Wednesday, January 19, 2011

एकटी

एकटीनेच सुट्टी घेतली आहेस?


एकटीच फिरणार?

अरेरे ... नवर्‍याला सुट्टी नाही मिळाली का? बिच्चारी ... बोअर होशील ना आता एकटी फिरताना!

सुट्टीवर जाताना असं काय काय एवढं ऐकलं, की मलाच शंका यायला लागली आपण काय करतोय या विषयी. शेवटी आईला म्हटलं: "तुला सुद्धा वाटतंय का ग मी एकटी बोअर होईन म्हणून? "

"अगं स्वतःशीच गप्पा मारायच्यात म्हणून जाते आहेस ना? मग बोअर कशी होशील?" या तिच्या दिलाश्याने जागी झाले मी. दुसर्‍या कुणाची सोबत असली नसली तरी आपल्याला शेवटी एकटीनेच शोधायचंय ना स्वतःला? मग  आपलीच कंपनी काही काळ एन्जॉय करावी. स्वतःशीच निवांत गप्पा माराव्यात यासारखं सुख नाही. जरा चौकटीबाहेर जाऊन आपल्या आयुष्याची चौकट निरखावी असं वाटतंय ना? मग आपल्या जवळच्या सगळ्यांकडेच थोडे दिवस लांबून बघायला हवंय. त्यांच्या सोबतच राहिले तर  नीट दिसणार नाही हे सगळं.

आता हा फोटो एकाकी वाटातोय का तुम्हाला? समोर सुंदर समुद्र पसरलाय. मागे स्वच्छ वाळूचा किनारा. वर आकाशात सुरेख चित्रकारी केली आहे. नजर जाईल तिथवर समुद्र, वाळू आणि आकाशातलं सोनं. नकोशी गर्दी करणारं फ्रेममध्ये काहीच नाही. कळेल न कळेल अशी आपली ओल्या वाळूतली प्रतिमाही आहेच सोबतीला. शिवाय फ्रेमबाहेर राहून फोटो घेणाराही जवळ कुठेतरी आहेच की ... बस्स - अजून काय हवं असतं माणसाला आयुष्यात?फोटो आळश्यांच्या राजाने काढलाय. इतका सुंदर समुद्र आणि किनारा समोर असताना पाण्यात शिरायचं सोडून फोटो काढायचं पाप मी करणार नाही ;)

10 comments:

~G said...

sahich! Mala suddha attachya atta asa ekatine hindat kuthe tari jawasa vatata. destination-less traveling.
Sigh! If wishes were horses...
Tu sahi ahes. Actually karte ahes asa sagla. Wow!

अनघा said...

:) अगदी पटलं. मला आशा आहे कि दुरून तुला तुझ्या सगळ्या जवळच्या लोकांचे चेहेरे छानच दिसले! :)
अर्थात पुन्हा, दुरून डोंगर साजरेच दिसतात! ;)

Gouri said...

~G, अग मी चार महिने प्लॅनिंग चाललं होतं या भटकंतीचं ... तरी खात्री नव्हती शेवटपर्यंत काही विघ्न येणार नाही ना याची.

Gouri said...

अनघा, अग सुदैवाने जवळूनही डोंगर साजरेच आहेत. स्वतःच्या डोक्यातले प्रश्न मात्र छळत असतात. त्यांच्याशीच दोन हात करू या असा विचार होता.

भानस said...

फोटोत एकटेपण नसून प्रसन्न करणारा सृष्टीचा नजारा आहे. ज्यात केवळ आणि केवळ सच्चेपणच.

आपली जवळची म्हणता कधी तीही अचानक खरी कशी हे समजून... :(

THE PROPHET said...

लई भारी!
सकाळ सकाळ मेंदू जागा जाहला :P

Gouri said...

भाग्यश्रीताई, अग आपल्याच आत काय चाललंय ते डोकावून बघणं चाललं होतं.

Gouri said...

बाबा, धन्यवाद!

Anonymous said...

गौरी मस्त कमबॅक... :)

एक वाक्य आठवलं ही पोस्ट वाचताना,
Being alone does not mean being lonely!!

स्वत:चा स्वत:शी संवाद झाला ना, आता आकाश अजून मोकळे स्वच्छ झाले असेल, मग लागा कामाला, लिहा पटापट पुढची पोस्ट... :)

Gouri said...

खरंय तन्वी. एकटेपणा वेगळा आणि एकाकीपणा वेगळा. असलं मस्त वाटतंय ना सध्या! अस्ते अस्ते लिहिते :)