Thursday, October 20, 2011

बालभारती: आठवणीतील कविता

     गेल्या आठवड्यात मला एक सुंदर दिवाळी भेट मिळालीय. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बालभारतीमधल्या कवितांचं संकलन श्री. सुरेश शिरोडकर त्यांच्या या ब्लॉगवर करत असतात.  तिथे ‘या बालांनो’ आहे, ‘श्रावणमासी’ आहे, ‘आनंदी आनंद गडे’ आहे, ‘गवतफुला’ आहे, ‘लाडकी बाहुली’ आहे ... जी कविता ऐकून आपण थेट शाळेच्या वर्गात जाऊन पोहोचतो, त्या सगळ्या बालभारतीमधल्या सुंदर सुंदर कविता तिथे आहेत.

    श्री. शिरोडकरांनी यातल्या तब्बल १८१ कवितांचं संकलन इ-पुस्तक रूपात प्रसिद्ध केलंय. या इ-पुस्तकाची सुंदर भेट त्यांनी पाठवलीय! गेला आठवडाभर मी संधी मिळाली की बालभारतीमध्ये डोकावते आहे ... त्यातली एक कविता वाचायची, आणि कवितेच्या आठवणींमध्ये हरवून जायचं असा खेळ चाललाय.  या भेटीसाठी श्री शिरोडकरांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.

    हे इ-पुस्तक जालावर इथे उपलब्ध आहे ... तेंव्हा वाट कसली बघताय? डाऊनलोड करा आणि तुमच्या लाडक्या कवितांचं पुस्तक मिळवा!

18 comments:

Anonymous said...

अगं मी कालच वाचल्या काही कविता.... आठवणींच्या राज्यातून परत येताना पावलं जड होतात बघ.... त्या कविता शिकवणाऱ्या बाई, वर्गातली मुलं मुली ... रमायला होतं नाही!!!

आभार गं गौरी!!!

Gouri said...

तन्वी, खरंय. शाळेचं वर्ष सुरू झालं, की एक दोन आठवड्यातच ‘बालभारती’चा फडशा पाडला जायचा इतकी ही पुस्तकं, त्यातल्या कविता आणि गोष्टींची भुरळ होती!

Vinay said...

धन्यवाद गौरी! ही लिंक पाठवल्या बद्दल.

Gouri said...

विनय, आपण खरे आभार मानायला हवेत शिरोडकरांचे ... मेहनत घेऊन एवढं मोठ्ठं संकलन केल्याबद्दल, आणि ते जालावर उपलब्ध करून दिल्याबद्दल!

मी मराठी .... said...

खरच बालभारती ची तोड कशालाच नाही. खूप खूप धन्यवाद या संग्रहा साठी माझ्या कडे तो आहेच पण याची आकर्षक मांडणी मुळे तो जरा जास्त चांगला वाटतोय. श्री. सुरेश शिरोडकर सरांचे पण खूप आभार .

kirti said...

गौरी ,
खर तर मी महाराष्ट्रात कधीच शिकले नही तरी ही ह्या कविता वचयला खूप च्हन वाटत आहे . पण माझा मोठा लेक ४-५ वर्ष बालभारती शिकला आहे त्या मुळे ह्या पैकी बर्याच कविता महितीच्या होत्या.
ऎ , मी पण एक कवित शोधत अहे ( बालभारती इन्ग्रजीतील) केट केट यू विल बी लेट.......जर कोणस महित असेल तर जाला वर टाकवी

Gouri said...

मी मराठी, खरंय. श्री शिरोडकरांनी मेहनत घेऊन आकर्षक मांडणीत सादर केल्या आहेत कविता.

Gouri said...

कीर्ती, माझ्यासाठी या कवितांबाबत त्या मूळ कवितांची गोडी आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी यांची इतकी सरमिसळ झाली आहे, की तटस्थपणे कविता म्हणून यातली एक एक कशी आहे हा विचारच मनात येत नाही. या आठवणी नसतानाही त्या छान वाटतात म्हणून मस्त वाटलं. तू शोधते आहेस ती इंग्रजी कविता ओळखीची वाटत नाहीये.:(

Raj said...

गौरी, तिथे क्लिक केल्यावर खूप फाइल दिसत आहेत. त्यातली कोणती घ्यायची?

Gouri said...

राज, पहिली लिंक ... मेपलसारख्या पानांचं चित्र आहे आणि पुस्तकाचं नाव दिसत नाहीये ती.

Raj said...

ओके सापडली. मी चुकून 'पुस्तक डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा' वर जात होतो. तिथेही बरीच पुस्तके आहेत.

मस्त मस्त कविता आहेत. मला इयता ७ वी, तुकडी ब आठवली. :) अनेक आभार.

vaishali said...

hey gouri thank u so much for this book
मी last week मधेच "ती फुलराणी" हि कविता net वर शोधात होते पण मला नाही मिळाली हे बुक download करून आधी ती कविता वाचली :)

Unlucky said...

I’m really amazed by this blog. Tons of useful posts and info on here. Thumbs up,

Some people are too smart to be confined to the classroom walls! Here's a look at other famous school/college dropouts.
Check out here for Smart People

Gouri said...

राज, बाकी लिंक्स मी बघितल्या नाहीत ... पण बरीच पुस्तकं दिसताहेत तिथे. ७वी ‘ब’ ऐवजी ‘ई’, बाकी सेम टू सेम :)

Gouri said...

वैशाली, शाळेत असताना ‘फुलराणी’ पूर्ण पाठ होती :)

Gouri said...

अनलकी, आभार!

Suresh - सुरेश शिरोडकर said...

"बालभारती आठवणीतील कविता" या ब्लॉगबद्दल तसेच पुस्तकाबद्दल इथे चर्चा घडवून आणल्याबद्दल गौरीचे आणि तिच्या ब्लॉगवरील सर्व वाचकांचे आभार. आपल्या संग्रही बालभारतीतील काही कविता असल्यास आपण मला skarsuresh@gmail.com या ईमेल Id वर पाठवू शकता.

धन्यवाद गौरी!

Gouri said...

शिरोडकर सर, इतक्या सुंदर संकलनाबद्दल मी तुमचे आभार मानायला हवेत :)