Tuesday, February 9, 2010

फ्री हिट काऊंटरवाल्यांचे आभार!

    डिसेंबर २००८ मध्ये ब्लॉगवर फ्री हिट काऊंटर टाकला. तोवर साधारण ५०० हिट्स झाल्या असतील असा अंदाज होता, त्यामुळे ५०० पासूनच सुरुवात केली. त्यानंतर दर पोस्टला किती लोकांनी भेट दिली, हे बघणं हा नवा चाळा सुरू झाला. आपण लिहितो, ते केवळ स्वान्तसुखाय असं कितीही म्हटलं, तरी ब्लॉग हिट चा आकडा वाढणं हे सुखावणारंच होतं. माझ्याही नकळत मनात कुठेतरी हिशोब होत असावा ... या आठवड्याला किती हिट्स झाल्या याचा. परवा अचानक फ्री हिट काऊंटर ७००० च्या जवळ होता तो सरळ २८०० ला रिसेट झाला. टेंप्लेट कोडला हात लावलेला नसताना हे कसं काय झालं म्हणून अस्वस्थ वाटलं उगाचच. त्या अस्वस्थ वाटण्याने जाणीव करून दिली ... हा काऊंटर काढून टाकायचा असं आपण ठरवतो आहोत, पण कुठेतरी मनात ‘टार्गेट’ आहे किती ब्लॉग हिट्स हव्यात याचं. 
    रिसेट झाल्यामुळे आता त्या आकड्याला काही किंमत नाही राहिली. ... The counter does not count any more. एका निरर्थक ‘उद्दिष्टा’पासून मुक्त केल्याबद्दल फ्री हिट काऊंटरवाल्यांचे आभार मानायला पाहिजेत!
    पुढच्या ब्लॉगसफाईमधे काऊंटर नक्की काढून टाकणार!

20 comments:

विक्रम एक शांत वादळ said...

haha
10 k hota hota rahile ki ho tumache
asu de aakadech sarv kahi nastat
tumhi lihit raha lok vachat rahtil tyat aakdyana jada mahtv denyachi garaj nahi
जीवनमूल्य

Anonymous said...

अगं नषचक्र आहे ते हिट काउंटर म्हणजे.....मी पण ते काढून टाकले आता खरा माझा ब्लॉग स्वांतसुखाय.........आणि बाई तुम्ही मस्त लिहीताय या नसत्या आभुषणांची जरज नाहीये ब्लॉगला........

Anonymous said...

कसले अशुद्ध झालेय आधीचे कमेंट ’नष्टचक्र’ आणि ’गरज’ म्हणायचेय गं मला....मधे मधे माझी ’गौरी’ टाईप करतेय म्हणून हा घोळ!!!!

Gouri said...

@ विक्रम, 10k माझ्या वेगाने बराच लांबचा टप्पा होता ... तिथे पोहोचण्यापूर्वी नक्की हिट काऊंटर काढलेला असेल :)

@ सहजच, अगं समजतंय तुला काय म्हणायचंय ते. ही प्रतिक्रिया तुमची दोघींची म्हणायला पाहिजे, नाही का :)

भानस said...

गौरी,तू लिहीत राहा गं आम्ही वाचूच.:) बाकी काही गोष्टी नष्टचक्रच आहेत.:(

हेरंब said...

तन्वीशी १००% सहमत. असाच चाळा मला पण लागला होता सुरुवातीला.. मग हिट्स कमी आले कि वाईट वाटणं वगैरे. पण २ महिन्यांपूर्वीच या पाशातून मुक्ती मिळवली. आता फक्त स्वान्तसुखायच..
तुझेही "झाले मोकळे आकाश" ते बरं झालं.

आनंद पत्रे said...

काउंटर काय महत्वाचा हो, अनेकजण भेट देवुन आवर्जुन प्रतिक्रिया नोंदवतात हेच यश!

Anonymous said...

गौरे (रागावलेय म्हणून नावात बदल) हे बघ ’सहजच’ नावाने जरी कमेंट आले तरी ते देणारी ’तन्वी’ नावाची बाई आहे हे माहितीये ना........मग उत्तर ’सहजच’ ला???? न्येक्श्ट टाईम ये मिष्टेक नय मंगताय...बोले तो!!!!!!!!!!!
अगं मला जमत नाहीये ’तन्वी’ नाव ब्लॉगाला कसे लिंक करायचे ते...महेंद्रजी वा अनिकेतला गाठायला हवेय पण मुळात वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉटचे भांडण ,,मग काय कूठल्यातरी नावाने जातेय ना कमेंट मग टायपा.....
मगर तुम्हारेको क्या हमारा नाम मालुम नै क्या????

Gouri said...

@ भानस, हेरंब, खरंच नष्टचक्र आहे हे. आणि त्याचं व्यसन लागतं. त्यातून बाहेर पडल्याशिवाय ब्लॉगिंगची मजा नाही.

@ आनंद, बरोबर आहे. काऊंटरपेक्षा प्रतिक्रिया महत्त्वाच्या. (आणि प्रतिक्रियांपेक्षा आपल्याला जे म्हणायचं आहे, तेच म्हणणं महत्त्वाचं, कारण जास्त प्रतिक्रियांसाठी हमखास प्रतिक्रिया मिळणाऱ्या गोष्टींविषयीच लिहिण्याचा मोह व्हायला लागतो, पुढच्या पोस्टला विक्रमी प्रतिक्रिया हव्यातच असं ‘टार्गेट’ तयार व्हायला लागतं.)

Gouri said...

@ तन्वी, ज्या आय डी वरून प्रतिक्रिया आली, तिलाच उत्तर दिलंय ... :D :D
मला हा प्रश्नच पडला होता, कधी ‘सहजच’ आणि कधी ‘तन्वी’ इसका राज क्या है म्हणून ...

Anonymous said...

बरं झालं काढुन टाकला. मी पण आधी यात खुप गुंतलो होतो, पण आता मात्र यातुन पुर्ण सुटका करुन घेतली आहे. फ्रि हिट काउंटर, ब्लॉगचं रेटींग वगैरे सगळी विझेट्स काढुन टाकली आहेत.

आणि अगदी खरं सांगतो की हे सगळं नसलं की लिहायला फारच उत्साह येतो.:)

Gouri said...

खरंच मोकळं मोकळं वाटतंय आता मस्त :)

अपर्णा said...

गौरी, थोडक्यात पण महत्त्वाचे असं काहीसं या पोस्ट मध्ये आहे...माझा काउंटर आहे पण आता सारखा पाहात नाही...ठेवेन मी इतका वेळ घालवुन लावलाय तर राहुदे म्हणून...:)
तशी मुलींना आभुषणांची आवड असते पण ब्लॉगच्या जगात जास्तीत जास्त आभूषणं मुलांच्या ब्लॉगवर असतात का गं?? काही नाही उगाच एक अर्थहीन किडा वळवळला...ही ही.....

Gouri said...

अपर्णा, अगदी बरोबर ... मुलांचेच ब्लॉग जास्त नटवलेले असतात :)

यदा-यदा ही धर्मस्य said...

हे ब्लॉगींग आपला आपल्याशी आणि आपला आपल्या माणसांशी संवाद नं. मग, हिट काऊंटर असला काय, नसला काय, फरक काय?

Gouri said...

य.य.ही ध. (चालेल ना?), ब्लॉगवर स्वागत.
खरंय. काही फरक पडायला नको. हिट काऊंटर टाकला तो गंमत म्हणूनच, पण हळुहळू, नकळत हिशोब सुरू झाला मनात. आपण याच्या आहारी जातोय हे कळायला वेळ लागला.

Anagha said...

हेहे! मला ते टाकताच आलं नाहीये अजून माझ्या ब्लॉगवर!!! मज्जा! :)

Anagha said...

तू कंटाळली नाहीस ना ग, मी तू लिहिलेलं जुनं जुनं वाचत बसलेय म्हणून??

Gouri said...

अनघा, टाकायचाय का तुला फ्री हिट काऊंटर? सोपं असतं अगदी. मी मदत करू शकीन तुला हवं तर. किंवा तुझ्या तिथे कुणी html आणि javascript येणारं असेल तर त्यांना विचार.

Gouri said...

अगं कंटाळा कसला? तू वाचून आवर्जून प्रतिक्रिया देते आहेस ते छानच आहे की! ब्लॉगचा मला सगळ्यात मोठा तोटा वाटातो तो म्हणजे पुस्तकाप्रमाणे इथे कुणी फारसं सगळं वाचायचे कष्ट घेत नाही. जुनं लिहिलेलं वाहून जातं.