खादाडी पोस्ट लिहिण्याला माझा तात्त्विक विरोध आहे. असल्या पोस्ट लिहिताना लेखकाला समस्त वाचकवर्गाला टुकटुक करून आम्ही काय काय मस्त खाल्लं हे सांगण्याची संधी मिळते. वर आणखी शिक्षा म्हणून छान छान फोटो टाकता येतात. हा वाचकांवर (विशेषतः ऑफिसमध्ये बसून ब्लॉग वाचणार्या बापड्या वाचकांवर) अन्याय आहे. तेंव्हा खादाडीवरची पोस्ट लिहिणार नाही असा माझा निश्चय आहे. तो मी फक्त या पोस्टपुरता गुंडाळून ठेवलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी :D
साहित्य: चवळीचे चार दाणे, कॅमेरा, ऊन, पाऊस, माती, पेशन्स इ.
वेळ: सुमारे तीन महिने
कृती: बारीक पांढर्या चवळीच्या पाकिटातले लाल दिसणारे चार दाणे घ्यावेत.
साधारणपणे ऑगस्टमध्ये ते पेरावेत. त्यांना भरपूर ऊन आणि पाऊस मिळाला पाहिजे. आठवडाभरात त्यांना कोंब येतात. कबुतरं, मध्येच पडलेली उघडीप यात दोन कोंब वाळून जातात. उरलेले दोन वेल तासातासने वाढत असावेत असं वाटण्यासारख्या वेगाने चढत जातात. त्याला खालीलप्रमाणे फुलं आली, म्हणजे वेल नीट वाढतोय असे समजावे.
ही फुलं जोडीजोडीने येतात. फुल एका दिवसात वाळतं, आणि चवळीची शेंग दिसायला लागते. प्रत्येक शेंग पूर्ण वाढून काळपट झाली की काढावी आणि सावलीत सुकवावी. दोन दिवसांनी तिचे दाणे काढावेत. याप्रमाणे रोज १५-२० दाणे निघतील. ते सठवत रहावेत. वेलावरच्या सगळ्या शेंगा याप्रमाणे काढून झाल्या, म्हणजे लक्षात येते, की याची उसळ अर्धी वाटीपेक्षा जास्त होणार नाही.
तेंव्हा घरात कुणी नसताना चवळीचे सूप करून एकटयाने प्यावे. पुराव्यासाठी एक फोटो काढून ठेवावा.
सूचना:
१. फुलं मोजून किती शेंगा येणार, ‘पीक’ किती निघणार याची स्वप्नं बघू नयेत. अंदाज हमखास चुकतो. काही शेंगा पोचट निघतात, काही भरण्यापूर्वीच सुकून जातात. तेंव्हा भरून, वाळून हातात पडेपर्यंत शेंग आली म्हणू नये.
२. सुपात काहीही घातले / घालायचे राहिले, तरी घरच्या चवळीचे सूप गोडच लागते. तेंव्हा पुढची कृती विचारू नये.
३. वेलावर नुसती फुलं असताना आल्यागेल्या प्रत्येकाला "ओळखा बरं कसला वेल आहे ते" म्हणून भाव खाऊन घ्यावा. नंतर कुणाला देण्याइतके चवळीचे दाणे निघण्याची शक्यता कमीच असते.
इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
Friday, November 12, 2010
Monday, October 25, 2010
हावरट
पुस्तकांची खा खा सुटलीय. किती घेतली आणि वाचली तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही.
एका दिवसात २ पुस्तक प्रदर्शनं.
दुर्गा भागवतांचं ‘आठवले तसे’. (झालं वाचून. दुर्गाबाईंनी टीका केलेली माणसंही मोठ्या कर्तृत्त्वाची माणसं आहेत. त्यांच्याहून मोठं कर्तृत्त्व आणि स्पष्ट विचार असणार्या दुर्गाबाईंना टीका करण्याचा हक्क पोहोचतो. आपण तो भाग सोडू्न द्यायचा.)
साधनाताई आमटेंच्या आठवणी - ‘समिधा’. (नेहेमी मोठ्या झालेल्या माणसांच्या बायकोच्या आठवणी म्हणजे अन्याय, फरफट, दिव्याखालचा अंधार यांचंच चित्रण जास्त असतं. हे पुस्तक तसं नाही. हा दोघांनी मिळून केलेला प्रवास आहे. त्यामुळे फार आवडलं पुस्तक.)
स्वगत - जयप्रकाशांची तुरुंगातली दैनंदिनी, पुलंनी मराठीत आणलेली. (उत्सुकता म्हणून घेतलीय, पण सुरुवातीचे काही दिवस वाचून तरी फार तात्कालिक संदर्भ वाटताहेत - आणिबाणीच्या परिस्थितीचे. बघू पुढे काही इंटरेस्टिंग सापडतंय का ते.)
रविंद्रनाथांची ‘गोरा’ - कित्येक दिवसांपासून वाचायची आहे. गॉर्कीच्या ‘मदर’सारखीच रटाळ आहे असं ऐकून आहे, तरीही. (एक आशावादी, महत्त्वाकांक्षी प्रकल्प.घरात पुस्तकं ठेवायला जागा नाही, तरी जे वाचण्याची खात्री नाही असं पुस्तक मी कशाला विकत आणलंय मलाही माहित नाही. सुदैवाने नवर्याची पुस्तकं वेगाळी असतात, त्यामुळे अश्या विकत घेऊन न वाचलेल्या पुस्तकांची त्याला कल्पना नाही. नाही तर काही खैर नव्हती.)
पूर्निया - डॉ.अनिल अवचटांचं पहिलं पुस्तक.
ना ग गोर्यांचे सीतेचे पोहे.
राजा शिरगुप्पे यांची शोधयात्रा - ग्रामीण महाराष्ट्रातल्या दुर्गम भागांची.
विनय हर्डीकरांचं ‘जनांचा प्रवाहो चालिला’.
महाराष्ट्र देशा - दोन प्रती (हार्ड बाऊंड मिळतंच नाहीये आता), ‘हिंदू’(आणि त्याच्यावर फुकट मिळाल्यामुळे ‘कोसला’), टाईम्स सूडोकू आणि जिब्रानचं प्रॉफेट ही पुस्तकं देण्यासाठी घेतली आहेत, त्यामुळे ती मोजायची नाहीत.
‘अक्षरधारा’वाले कार्ड स्वीकारत नाहीत, जवळचे पैसे संपले. आणि निवडलेली पुस्तकंही हातात मावेनाशी झाली. नाही तर?
अजून दिवाळी अंक नाही दिसले कुठे.
पुणे बुक फेअरला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा स्टॉल आहे. तिथे ‘किशोर’ मधल्या निवडक कथा, कविता, इ. ची संकलित पुस्तकं होती. आमच्याकडे माझे भाऊ लहान असतानापासूनच्या काळातले किशोरचे अंक जपून ठेवलेले होते. या जुन्या अंकांमध्ये काही अतिशय सुंदर लेखमाला होत्या - ‘चीनचे प्राचीन शोध’ - यात कागद, रेशीम, घड्याळ, लोहचुंबक, चिनी माती अश्या शोधांविषयी अतिशय रंजक माहिती होती. ‘ज्ञानवृक्षाच्या पारंब्या’ मध्ये पारा आणि गंधकापासून औषधनिर्मिती करणारा नागार्जुन, शुल्बसूत्रकार कात्यायन, पिंगल अश्या प्राचीन भारतीय ज्ञानोपासकांविषयी फार सुंदर माहिती होती. पाठयपुस्तक निर्मिती मंडळाला या मालिका पुस्तकरूपाने प्रसिद्ध नाही करता येणर का?

Monday, October 18, 2010
हेरगिरी
आपले बॉलिवूडवाले तारेतारका ‘स्ट्रिक्टली प्रायव्हेट’ मध्ये लग्न वगैरे उरकून घेतात ना, टपून बसलेल्या मिडियावाल्यांना गुंगारा देत, तसं आल्याचं झाड लपून छपून फुलत असावं अशी मला शंका होती. रोज सकाळी मी बघते, तेंव्हा झाड नेहेमीसारखंच दिसत होतं - पण एक दिवस मला छडा लागलाच. सकाळी तपकिरी आणि पिवळी अश्या रंगसंगतीची दोन नाजुक फुलं झाडाजवळ पडलेली सापडली. मग कालच्या दिवशी सारखं दोन दोन तासांनी झाडावर नजर ठेवून होते, आणि शेवटी चोरी पकडलीच :)
तर आल्याचं फूल हे असं दिसतं ... ‘हिरवाईचा उत्सव’ मधल्या फोटोतली आल्याची कळी होती ना, तिला आलेली ही फुलं. फूल दुपारी फुलतं, आणि लगेच रात्री गळूनही पडतं. काल संध्याकाळच्या वेड्या पावसामध्ये कॅमेर्यावर छत्री धरून हा फोटो काढलाय ...
फ्लॅशमुळे पिवळा रंग इथे फिकट दिसतोय - प्रत्यक्षात तो पिवळा धमक आहे. पुन्हा, पाऊस नसताना फूल आलं, तर अजून चांगला फोटो घेता येईल.
Subscribe to:
Posts (Atom)