Tuesday, September 18, 2012

बाप्पा मोरया!
बाप्पा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे.
आणि आभाळाएवढं मोठ्ठं मन दे.
.
.
.
.
.
.
आणि मला पुढच्या वर्षी वेळेवर मूर्ती बनवायला सुरुवात करायची बुद्धी दे. :)
***************************
हा आमचा मिनिमालिस्ट बाप्पा. यंदा चक्क गणेश चतुर्थीपूर्वी (अर्धा तास आधी) पूर्ण झालाय. त्यामुळॆ पूजा होण्याचं भाग्य लाभणार त्याला.
***************************
बाप्पा बनवतांचे हे अजून काही फोटो:

bappa_2012

22 comments:

Anonymous said...

_/\_ सुरेख जमलाय बाप्पा :)

Gouri said...

तन्वी, धन्यु ग ... गौराई आणि ईशानूचा पण मस्त झालाय हा!

kirti said...

मस्त ग. जरा अम्हास पण ह्या बाबत तकनीक सहाय्य कर ना.
खूपच छान दिस्तोय बाप्पा .माझ्या कडून अमाप कौतुक.

Gouri said...

किर्ती, आभार! बाप्पा शाडूच्या मातीचा बनवलाय, आणि पोस्टर कलर वापरून रंगवलाय. बनवतांनाचे आणि पूजा केल्यावरचे फोटो टकते इथे लवकरच. :)

Anagha said...

सुंदर ! कौतुक ! वापरलेले माध्यम झकासच ! फोटो जरा अजून इथून तिथून काढायचे ना ! :)

Gouri said...

अनघा, कसचं कसचं :)
भरपूर काढलेत ग फोटो ... मला पूजा केल्यानंतरच्या मूर्तीचे पण टकायचे होते, म्हणून बाकीचे नाही टाकले. आज टाकीन.

अपर्णा said...

वाह तुम्ही घरी गणपती बाप्पा बनवताय..मस्त गं..

गणपती बाप्पा मोरया....(आम्ही आरोळ्या पण ऑनलाइनच ठोकणार बहुदा...)

Gouri said...

अपर्णा, अगं हे सगळं फक्त या वर्षी. यंदा वेळ मिळाला म्हणून. आतापर्यंत कधी जमून आलं नाही, पुढचं माहित नाही. यावेळी शक्य होतं म्हणून करून घेतलंय. नाही तर दर वर्षी न चुकता फक्त मोदक होतात आईबरोबर. :)

Yogesh said...

मस्त झालाय बाप्पा.....मी पण ठरवल होतं की बाप्पा घरी बनवायचा पण हाफ़िसमुळ काही जमल नाही...शेवटी विकतच आणला...बघु या पुढील वर्षी बनवु या :) :)

_/\_ गणपती बाप्पा मोरया!!

Gouri said...

योगेश, यंदा नाही तर पुढच्या वर्षी! बाप्पा समजून घेतो. :)

aativas said...

छान. ही कलाही येते हे माहिती नव्हतं!

पण बाप्पा तुम्ही करत (साकार करत होतात) होतात तेव्हा फोटोग्राफरही होते म्हणा की साक्षीला :-)

Gouri said...

सविता, माझ्या अनेक नस्त्या उठाठेवींपैकी हा एक प्रयोग होता. यशस्वी होईलच याची काही गॅरेंटी नसलेला. (पुढच्या वेळी जमेलच असंही नाही, कारण तेंव्हा परत काहीतरी बदल असतीलच यात.) कला साध्य होण्यासाठी सराव करावा लागतो, त्याचा पूर्ण आभाव आहे :)
फोटो मीच काढलेत ... एकेक टप्पा पूर्ण झाल्यावर. ते आईला, भावाला दाखवून त्यांचं मत घेण्यासाठी. नवर्‍याचा सहभाग म्हणजे मला सलग निवांत वेळ मिळू देणं, वाळत असलेल्या मूर्तीवर न धडपडणं, आणि रंगकामावर मत देणं.

Suhas Diwakar Zele said...

मस्त गं... अजून फोटो हवेत मला :) :)

Gouri said...

सुहास, मला ऑलरेडी घरचा आहेर मिळालाय - मूर्ती घडवण्यापेक्षा जास्त वेळ फोटो काढण्यावर घालवलास का म्हणून :)

नागेश देशपांडे said...

सुंदर मुर्ती _/\_

mynac said...

बाप्पा तयार होतांनाचे इतर फोटो बघितले..अतिशय सुंदर...आपल्या मेहनतीचे नक्की चीज झाले,बाप्पा विराजमान होण्या अगोदरच आपल्याला पावला आहे यात शंका नाही...मस्त.

Gouri said...

नागेश, आभार, आणि ब्लॉगवर स्वागत!

Gouri said...

mynac, खरंच, मूर्ती बनवतांना जितकं मस्त वाटलं ना, तितकं पूजा करतांनाही वाटलं नसेल. तो आपला क्वालिटी टाईम असतो ना बाप्पा बरोबर!

सिद्धार्थ said...

Great!!!
सुंदर बाप्पा.
_/\_

Gouri said...

सिद्धार्थ, धन्यू!

सौरभ said...

loullyy :D :D :D

Gouri said...

सिद्धार्थ, :)