आयोवामध्ये एरिन नावाची एक मुलगी आहे. आपल्या मोजून सहा बाय आठ फुटाच्या बाल्कनीमध्ये तिने बाग केलीय. बाग म्हणजे कोपर्यात केविलवाणी उभी असणारी एखादी हिरवी कुंडी नव्हे. ती या जागेत रोजच्या वापरातल्या भाज्या, फळं अशी झाडं लावते आहे, आणि त्याच बरोबर नेटकी फुलझाडं सुद्धा. शिवाय ओला कचरा जिरवण्यासाठी कम्पोस्ट बिन, बसायला दोन खुर्च्यासुद्धा तिने या जागेत माववल्या आहेत. आज अपघाताने तिचा हा ब्लॉग सापडला, आणि तो वाचून ... विशेषतः ही पोस्ट बघून मी थक्क झाले. तिने अगदी बाग करायचं ठरवल्यापासून, झाडांच्या निवडीपासून सगळे टप्पे आपल्या ब्लॉगवर मांडलेत. एवढ्या कमी जागेत, मोजक्या भांडवलावर किती सुंदर बाग फुलू शकते ते एकदा तिच्या ब्लॉगवर बघाच.
माझ्याकडे तर याच्या दुपटीपेक्षा जास्त जागा आहे, आणि आपल्या देशातल्या सुंदर हवामानाची देणगी आहे. यापुढे बागेसाठी जागा नाही ही सबब बंद!
12 comments:
आमच्या नवीन घराच्या टेरेसमध्ये शमिकाने सुद्धा अशीच सुंदर बाग़ फुलवायला सुरवात केली आहे. मला आवडणारी पारिजात, रातराणी, मोगरा, तगर, गुलाब, चाफा, जास्वंद (पांढरा,गुलाबी आणि लाल) अशी काही फूलझाडे आणि इतर काही झाडे त्यात
विशेष म्हणजे केळी, आणि चीकू सुद्धा. त्यावर लिहेन पुढच्या महिन्यात...!
Awesome!
Jahan chah wahan raah. :)
@ रोहन, लवकर लिही, आणि फोटोही टाक. आणि केळी, चिक्कूविषयी नुसतं लिहून कसं चालेल? हे म्हणजे परत खादाडीच्या पोस्टसारखं होणार ;)
@ राज, खरंय. इच्छा तिथे मार्ग.
सहीच.... हा माझा जिव्हाळ्याचा विषय......:)
भनस, हो ग, माझ्याही जिव्हाळ्याचा. अपल्या भारतात बागकाम किती सोपं आहे तुमच्या इथल्यापेक्षा - बारा महिने उबदार हवा आहे, सहज मदतीला कुणी मिळू शकतं ... हे सगळं नसताना एवढी धडपड करून, दर ऋतुमध्ये बाग देखणी दिसावी म्हणून खपणारी मंडळी बघितली म्हणजे मला वाटतं, आपण बागेसाठी काहीच करत नाही.
गौरी ... आमच्या कडच्या सर्व झाडांना मस्त फुले आली आहेत. शमिकाला म्हटले फोटो पाठव... बघुया आता ती पाठवते का ते!!!
रोहन, सद्ध्या मी बागकामावरचे एकाहून एक सुंदर ब्लॉग वाचते आहे ... पण ते सगळे वेगळ्या हवामानामधले, तिथल्या झाडांची माहिती देणारे. या विषयावर मराठीमध्ये एकही ब्लॉग नाही! बागकामाविषयी, झाडांविषयी अजून खूप लिहायला हवंय मराठीमध्ये.
होय ना... शमिकालाच सांगतो एक ब्लॉग सुरू करायला. लिखाण तिने केले तरी मराठी मात्र मला लिहावे लागेल .. :D
माझ्या पेणच्या घराबाहेर आहेत माझी झाडं. पण मी काही तिथे अशी तुझ्यासारखी काळजी घ्यायला रोज नसते! आमचा माळीच करतो ते सगळं! मी फक्त जाऊन छानपैकी फिरते बागेत!! वाईट ना??!! :(
:D
अनघा, हे म्हणजे बोर्डिंग स्कूलमध्ये मुलांना ठेवण्यासारखं झालं ग ... तुला त्यांची आठवण येणार, त्यांना तुझी आठवण येणार, आणि त्यांच्या सहवासाचा आनंद तुझ्याऐवजी माळ्यालाच! :)
hehe!! :p आता काय करू मी तरी! बाग घेऊन इथे आले तर ठेवू कुठे माझ्या ह्या मुंबईतल्या छोट्याश्या घरात?? :)
:) खरंय ग अनघा. छोट्या गावातून पुण्यात येताना मला एवढं जड गेलं होतं ना ... झाडांसाठी जागा नाही, लहान घर ... जमेल तेंव्हा भेट तुझ्या झाडांना.
Post a Comment