

32.One place that you go to over and over?
आईकडे

33.One person who emails me regularly?
My manager!
(G चं चोरलेलं उत्तर ... सगळे एकाहून एक आळशी आहेत ... नियमित मेल कुणी पाठवेल तर शप्पथ. लग्नानंतर वर्षभराच्या आत तीन महिने परदेशात एकटी होते, तर नवरोबाने मोजून २ मेल पाठवल्या होत्या :( )

34.Favorite place to eat?
आत्ता पुण्यात वैशालीला जायला आवडेल.

****************************************************************

मी सुलभा, अनुक्षरे, तन्वी, महेंद्र, आळशांचा राजा आणि भानसला टॅगते आहे.

23 comments:

Unknown said...

गौरी तुझा टॅग जसाच्या तसा माझ्या नावाने खपवला तरी चालेल...येव्हढी मॅच होताहेत उत्तरे.....

Anonymous said...

टाकलं उत्तर..

Anonymous said...

टाकलं उत्तर..

~G said...

Hehe! Masta majja ali vachatana. Ani ho, LOL at Gacchi varchi kabutare haakalli :)

भानस said...

गौरी तन्वीला दुजोरा.ते शेती आणि व्हिनस/मंडई.....अहाहा...यस्स्स...आणि बेश्ट फेन्ड पण...जमल जमलं गं आपलं गौरी ...:)

HAREKRISHNAJI said...

Interesting

Gouri said...

तन्वी, एक उत्तर नक्की वेगळं असणार बघ ... तू नक्की कबुतरांना हकललं नसशील आत्ताच :D

Gouri said...

महेंद्र, मजा आली तुमची उत्तरे वाचताना ... या साध्या दिसणाऱ्या प्रश्नांना एवढी वेगळी उत्तरं येऊ शकतील असं वाटलंच नव्हतं मला आधी.

Gouri said...

G, अगं सद्ध्या घरी असलं म्हणजे कबुतरं हाकलणं हे एक काम होऊन बसलंय ... पांढरी कबुतरं कुणाला विश्वशांतीचं प्रतिक वगैरे वाटतात ... माझ्या मते पारवे हे जागतिक मठ्ठपणाचं प्रतिक आहेत. कावळ्यांसारखं त्यांच्याशी धड भांडताही येत नाही :)

Gouri said...

भानस, अगं मला वाटलं नव्हतं इतकी जुळणारी उत्तरं कुणाची मिळतील म्हणून ... आपण सगळे एकाच माळेचे मणी असं म्हणायचं का आता ;)

Gouri said...

हरेकृष्णजी, तुमचं नाव सुटलं टॅगताना ... तुमची उत्तरं वाचायला आवडतील या प्रश्नांवरची.

Anonymous said...

ha kaay prakar aahe koni saangal ka mala?

Gouri said...

सोनल,
टॅग करणं म्हणजे खो देणं. आपल्याला मिळालेल्या टॅगमध्ये सांगितल्याप्रमाणे पोस्ट टाकायची, आणि आपण कुणालातरी टॅग करायचं. इथे मला G ने टॅगलं होतं. मी ही पोस्ट लिहिली, आणि तन्वी,अनुजा, भानस, महेंद्र अश्या काही जणांना टॅगलंय. अनुजा, महेंद्रनी पुढे कुणकुणाला.

Anonymous said...

टाकलं उत्तर..

आनंद पत्रे said...

१. व्हिनस (नवे कागद ,पेनं, वह्या, रंग यांची अनोखी दुनिया ... हळूच एक वही उघडून कोऱ्या पानांचा वास घेऊन बघावा. कुणाच्या हातात जाईल ही? हिच्यावर कोण काय लिहिल बरं?)

...

खूप आवडलं तुमचं हे उत्तर... मला अगदी ताज्या वर्तमानपत्राचा, शाईच्या छपाईचा वास (सुगंध) घ्यावा वाटतो..
उत्तर एकदम मस्त! मनातून

Gouri said...

@ अनुजा, बघितलं ग. एकेकाची उत्तरं वाचताना सहीच करमणूक होते आहे :)

@ आनंद, अगदी ... शाळेत असताना नवीन वर्ष सुरू झालं की नव्या पुस्तकांच्या वासाची आठवण झाली एकदम ... जवळपास दर आठवड्याला शनिवार - रविवारी माझा आईला फोन असतो, व्हिनस मधून काही आणायचंय का म्हणून :)

अपर्णा said...

तुझा टॅग (खरं तर जी किंवा ज्याचा असेल त्याचा....:)) किती पुढे गेला पाहिलंस का??
तुलाच कॉमेन्टायचं होतं पण काय आहे ढापलेल्या उत्तरांवरुन स्वतःचं लगेच बन्वायचं म्हणून निवांत आले कॉमेन्टायला..
तुझं ते स्टोर नं२ मंडई मस्त वाटलं वाचायला...मी किचन पासुन तेव्हाही पळायचे म्हणून भाज्यांचं सौंदर्य जाणवलंच नाही...आणि आता किचन अख्खं (नसलेल्या कामवालीसकट) गळ्यात पडलंय...

प्रसाद साळुंखे said...

28 चं उत्तर आवडलं :)

HAREKRISHNAJI said...

Thank god it's over.

टाकलं उत्तर..

Gouri said...

@ prasad, majha baki shopping vishayi ustahach asato. mall madhye jane mhanaje tar sankat ... nirupayogi vastunchya na sanpanarya ranga ... tyamule ha prashn mhanaje motthe challenge hote majhyasathi ... mag lakshat aale ... venus, mandai ya aavadatya jaga suddhaa 'store' chya definition madhye yetat ki :)

@ Harekrishnaji, maja aali tumachi uttare vachatana ... blog vachun lekhakavishayi aapale kahi andaj asatat ... ani uttare vachalyavar lakshat aale, ki te andaj pharase chukale nahit !

विशाल तेलंग्रे said...

लयच आळशी आहात, तुमची उत्तरं वाचतांना मला बी आळस यत व्हता...! ;) पण मस्त जमलयं...

- विशल्या!

HAREKRISHNAJI said...

गौरीजी,

मी चरितार्थासाठी काय करत असीन ? काही अंदाज ?

Gouri said...

something at IIT Pawai?