Saturday, November 19, 2011

रॉकस्टार

    आज कपिलाषष्ठीचा योग असावा. आज नवर्‍याने आणि मी थेटरात जाऊन ताजा ताजा शिणुमा बघितला! सिनेमा सलग, ताजा असताना आणि थेटरात जाऊन बघणं हा अनुभव माझ्यासाठी सद्ध्या इतका दुर्मीळ झालाय, की अगदी रा१ बघायला सुद्धा मी तयार झाले असते म्हणा ... त्यामुळे मी इथे त्याचं कीबोर्ड झिजेपर्यंत कवतिक लिहिलं, तरी ते जरा मीठ शिंपडूनच वाचा.


    या शिणुमाला टाईम्सने चार तारे दिलेत. त्यात राजने रॉकस्टारच्या गाण्यांबद्दल इथे लिहून ठेवलंय. त्यामुळे बहुधा आपण डोंगराएवढ्या अपेक्षा घेऊन बघायला जाणार, आणि अपेक्षाभंग होऊन परत येणार अश्या तयारीनेच गेले होते. पण अपेक्षाभंगाच्या अपेक्षेचा भंग झाला. सिनेमा मनापासून आवडला.

    याहून जास्त तारे तोडत नाही. मला सिनेमाची चिकित्सा करता येत नाही. त्यातल्या एकेका पैलूविषयी काही मत देण्याएवढं तर अजिबात समजत नाही. म्हणजे अगदी सिनेमा बघताना त्यातली गाणी आवडली, तरी गाण्याचे शब्दसुद्धा नंतर आठवत नाहीत. फक्त ओव्हरऑल परिणाम जाणवतो. या अडाणीपणाला मी होलिस्टिक व्ह्यू असं गोंडस नाव दिलंय.  तर माझ्या होलिस्टिक व्ह्यूनुसार रॉकस्टार चार तारेवाला आहे.  जरूर बघा, आणि गाणी तर ऐकाच ऐका. आवडला नाही, तर मला जरूर सांगा, कदाचित माझा सिनेमाविषयीचा अडाणीपणा त्यातून थोडा कमी होईल.

14 comments:

हेरंब said...

गाणी ज ह ब ह र ह द ह स्त ह आहेत. रहमानसाहेबांनी कमाल केलीये !!! नुसतं व्यसन च्यायला !

Gouri said...

हेरंब, खरंच रहमान हे व्यसन आहे. एकदा लागलं की सुटत नाही!

अपर्णा said...

मला वाटलं होतं तू गाण्याबद्द्ल काही लिहिलं असशील.....हाय कंबख्क्त ...
असो खा आता शिव्या आमच्या अपेक्षा वाढवल्याबद्दल...बाकी पिच्चरचं म्हणशील तर मी इतक्यात कधी तरी फ़ायनली सिंघम पाहिला म्हणजे किती मागे आहोत बघ ....

Gouri said...

अपर्णा, राजची संपूर्ण पोस्ट केवळ रॉकस्टारच्या गाण्यांबद्दलच आहे. त्यात भर घालण्यासारखं माझ्याजवळ काही नाही.
आता मी आठवायचा प्रयत्न करते आहे यापूर्वी कुठला सिनेमा बघितला होता ते ... बहुधा सिंघमच :)

Raj said...

गौरी,
दुव्याबद्दल धन्यु. :)
मीही थेटरात जाऊन फार क्वचित सिनेमा बघतो. वर्षातून एक-दोनदा. रॉकस्टारच्या गाण्यांमध्ये पहिल्यांदा शहर में आणि कुन-फायाकुन ऐकच ऐक. मस्ट. नक्कीच आवडणार. कुन-फायाकुन फारच अल्टीमेट आहे. बाकीच्या गाण्यांमध्ये बरेच प्रयोग केले आहेत, त्यांची सवय झाली की आवडायला लागतात.

Anonymous said...

गौरीबाई मी ऐकून पाहिलीत गाणी आणि मला अजिबात आवडलेली नाहीत... त्यामूळे मी खुश आहे... ’छय्या छय्या’ वगैरे पण पहिल्यांदा अजिब्बात आवडलं नव्हतं मग हळूहळु जाम आवडायला लागलं... तेव्हा रहमानच्या गाण्यांच्या आवडण्याचा क्रम चुकलेला नाहीये... ही गाणीही हळुहळू पकड घेतील असे दिसतेय!! बाकि एक महत्त्वाचे खूप दिवसानी असे घरच्यांबरोबर थेटरात जाऊन सिनेमे बघितले की कोणतेही सिनेमे आवडू शकतात, मला ’रब ने बना दी जोडी’ आवडला होता :)

Gouri said...

राज, मी सिनेमा बघण्यापूर्वी एकदा गाणी ऐकली होती. एकदम आवडली नाही म्हणणार, पण वेगळी नक्कीच वाटली. काल पुन्हा ऐकल्यावर / बघितल्यावर ती हळुहळू आत झिरपायला लागली आहेत ... म्हणजे अजून एकदा तरी नीट ऐकायला हवीत असा फिल यायला लागलाय ... slow poisoning :)

Gouri said...

तन्वी, हिमेशची गाणी आणि रहमानची गाणी यात एक साम्य आहे. पहिल्यांदा ऐकून आवडत नाहीत. आणि हे साम्य इथेच संपतं. हिमेशची गाणी शंभराव्यांदा ऐकणं नशिबी आलं तरी आवडत नाहीत, रहमानची जास्त जास्त आवडत जातात :D

बाकी ते खूप दिवसांनी थेटरात खूप दिवसांनी सिनेमे बघितले की आवडतात हे एकदम बरोबर. फार शिव्या खाव्या लागू नयेत म्हणून मी पोष्टीतच चिमूटभर मीठ शिंपडून घेण्याचा इशारा दिलाय :D:D

सिद्धार्थ said...

मध्यंतरानंतरचा रीव्हू इतका काही चांगला ऐकू आला नाहीय त्यामुळे जाऊ का नको असे द्वंद्व सुरु आहे. पण रहमान आणि मोहितने पूर्ण मोहिनी घातली आहे. एकदम 'सद्दा हक्'...

Gouri said...

सिद्धार्थ, डोक्याला बराच ताण दिल्यावर आठवलं. मध्यंतरापर्यंत जेवढा आवडला, तेवढा पुढचा भाग नाही आवडला. पण तरीही माझे चार तारेच - रहमानला इलाज नाही!

aativas said...

आवडलेल्या गाण्यांसाठी आख्खा सिनेमा? हे म्हणजे नालेसाठी घोडा त्यातली गत होणार माझ्यासाठी. अर्थात मी गाणीही अजून ऐकलेली नाहीत म्हणा!

अस हे काळाच्या मागे राहण्याचे फायदे असतात कारण काय करायचं आणि काय नाही हे इतरांच्या अनुभवावरून शिकता येत :-)

Gouri said...

सविता, कधी नाही ते नवर्‍याने सिनेमाची तिकिटं काढू का म्हणून विचारल्यावर नाही म्हणू नये. त्यात रहमानची गाणी असतीत आणि रणबीर असेल, तर नाहीच नाही. :D

तसा गाण्यांव्यतिरिक्त सिनेमाही चांगलाय.

भानस said...

मी गाणी ऐकलीत.. तीही लेकामुळे. अजून शिनुमा मात्र पाहायचं धाडस केलेलं नाही. ( हल्लीच दोन तीन सिनेमे दहा मिनिटांच्या वर पाहवले न गेल्याने भ्या वाटतय बघ. :D:D ) पण आता तू तावूनसुलाखून पाहा म्हणते आहेस तर बघेंगेच... :)

Gouri said...

श्रीताई इतका काही भीतीदायक नाहीये ग सिनेमा :)