Monday, June 7, 2010

जॉब सॅटिस्फॅक्शन, ओनरशीप, कमिटमेंट, क्वालिटी, सर्व्हिस लेव्हल इ. इ.

    ती माझ्याकडे गेली चार वर्षे पोळ्या, केर-फरशी करते आहे. वर्षाला तिच्या मोजून चार ते पाच सुट्ट्या असतात, आधी सांगून घेतलेल्या. रोज सकाळी साडेसातला ती कामावर हजर असते. बाई ग, शनिवार-रविवारी जरा उशिरा आलीस तरी चालेल (खरं म्हणजे पळेल ... तेवढीच मला उशिरा उठायला संधी) हा माझा सल्ला तिला फारसा पटत नाही. सकाळचं पहिलं काम उशीरा सुरू केलं म्हणजे तिचं वेळापत्रक कोलमडतं.

    चार दिवसांपूर्वी तिची काकू गेली, त्याच दिवशी बहिणीचं अचानक ऑपरेशन करावं लागलं. दवाखान्यात बायकांच्या वॉर्डात पुरुषमाणसांना थांबायला परवानगी नाही. माहेरची मंडळी सुतकात अडकलेली. म्हणजे दवाखान्यात बहिणेवेसोबत हिला थांबायला हवं. रोज रात्री दवाखान्यात झोपून ती सकाळी कामावर हजर आहे. सकाळची घाईची कामं उरकून मगच ती घरी जाते. Business Continuation Plan in place, and successfully applied.

    आपल्याला कामावर पोहोचायला उशीर झाला किंवा खाडा झाला, तर घड्याळाच्या तालाबरहुकूम धावणार्‍या किती घरांची वेळापत्रकं कोलमडतील याची एवढी समज हिला मुळातूनच असेल? वेळेचं नियोजन, प्रायॉरिटी ठरवणं, कामामधलं डेडिकेशन कुठे आणि कधी शिकली ही? सातत्याचा विचार करायचा तर मी हिला सीएमएमआय लेव्हल ५ देईन!

    तथाकथित उच्च कौशल्याची आणि ‘जबाबदारीची’ कामं करणार्‍यांना आठवड्याचे सातही दिवस, वर्षाकाठी चार दिवसाच्या सुट्टीवर या सातत्याने काम करता येईल?

14 comments:

kirti said...

गौरी , खरय ह्या कामाला येणारया बाया कुठून एवढी कमिट्मेन्ट आणतात कोण जाणे.
४ दिवसांच्या सुट्टी वर ,भरपूर पगार असला तरी
काम करणे कठीणच आहे.
बरयाच वेळा ह्यांचाच पगारातूनच ह्यांच घर चालत असत.
अजून मला एक वाटत कि ह्यांची विपरीत परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता पण अमाप असते.उगीच हात पाय गाळुन ,माझ् बाई कशात मन लागत नही असे म्हणताना त्या मला तरी आढळ्ल्या नहीत.

Rajesh Shelar said...

Very good Post....
After reading this i will get satisfied with my sat - sun holidays

आनंद पत्रे said...

पहिल्यांदाच कामवाली बद्दल इतके वेगळे विचार ऐकतो आहे, नाहीतर त्या कामचुकार असतात असाच माझा समज होता...

माझ्या वर्षाच्या १०४ सुट्ट्या मला जास्तच महत्वाच्या वाटत आहेत आता....

आळश्यांचा राजा said...

फार महत्त्वाची गोष्ट सांगीतलीस. त्यातून घेण्यासारख्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून, व्यक्तीसापेक्ष बोलतो.

अंगुलमध्ये नाल्कोच्या एम डी नी एक अशीच गोष्ट सांगीतली होती. त्या अशाच कमिटेड कामगाराला - कंत्राटी होता तो, त्यांनी बक्षीस म्हणून ‘कायम’ केला. म्हणाले, त्या दिवशी आम्ही एक कमिटेड कामगार गमावला!

तर तुझी ही कामवाली, तिला जर एखादी कायमस्वरूपी नोकरी दिली, तरी तिची ही मूल्यं अशीच टिकतील का? तिथेही असंच काम करेल का?

म्हणजे, ही मूल्यं जगण्याच्या लढाईनं लादलेली आहेत, की स्वेच्छेनं स्वीकारलेली आहेत?

Gouri said...

@ कीर्ती, मिशन बराहा यशस्वी? अभिनंतन!
तसं बघितलं, तर यांची कामं किती रटाळ आणि कष्टाची असतात ... परिस्थितीमुळे मनाचे चोचले करणं त्यांना परवडात नसावं.

Gouri said...

@ राजेश, प्रतिक्रियेबद्दल आभार!
शनिवार - रविवारचं महत्त्व खरंच यांच्याकडे बघून कळतं. आपल्याला तो हक्क वाटातो, एखद्या शनिवारी कामाला जावं लागलं तर चिडचिड होते.

Gouri said...

@ आनंद, मला सिन्सियर, कामचुकवे सगळीकडेच असतात - कुठलं काम आहे त्याच्या निरपेक्ष. अश्या बायांना मिळालेली कामं वर्षानुवर्ष सुटत नाहीत, आणि नवं काम शोधायची वेळ त्यांच्यावर कमी येते. त्यामुळे कामवाली शोधताना कामचुकार सापडण्याची शक्यता जास्त असावी.

Gouri said...

आळश्यांचा राजा, ही कमिटमेंट फक्त असुरक्षिततेमधून नसावी असं मला वाटतं. तिला दहा दुसरी घरं मिळू शकतील कामाला.

हे गेलं तर नवीन काम धरता येईल अशी बेपर्वाईसुद्धा दिसते काही वेळा कामगारांमध्ये. अर्थात दुसरं काम मिळण्याची शक्यता असेल तर. अनुगुलमध्ये ही शक्यता किती आहे मला माहित नाही - त्यामुळे तिथे ‘नाईलाजाने कमिटेड’ कामगार असू शकतील.

Anagha said...

आणि हा तिचा गुण तिच्या रक्तातच असणार. त्यामुळे तीने घेतलेल्या किंवा तिच्यावर पडलेल्या, प्रत्येक कामात, हा गुण तिच्या कामास येत असणार. मग नाही का?

Gouri said...

अनघा, खरंय. काम मन लावून करणं हा अवभाव आहे.

Anonymous said...

chaan post.
Mulat ekeka wyaktichi aapapali ek prakruti asate. Paristhiti pramane ti prakruti tich 'menifestation' dakhawat asate. Ti mulatach committed asali pahije. aani paristhitine tichi hi mulya ajun majboot keli asawit. kharach jar ti ekhadya corporate madhe kamala laagli, tari ti committed ch rahil. Hech aaplyala lagu hot. aaj sukhwastu aahot mhanun kahi goshti (hardships) ashakya wattat. pan jar aaplyawar ashi paristhiti aalich tar aapanahi aapaplya mool prakruti nusar swatahla badaluch.

Gouri said...

सोनल, तुझ्या इतक्या सुंदर प्रतिक्रियेवर मी एवढे दिवस उत्तरच दिलं नाहीये - सॉरी.
तुझं म्हणणं खरंय. परिस्थिती वेगवेगळी असते. शेवटी माणसं मूळ स्वभावाप्रमाणे वागतात.

rajiv said...

गरज हि माणसाला कधीच कामचुकार बनू देत नाही. ती भागल्यावर मात्र तिचा सावत्र भाऊ माणसाचा ताबा घेतो ` आळस' त्याचे नाव !

Gouri said...

गरजेचा सवत्र भाऊ कधीकधी जरा जास्तच प्रबळ होतो माझ्याबाबत :D

खरं सांगते - नोकरी करताना इतकी कमिटमेंट इतक्या सातत्याने मला नाही दाखवता येत.